ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

अनेकांना खाजगी आयुष्यात तणाव असतो तर काहींना ऑफिसच्या कामाचा ताण असतो. काहींना काम तर आवडत असतं पण वरिष्ठांच्या जाचाला ते पुरते कंटाळलेले असतात.

  • Share this:

सध्याचं व्यग्र वेळापत्रक आणि सततच धावणं यामुळे प्रत्येकाचंच आयुष्य तणावग्रस्त झालं आहे. सतत विचारात आणि तणावात राहिल्यामुळे फक्त मानसिक आजारच नाही तर शारीरिक आजारांनाही तुम्ही आमंत्रण देतात. आता तणावाचीही अनेक कारणं असतात. अनेकांना खाजगी आयुष्यात तणाव असतो तर काहींना ऑफिसच्या कामाचा ताण असतो. काहींना काम तर आवडत असतं पण वरिष्ठांच्या जाचाला ते पुरते कंटाळलेले असतात. परीक्षेचा ताण जेवढा मुलांना असतो तेवढाच किंबहूना त्याहून जास्त ताण आई- वडिलांना असतो. याच मानसिक ताणामुळे पाठदुखी, डोकंदुखी, खांदे दुखी असे अनेक शारीरिक विकार जडतात.

या सगळ्या अडचणी जरी असल्या तरी योगच्या माध्यमातून तुम्ही तणावमुक्त होऊ शकता. अशी अनेक योगासनं आहेत ज्यांच्या नियमित अभ्यासाने तुम्ही ताण- तणाव, नैराश्यावर सहज मात करू शकता. मात्र योगासनं करण्यापूर्वी तुमचा रक्तदाब नियंत्रणात आहे की नाही याची तपासणी करून घ्या.

त्रिकोणासन-  या योगासनामुळे पाठदुखीपासूनही बराच आराम मिळतो. दोन आठवडे हे योगासन नियमितपणे केल्यास पाठदुखीची तक्रार कमी होईल. हे आसन केल्यास वजनही कमी होतं. सर्वातआधी दोन पायांमध्ये अंतर ठेवा. यानंतर कंबरेतून उजव्या बाजूला वाकून उजवा हात उजव्या पायाला लावा. यावेळी डावा हात सरळ हवेत राहील याकडे लक्ष द्या. डाव्या हाताच्या बोटांकडे पाहा. यानंतर पुन्हा मुळ स्थितीत उभे रहा. यानंतर डाव्या बाजूला हे आसन करा.

हलासन- जमिनीवर एक चादर किंवा योग मॅट अंथरून झोपा. दोन्ही हात जमिनीवर ठेवून पाय एकमेकांशी जोडून घ्या. यानंतर दोन्ही पाय हळूहळू वर करत डोक्याच्या वरनेत जमिनीवर टेकवा. आता पाय आणि गुडघे सगळ ठेवा आणि हात जमिनीवरच ठेवा. या स्थितीत थोडावेळ राहिल्यानंतर मुळ स्थितीत रहा. एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यांनी हे आसन करू नये.

कोणासन- हे आसन करण्यापूर्वी सर्वातआधी ताठ उभे रहा. यानंतर दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवा. दीर्घ श्वास घेत उजवा हात अशा प्रकारे उंच करा की हाताची बोटं आकाशाकडे असतील. आता श्वास सोडत कंबरेतून डाव्या बाजूला वाका. आता ओटीपोटातून वाकून कोपऱ्यातून हात सगळ ठेवत उंच ठेवा. दीर्घ श्वास घेत पुन्हा मुळ स्थितीत या आणि नंतर श्वास सोडा. ही क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा.

झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

दिवसाची सुरुवात या विचारांनी करा, कधीच येणार नाही नैराश्य!

सावधान! तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपता? आजच बदला ही सवय

VIRAL VIDEO: या गावात दिसली सात तोंडी सापाची कात, लोकांनी वाहिलं हळद- कुंकू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 11:34 AM IST

ताज्या बातम्या