Home /News /lifestyle /

7 वर्षे, 7 किलो वजनाचा फक्त 'हाडांचा सापळा'; कोरोना काळात चिमुरड्याची भयंकर अवस्था

7 वर्षे, 7 किलो वजनाचा फक्त 'हाडांचा सापळा'; कोरोना काळात चिमुरड्याची भयंकर अवस्था

7 वर्षांच्या चिमुरड्याचा हा भयावह असा फोटो समोर आला आहे.

    सना, 05 जानेवारी : वय वर्षे 7, वजनही फक्त सात किलो. हा जो फोटो पाहताय तोच हा चिमुरडा. ज्याचा आता फक्त हाडांचा सापळा उरला आहेत. कोरोना महासाथीत चिमुरड्याची भयंकर अशी अवस्था झाली आहे आणि याचं कारण म्हणजे कुपोषण (Malnutrition) . कोरोना काळातील भीषण वास्तव दाखवणारा हा फोटो. येमनमधील (Yaman) मुलाची झालेली ही भयावह अवस्था. येमनमध्ये राहणारा 7 वर्षांचा फैयद समीम (Fayad Samim). तो कुपोषण आणि  पॅरालायसिस (Paralysis) शिकार झाला आहे. त्याचं वजन फक्त 7 किलोच राहिलं आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार समीमची प्रकृती खूपच गंभीर होती. त्याला सनातील अल सबीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलच्या कुपोषण वॉर्डचे सुपरवायझर डॉ. रागेह मोहम्मद यांनी सांगितलं, समीमला जेव्हा रुग्णालयात आणलं तेव्हा त्याची प्रकृती खूप गंभीर होती. त्याला सेरेब्रल पाल्सी आणि कुपोषण आहे. अथक प्रयत्न करून आम्ही त्याचा जीव वाचवला आहे. त्याच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होते आहे. हे वाचा - कायच्या काय! 9 वर्षांच्या मुलानं चक्क LED Bulb गिळला; पुढे नक्की काय घडलं वाचा येमेनमध्ये कुपोषित मुलांची संख्या वाढते आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते येमन जगातील सर्वात मोठ्या मानवी संकटाचा सामना करतो आहे. येमननं याला अधिकृतरित्या आपत्ती घोषित केली नाही मात्र 6 वर्षे युद्ध झेलल्यानंतर देशातील  80 टक्के लोकसंख्या मदतीवरच जगते आहे. संयुक्त राष्ट्रांनी येमेनमधील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. 2018 पर्यंत परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली. पण आता कोरोना महासाथीमुळे हे संकट पुन्हा वाढलं आहे. हे वाचा - 'आमच्यासाठी जीव महत्त्वाचा', कोरोना लशीच्या युद्धाला कंपन्यांकडूनच पूर्णविराम त्याचंच एक उदाहारण म्हणजे समीम. समीमचं कुटुंब गरीब आहे. खूप हलाखीचं आयुष्य जगतं आहे. सलीमवर उपचार व्हावेत यासाठी त्यांना मदतीचीही अपेक्षा आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या