पिवळ्या साडीवाल्या 'त्या' महिला ऑफिसरचा Tik Tok Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केल्या या कमेंट

पिवळ्या साडीवाल्या 'त्या' महिला ऑफिसरचा Tik Tok Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केल्या या कमेंट

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सहाव्या टप्प्यातील मतदनादरम्यान चर्चेत आलेल्या पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी सर्वांच्याच लक्षात राहिल्या.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सहाव्या टप्प्यातील मतदनादरम्यान चर्चेत आलेल्या पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी सर्वांच्याच लक्षात राहिल्या. निवडणुकीनंतरही त्यांची क्रेझ सर्वत्र वाढत गेली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. रिना यांनी उत्तर प्रदेशातील देवरियामधील मतदार संघातून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसोबत सेल्फी देखील घेतला. लखनऊमध्ये राहत असलेल्या रिना द्विवेदी मतदानाकरता आपल्या सासरी देवरिया इथं दाखल झाल्या. यावेळी त्यांनी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर रीना यांचा एक टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

प्रियांका चोप्राच्या सिगरेट ओढतानाच्या फोटोवर 'हे' आहे बहीण परिणीतीचं म्हणणं

रिना व्दिवेदी यांचा एक टिक टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओमधील रिना यांचा डान्स हरियाणाची डान्सर सपनी चौधरीची कॉपी म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये रिना हिरव्या साडीमध्ये सपना चौधरीप्रमाणं डान्स स्टेप करताना दिसत आहे. यामध्ये त्यांनी सपनाचं ‘तेरी आख्या का काजल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सर्वांच्या पसंतीत उतरत आहे. हा व्हिडिओ कोणत्यातरी लग्नात शूट करण्यात आला आहे. ज्यामध्ये रिना कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी दिसत नाही. या व्हिडिओमध्ये रिना यांनी सपनापेक्षाही चांगला डान्स केल्याचं काहींचं म्हणणं आहे.

भर पावसात रणबीर, अभिषेक, अर्जुन, इशान यांचा फुटबॉल गेम रंगला; PHOTO व्हायरल

कोण आहे रिना द्विवेदी

रिना द्विवेदी असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या, पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचं रिना सांगतात. लहानपणापासून त्यांना फिटनेस आवडतो. सुदंर दिसणाऱ्या रिना यांना 13 वर्षाचा मुलगा आहे. रिना या सलमान खानच्या खूप मोठ्या फॅन आहेत.

शाहरुख खानसोबत 'हा' सीन शूट करताना मलायका अरोरा झाली होती रक्तबंबाळ

मुलाला व्हायचंय IAS

रिना यांच्या पतीनं निधन 2013मध्ये झालं. पतीच्या निधनानंतर त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळाली. त्यांचा मुलगा दहावीमध्ये असून त्याला IAS व्हायचं आहे. तो सध्या लखनऊमध्ये शिक्षण घेत आहे.

============================================================================

महालक्ष्मी एक्स्प्रेसला चहूबाजुंनी पाण्याचा वेढा, डब्यात पाणी शिरल्यानं प्रवाशांमध्ये भीती, पाहा LIVE VIDEO

First published: July 27, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading