मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Year Ender 2021: फिट राहण्यासाठी 2021 मध्ये या 5 गोष्टींना लोकांची मिळाली पहिली पसंत

Year Ender 2021: फिट राहण्यासाठी 2021 मध्ये या 5 गोष्टींना लोकांची मिळाली पहिली पसंत

गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. या साथीच्या आजाराला बळी पडू नये म्हणून लोक आता आरोग्याबाबत खूप जागरूक (Health Awareness) झाले आहेत, याचा परिणाम म्हणजे 2021 मध्येही लोकांनी त्यांच्या फिटनेसबाबत (Fitness) अनेक पद्धतींचा अवलंब केला.

गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. या साथीच्या आजाराला बळी पडू नये म्हणून लोक आता आरोग्याबाबत खूप जागरूक (Health Awareness) झाले आहेत, याचा परिणाम म्हणजे 2021 मध्येही लोकांनी त्यांच्या फिटनेसबाबत (Fitness) अनेक पद्धतींचा अवलंब केला.

गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. या साथीच्या आजाराला बळी पडू नये म्हणून लोक आता आरोग्याबाबत खूप जागरूक (Health Awareness) झाले आहेत, याचा परिणाम म्हणजे 2021 मध्येही लोकांनी त्यांच्या फिटनेसबाबत (Fitness) अनेक पद्धतींचा अवलंब केला.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 26 डिसेंबर : कोरोना महामारीने (Corona Pandemic) जगभरातील लोकांना आरोग्याबाबत खूप सतर्क केलं आहे. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. या साथीच्या आजाराला बळी पडू नये म्हणून लोक आता आरोग्याबाबत खूप जागरूक (Health Awareness) झाले आहेत, याचा परिणाम म्हणजे 2021 मध्येही लोकांनी त्यांच्या फिटनेसबाबत (Fitness) अनेक पद्धतींचा अवलंब केला आहे. योगापासून ते होम जिमपर्यंत प्रयत्न अनेक पद्धतींचा वापर केला गेला. तंदुरुस्त राहण्यासाठी लोकांनी फिटनेस गॅजेट्सचीही मदत घेतली. याचा फायदा असाही झाला आहे की, आता लोकांचे शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारले आहे. 2021 सालातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊयात, ज्याचा वापर आरोग्य चांगले राखण्यासाठी करण्यात आला. 2021 हे वर्ष आरोग्य सुधारण्याचे नावीन्यपूर्ण नवीन मार्ग शोधण्याचे (Year Ender 2021) वर्ष आहे. 1. फिटनेस गॅजेट्स (Fitness Gadgets) - फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी बाजारात अनेक फिटनेस गॅझेट्स आहेत. तुमची पावले मोजणारे फिटनेस बँड. याशिवाय, जर तुम्ही तुमच्या झोपण्याच्या चक्राचाही मागोवा घेतला, तर बाजारात अशीच आरोग्याशी संबंधित गॅजेट्स भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचदेखील यावर्षी खूप पसंत केले गेलीत. ज्याद्वारे हृदयाचे ठोके, नाडीचे दर यावर लक्ष ठेवले जाते. याशिवाय इतर अनेक गॅजेट्सच्या मदतीने लोकांनी त्यांच्या आरोग्याची माहिती जाणून घेतली. 2. खाण्याच्या सवयी - कोरोना महामारीपासून लोक त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल खूप जागरूक झाले आहेत. आपल्या आहारात अधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करत आहेत. लोकांनी दुग्धजन्य पदार्थ खाणे देखील वाढवले आहे आणि बरेच लोक शाकाहारी आहाराचे पालन करू लागले आहेत. या काळात अनेक सेलिब्रिटी केटो डाएटचे (Keto Diets) प्रमोशन करताना दिसले आणि काही वजन कमी करण्यासाठी लो कार्ब आणि प्रोटीन डाएट घेतानाही दिसून आले. हे वाचा - Black carrots : कधी खाल्लं आहे का काळं गाजर; ‘या’ जीवघेण्या आजारावरही आहे प्रभावी 3. योग - शरीर निरोगी ठेवण्यासाठी जगभरात योगाचा अवलंब केला गेला आहे. भारताशिवाय अनेक देशांमध्ये या वर्षी योगा अधिक लोकप्रिय झाला आहे. निरोगी राहण्यासाठी प्रथम बरेच लोक वजन कमी करण्याला, लिफ्टिंग आणि कार्डिओला प्राधान्य देत होते. परंतु, योगाने त्याची जागा वेगाने घेतली आहे. योगासने घरच्या घरी सहज करता येतात आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता नसते, त्यामुळेच लोकांना ती खूप आवडली. 4. होम जिम - व्यावसायिक व्यायामशाळांचा अनेक दशकांपासून लोक वापर करत होते. परंतु, कोरोना नंतर या वर्षी लोकांनी घरांमध्ये जिम बनवण्यामध्ये खूप रस दाखवला आहे. या वर्षी अनेकांनी व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी स्वत:च्या घरातच जिम तयार केली. घरात व्यायाम साहित्य घेऊन व्यायाम करणे महागडे असले तरीही लोकांना त्यात खूप रस आहे. हे वाचा - Weight Loss Tea: दालचिनीसोबत घरातीलच या गोष्टी घालून बनवा स्पेशल चहा; झपाट्यानं वजन होईल कमी 5. फिटनेस अॅप्लिकेशन्स - 2021 मध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षकांना खूप मागणी होती. याशिवाय मोठ्या संख्येने लोकांनी त्यांच्या आहार योजना (Diet Plan), वर्कआउट प्लॅन आणि टिप्ससाठी फिटनेस अॅप्लिकेशन्स साइन अप केले. यामुळेच या वर्षी अनेक फिटनेस प्रशिक्षकांनी ऑनलाइन कोचिंग देण्यास सुरुवात केली आहे.
First published:

Tags: Fitness, Health, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या