तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जांभया येतात तर वेळीच व्हा सावधान!

तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जांभया येतात तर वेळीच व्हा सावधान!

ज्यांना गरजेपेक्षा जास्त जांभया येतात, त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. जांभई येण्याचा थेट संबंध आरोग्याशी असतो.

  • Share this:

झोप आल्यावर किंवा शारीरिक थकवा जाणवल्यानंतर झोप येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. पण, ज्यांना गरजेपेक्षा जास्त जांभया येतात, त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. जांभई येण्याचा थेट संबंध आरोग्याशी असतो. अनेकदा आरोग्याशी निगडीत समस्या निर्माण झाल्यामुळे जास्त जांभया येतात. जास्त जांभया येणं हे कोणत्या प्रकारच्या आजारांचे संकेत देतात ते पाहू...

यकृत खराब होण्याचे संकेत- या स्थितीत शरीर लगेच थकतं. शरीर थकल्यामुळे जांभया यायला लागतात. त्यामुळे तुम्हाला जास्त जांभया यायला लागल्या तर यकृताची तपासणी वेळीच करून घ्या. या शिवाय सतत जांभया येत असतील तर हायपोथायरॉइड हा आजार असण्याचेही संकेत असू शकतात. शरीरात थायरॉइडचे हार्मोन कमी प्रमाणात बनण्यामुळे हा आजार होतो.

ब्रेन स्टेम जखमही असू शकते- काही संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, ब्रेन स्टेम जखमेमुळे अनेकदा जास्त जांभया येतात. पिट्यूटरी ग्लँड दाबले गेल्यामुळे जांभया येतात. असं जर सातत्याने होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यावा. याशिवाय तणावामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाची ठोकेही कमी पडतात. यामुळे मेंदूला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. अशावेळी जांभयामार्फत ऑक्सीजन शरीरात पोहोचतो. त्यामुळे सतत जांभया येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

मधुमेहात हायपोग्लाइसीमियाच्या सुरुवातीचे संकेत-  जास्त जांभया येणं हे मधुमेहात हायपोग्लाइसीमियाच्या सुरुवातीचे संकेत असू शकतात. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते तेव्हा जांभया यायला सुरुवात होते. अशात जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण आहात आणि तुम्हाला सतत जांभया येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

चिकित्सकांच्यामते, हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांमुळेदेखील जास्त जांभया येतात. जेव्हा हृदय आणि फुफ्फूसं योग्य काम करत नाही तेव्हा दम्याचा आजारही असू शकतो.

यापुढे मोमोज खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार, कारण...

घरात चुकूनही आणू नका या गोष्टी, पैसा फिरवेल पाठ

जिगरबाज असाल तर या 5 अॅडव्हेंचर जागांना भेट द्याल!

रक्षाबंधन: बहिणीचं टिळा लावणं असतं आरोग्यदायी, वाचा हे 7 फायदे

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

VIDEO : निवडणुका पुढे ढकलाव्यात? शरद पवार म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या