Redmi 8A फोन मिळतोय फक्त 149 रुपयांत; काय आहे एक्सचेंज ऑफर?

Redmi 8A फोन मिळतोय फक्त 149 रुपयांत; काय आहे एक्सचेंज ऑफर?

Xiaomi चा लेटेस्ट आणि स्वस्त फोन रेडमी 8 ए नुकताच लाँच झाला. Flipcart वर सुरू असलेल्या सेलमध्ये तो अवघ्या 150 रुपयात मिळू शकतो. त्यासाठी काय करायचं?

  • Share this:

मुंबई : अॅमेझॉनपाठोपाठ आता फ्लिपकार्टचा बिग दिवाली सेल Flipkart Big Diwali Sale सुरू झाला आहे. पुढचे 5 दिवस म्हणजे 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सपासून घरगुती वस्तूंपर्यंत आणि चपलेपासून कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींवर भरघोस सवलत देण्यात येत आहे.

स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल किंवा मोबाईल बदलायचा विचार करत असाल तर हा सेल मोठी संधी आहे. शाओमीचे लेटेस्ट फोन फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्वस्तात मिळत आहेत. या सेलमध्ये Red Mi 8A  वर मोठी ऑफर आहे.

संबंधित - IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

रेडमी 8A चे दोन व्हेरिअंट लाँच केले गेले आहेत. यापैकी 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेला फोन 6,499 रुपयांमध्ये आणि 3 GB रॅम 32GB स्टोरेजचा फोन 6,999 रुपये या किमतीत मिळणार आहे.

संबंधित - तोच रंग, तीच स्टाईल आणि नवा अंदाज, लिमिटेड JAWA जिंकण्याची 'ही' आहे संधी!

Flipcart ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना या फोनवर एक्सचेंज ऑफरसुद्धा मिळणार आहे. 2 जीबी व्हेरिअंटच्या फोनवर 6350 रुपयांची सूट मिळणार आहे. म्हणजे हा फोन फक्त 149 रुपयांत मिळू शकेल. पण तुमच्या जुन्या फोनचं एक्सचेंज मूल्य तपासून मगच ही सवलत दिली जाणार आहे.

संबंधित - स्मार्टफोन तुमच्या जीवावर उठलाय, वाचून तुम्हालाही धक्का बसेल

3 जीबी रॅमचा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये घ्यायचा तर त्यावर 6800 रुपयांची सूट आहे. याशिवाय SBI च्या कार्डाने पेमेंट केलं तर 10 टक्क्यांची सवलत मिळू शकेल.

RedMi 8A ची वैशिष्ट्यं

रेडमी 8A ला 6.22 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनवर गोरिला ग्लास 5 चं प्रोटेक्शन आहे.

उत्तम कॅमेरा आणि फेस अनलॉक

रेडमी 8 फोनला Sony IMX363 सेन्सर 12 मेगापिक्सेल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. F /1.8 लेन्स याबरोबर येते. फ्रंट कॅमेरासुद्धा 8 मेगापिक्सेलचा आहे. शिवाय आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पोर्ट्रेट मोड यात आहे. फेस अनलॉक फीचरसुद्धा देण्यात आलं आहे. चेहऱ्यापुढे धरल्यावर आपोआप फोन अनलॉक होईल.

-----------------------------

अन्य बातम्या

रस्त्याशेजारी जोडपं करत होतं SEX, गुगलने काढलेल्या फोटोने खळबळ

सावधान! तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोपता? आजच बदला ही सवय

आऊट झाला की नाही? अश्विनच्या मिस्ट्री बॉलनं सगळेच चक्रावले, VIDEO VIRAL

झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 08:55 PM IST

ताज्या बातम्या