थंडा थंडा कूल ‘स्कूल’: या देशात -50 डिग्री सेल्सियस तापमानातही विद्यार्थी जातात शाळेत

थंडा थंडा कूल ‘स्कूल’: या देशात -50 डिग्री सेल्सियस तापमानातही विद्यार्थी जातात शाळेत

आपल्याकडे थंडीत किमान 7 ते 8 अंश सेल्सियस तापमान असलं तरी आपल्याला हूडहुडी भरते. पण जिथे उणे 50 अंश सेल्सियस तापमान असूनही तिथली मुलं नियमितपणे शाळेत जातात.

  • Share this:

ओएमयाकोन, 12 डिसेंबर : आपल्याकडे  थंडीत सकाळी लवकर उठून शाळेला जाणं म्हणजे अगदी शिक्षा वाटते, पण तुम्हाला माहित आहे का? जगात अशी एक शाळा आहे, जी उणे 50 अंश सेल्सियस तापमान असणाऱ्या भागात आहे आणि ती जगातील सर्वांत थंड शाळा म्हणून ओळखली जाते. तरीही  तिथं मुलं नियमितपणे येतात. ही शाळा जगातली सर्वांत थंड ठिकाणांपैकी (Most Coldest School in World) एक आहे.

जगातील सर्वात थंड शाळा आहे तरी कुठे?

अशी ही जगावेगळी शाळा सायबेरियातील ओएमयाकोन (Oymyacon) शहरात आहे. या शहरात बँक, पोस्ट ऑफीस आदी आवश्यक सुविधाही आहेत. 1932 मध्ये रशियाचे अध्यक्ष स्टॅलिन यांच्या कार्यकाळात ही शाळा सुरू करण्यात आली. इथं खारा तुमुल (Khara Tumul) आणि बेरेग युर्डे (Bereg Yurde) या गावातील मुलं येतात. ज्या वेळी इथलं तापमान उणे 52 (-52) अंश सेल्सियसवर जातं तेव्हाच ही शाळा 11 वर्षं किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बंद असते. इथल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत नित्यनेमानं शाळेत येणाऱ्या या मुलांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. ही मुलं कधी आपल्या पालकांबरोबर येतात, तर कधी एकटी किंवा आपल्या कुत्र्यासोबत शाळेत येतात असं आज तकच्या वृत्तात म्हटलं आहे.

-52 अंश सेल्सियस तापमानातही आहे कोरोनाच सावट?

अशा या अतिथंड दुर्गम भागातही कोरोनाची (Corona Virus) साथ पसरली आहे. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून ही शाळा सुरू आहे. शाळेत येणारी मुलं, त्यांना सोडायला आलेले पालक आणि शिक्षक व इतर कर्मचारी या सगळ्यांना कोविड 19 च्या (Covid 19) सुरक्षा नियमांचं पालन करावं लागतं. प्रत्येकाचे तापमान चेक केल्यानंतरच त्यांना शाळेत सोडलं जातं.

उणे 50 अंश सेल्सियस तापमानात हायपोथर्मियाचा (Hypothermia) धोका असतो. यामध्ये शरीराचं तापमान वेगानं कमी होऊ लागतं. ज्यामुळं उच्च रक्तदाब (High Blood pressure), हृदयाची गती वाढणं, जीव घाबरा होणं अशी लक्षणं दिसतात. काही वेळा तर व्यक्तीचा मृत्यूही होतो. अशा तापमानात श्वास घेणं कठीण जात असल्यानं अनेकजण दीर्घ श्वास घेतात; पण हे धोकादायक ठरू शकतं. डॉक्टर अशा तापमानात दीर्घ श्वास घेऊ नये असं सांगितलं जातं. कारण एक तर अशा तापमानात त्यातही दीर्घ श्वास घेतला तर अतिथंड हवा फुफ्फुसात जाते आणि धोका निर्माण होतो. यावरून अशा वातावरणात दैनंदिन जीवन किती आव्हानात्मक असेल, याची कल्पना येते. अशा परिस्थितीतही लहान मुलांचं शाळेत जातात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

इथला स्थानिक फोटोग्राफर सेम्योन यानं या शाळेचे, गावाचे काही फोटो टिपले आहेत. त्याच्या फोटोवरून कल्पना येते की बर्फाच्छादित रस्ते, घरं, झाडं, सभोवतीदेखील बर्फच बर्फ अशा वातावरणात मुलांना शाळेत येणं किती कठीण जात असेल, पण सायकलवरून किंवा चालत ही मुलं शाळेत येताना दिसतात. सायबेरिया टाईम्सला आपला अनुभव सांगताना सेम्योन नावाचा म्हणाला, मी आठ डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता इथं फोटो काढत होतो. त्यावेळी इथलं तापमान होतं उणे 51 अंश सेल्सियस. फोटो काढताना ग्लोव्हज घालणं त्रासदायक होतं; पण मी ग्लोव्हज घातले नसते तर, माझी बोटं आखडून गेली असती. अतिथंडीत फ्रॉस्ट बायटिंगचा (Frost byte) धोका मोठा असतो. यामध्ये हातापायांची बोटं काळीनिळी पडतात. बोटं कापण्यापर्यंत वेळ येऊ शकते, इतकं हे धोकादायक असतं. यावरून लक्षात येईल की या शाळेत येणारी मुलं किती आव्हानांचा सामना करतात.

Published by: News18 Desk
First published: December 12, 2020, 6:58 PM IST

ताज्या बातम्या