OMG! उघड्यावर अण्डरवेअर सुकत घालण्यावर बंदी; जगातील हे विचित्र नियम माहीत आहेत का?

OMG! उघड्यावर अण्डरवेअर सुकत घालण्यावर बंदी; जगातील हे विचित्र नियम माहीत आहेत का?

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंडरवेअर सुकवत असल्याचा अजब आरोप या शिक्षकावर करण्यात आला आहे.

  • Share this:

भ्रष्टाचाराविरोधात गेल्या 23 वर्षांपासून धरणावर बसलेल्या शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंडरवेअर सुकवत असल्याचा अजब आरोप या शिक्षकावर करण्यात आला आहे. महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवल्याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरूद्ध कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला जगभरातील असे काही विचित्र नियम सांगणार आहोत जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील.

- अमेरिकेतील मिनिसोटा राज्यात विचित्र नियम आहेत. तिथे महिला आणि पुरुष त्यांचे अण्डरपॅन्ट एकत्र सुखवू शकत नाहीत.

- 1947 मध्ये जपानने वेश्या व्यवसायासाठी वेगळा कायदा तयार केला होता. या कायद्याला फुवेहो (Feuiho) असं म्हणायचे. त्या दिवसांमध्ये क्लब हे मनोरंजनासाठी जाण्याचं ठिकाण समजल जायचं. याशिवाय मध्यरात्रीनंतर नाचण्यासाठी खास लायसन्स घेतलं जायचं. या नियमाच्या विरोधात प्रसिद्ध संगीतकार रुइचि सकामोतोने एक अभियान सुरू केलं होतं. तेव्हा जाऊन जवळपास 67 वर्षांनी 2015 मध्ये हा कायदा जपान सरकारने रद्द केला.

- रूसमध्ये ईमो फॅशनची आवड असणारे किशोरवयीन मुलं जास्त प्रमाणात आत्महत्या करताचे दिसण्यात आले. यानंतर ईमो फॅशन आणि त्याच्याशी निगडीत कपड्यांवर बंदी घालण्यात आली.

- जर तुम्ही डेनमार्कमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या मुलांचं नाव स्वतःच्या मर्जीने ठेवू शकत नाही. सरकारने मान्य केलेल्या 7 हजार नावांच्या यादीतूनच तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव निवडावं लागेल. याशिवाय पहिलं नाव अशा पद्धतीने ठेवावं लागेल ज्यातून बाळाचं लिगं कळेल. जर तुम्हाला त्या 7 हजार नावांपेक्षा वेगळं नाव ठेवायचं असेल तर स्थानिक चर्च आणि सरकारकडून त्याची मान्यता घ्यावी लागेल.

- तुम्हाला जॉगिंग करण्याची आवड असली तरी बुरुंडीमध्ये तुम्ही जॉगिंग करू शकत नाही. मार्च 2014 मध्ये पूर्व आफ्रिकेच्या या देशातील राष्ट्रपतींनी जॉगिंग करण्यावर बंधन आणले. यामागचं कारण देताना राष्ट्रपतीं म्हणाले की, लोक समाजविघातक कार्यांसाठी जॉगिंगची मदत घेतात.

- 1998 मध्ये अमेरिकी अभिनेत्री क्लेर डेन्सने मनीलाबद्दल नकारात्मक टिपणी केली होती. ती म्हणाली होती की, तिथे झुरळासारखा वास येतो. तिने याव्यतिरिक्तही अनेक विवादास्पद टिपण्या केल्या होत्या. त्यानंतर सिटी काउंसिलने तिला शहरात यायला मनाई केली होती. याशिवाय तिच्या सर्व सिनेमांवर बंदी घातली होती.

- सिंगापुर सरकारने 2004 मध्ये च्युइंग गमवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे साफ सफाई करण्यास त्रास होत असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली.

- मिलान जेव्हा ऑस्ट्रियामध्ये होते तेव्हा तिथे एक नियम तयार करण्यात आला होता. त्या नियमानुसार शहरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असणं गरजेचं आहे. फक्त अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात चेहऱ्यावर उदासिनता असेल तर दंड लागणार नाही.

- इराणमध्ये पाश्चिमात्य हेअरस्टाइलवर बंदी आहे. जर कोणत्या सलॉनने हा नियम पाळला नाही तर त्यांचं लायसन्स रद्द केलं जाऊ शकतं.

- उत्तर कोरियामध्ये तर असे अनेक विचित्र कायदे आहेत. तिथे निळ्या रंगाची जीन्स घालण्यावर बंदी आहे. पश्चिमी संस्कृतीपासून उत्तर कोरियाचा बचाव करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आल्याचं किम जोंगने सांगितलं.

- ग्रीस सरकारने ऑनलाइन जुगारावर रोख लावण्यासाठी कॉम्प्युटर आणि मोबाइल फोनवर खेळण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक गेमवर बंदी घालण्यात आली आहे. ग्रीस सरकारला ऑनलाइन जुगार आणि व्हिडीओ गेममध्ये फरक करू शकत नसल्याचं नुकसान पर्यटकांना होतं. पर्यटकांना त्यांच्या मोबाइलमध्ये गेम ठेवल्यामुळे मोठा दंड भरावा लागतो किंवा तुरुंगात जावं लागतं.

Research- ...म्हणून महिलांना असतो पुरुषांपेक्षा कमी पगार

तुमच्यासाठी फायदेशीर आहे धनुरासन, जाणून घ्या आसन करण्याची योग्य पद्धत

5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल

आज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं!

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 22, 2019 02:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading