मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जगातील सर्वात लहान चमचा पाहिलात का? तुमचं नखही आहे त्यापेक्षा मोठं, गिनीज बुकात नोंद

जगातील सर्वात लहान चमचा पाहिलात का? तुमचं नखही आहे त्यापेक्षा मोठं, गिनीज बुकात नोंद

world small spoon

world small spoon

रोज स्वयंपाकावेळी किंवा जेवणावेळी आपण चमच्याचा वापर करतो. यात छोट्या चमच्यापासून सूप पिण्यासाठीच्या मोठ्या चमच्यापर्यंतचा समावेश असतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 27 जानेवारी :    देशातील कलाविश्व प्रतिभावान कलाकारांमुळे सातत्याने समृद्ध होत असतं. खास कलाकृतींमुळे काही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. या खास कलाकृतींना जगभरातील रसिकांकडून दाद मिळत असते. खास कलाकृतींमुळे काही कलाकार विश्वविक्रमदेखील करतात. सध्या अशाच एका कलाकाराचे नाव जोरदार चर्चेत आहे. राजस्थानमधील जयपूर येथील नवरत्न प्रजापती नावाच्या एका कलाकराने जगातील सर्वात लहान चमचा तयार केला आहे. या चमच्याची उंची नखांपेक्षा ही कमी आहे. या अनोख्या कलाकृतीमुळे नवरत्न यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.

    आपण कटलरीत वेगवेगळ्या आकाराची, डिझाइन्सची भांडी पाहतो. यापैकी बरीच भांडी तर रोजच्या वापरातील असतात. रोज स्वयंपाकावेळी किंवा जेवणावेळी आपण चमच्याचा वापर करतो. यात छोट्या चमच्यापासून सूप पिण्यासाठीच्या मोठ्या चमच्यापर्यंतचा समावेश असतो. बाजारात विविध प्रकारचे, आकाराचे चमचे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लहान चमच्याविषयी सांगणार आहोत. हा चमचा एक इंचाचा आहे. राजस्थानमधील जयपूर येथील नवरत्न प्रजापती नावाच्या कलाकाराने हा सर्वात लहान चमचा तयार केला आहे. या चमच्याची उंची केवळ दोन मिमी आहे. हा चमचा माणसाच्या नखापेक्षाही छोटा दिसतो. या चमच्यात साखरेचे दोनच दाणे बसू शकतात. विशेष म्हणजे नवरत्नच्या या अनोख्या कलाकृतीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ने घेतली असून, या विक्रमाची नोंद सुद्धा करण्यात आली आहे.

    हेही वाचा -  Optical Illusion : जंगलात लपलंय अस्वल! कोणी हुशारच शोधू शकेल, हातात फक्त आठ सेकंदाचा वेळ

    यापूर्वी सर्वात लहान लाकडाचा चमचा बनवण्याचा विश्वविक्रम तेलंगणातील गौरीशंकर गुम्मडीधला या कलाकाराच्या नावावर होता. त्यांनी 2021 मध्ये 4.5 मिमी लांबीचा लाकडी चमचा तयार केला होता. जानेवारीच्या सुरुवातीला उडिशातील मिनिएचर आर्टिस्ट सत्यनारायण महाराणा यांनी जगातील सर्वात लहान दोन हॉकी स्टिक तयार केल्या होत्या. यापैकी एका स्टिकची उंची 5 मिमी तर रुंदी 1 मिमी होती. दुसऱ्या स्टिकची उंची 1 सेमी तर रुंदी 1 मिमी होती.

    जयपूरमधील नवरत्न प्रजापती हे या पूर्वी पेन्सिलच्या टोकावर भगवान महावीर यांची मूर्ती आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचे मातीचे अचूक शिल्प बनवल्यामुळे चर्चेत होते. 2006 मध्ये त्यांनी जगातील सर्वात लहान कंदील बनवला होता. त्यासाठी नवरत्न यांना लिम्का वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते. रॉकेलच्या तीन ते चार थेंबांवर हा कंदील काही सेकंद चालू शकत होता. आता प्रजापतींनी जगातील सर्वात लहान चमचा तयार केला असून त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉड्समध्ये झाली आहे.

    या विषयी बोलताना प्रजापती म्हणाले, 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड हे रेकॉर्डमधील कोहिनूर हिरा मानले जाते. हा सन्मान मिळाल्यानंतर माझ्या डोक्यावर सर्वात शानदार मुकुट ठेवला गेला आहे, असं मला वाटतं. भविष्यात अशा छोट्या -छोट्या गोष्टी बनवून त्यांचे संग्रहालय उभारायची माझी इच्छा आहे'. सध्या प्रजापतींनी तयार केलेला नखापेक्षा लहान आकाराचा चमचा जोरदार चर्चेत आहे.

    First published:

    Tags: Lifestyle