Home /News /lifestyle /

जगातील सर्वात लहान Fridge; जो साध्या डोळ्यांनी तुम्हाला दिसणारच नाही

जगातील सर्वात लहान Fridge; जो साध्या डोळ्यांनी तुम्हाला दिसणारच नाही

डोळ्यांनाही न दिसणारा फ्रिज (nano fridge) नेमका वापरायचा तरी कसा आणि हा फ्रिज आहे तरी कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

    कॅलिफोर्निया, 25 नोव्हेंबर : आपण आपल्या गरजेनुसार फ्रिज (fridge) घेतो. काहींच्या घरात मोठे फ्रिज असतात तर काहींच्या घरात लहान. अगदी एखाद्या गाडीत ठेवता येईल, असे फ्रिजही आपण पाहिले आहेत. मात्र शास्त्रज्ञांनी आता असा फ्रिज तयार केला आहे, जो जगातील सर्वात लहान फ्रिज आहे आणि साध्या डोळ्यांनी तुम्हाला दिसणार नाही. डोळ्यांनाही न दिसणारा फ्रिज नेमका वापरायचा तरी कसा आणि हा फ्रिज आहे तरी कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा फ्रिज म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील फ्रिज नाही. तर हा नॅनो फ्रिजच्या (nano fridge) रूपात एक थर्मोमॉलिक्युलर कूलर आहे. ज्याचा उपयोग थंड करण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यासाठी होणार आहे. ACS नॅनो या जर्नलमध्ये नुकतंच याबाबतचा संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाला. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने 100 नॅनोमीटर जाडीचं थर्मोमॉलिक्युलर कूलर तयार केलं आहे. एक नॅनोमीटर म्हणजे मिलिमीटरचा दशलक्षावा भाग. आणखी सोपं म्हणजे मिलिमीटरचे दहा लाख भाग केले तर त्यातील एका भागाला एक नॅनोमीटर म्हणतात. त्यामुळे हा फ्रिज फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या माध्यमातूनच पाहता येतो. दोन वेगवेगळे सेमिकंडक्टर आणि मेटॅलिक प्लेटने तयार होणाऱ्या उपकरणांना थर्मोइलेक्ट्रिक उपकरण म्हणतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी बिस्मथ टेल्युराइड आणि अँटिमोनी-बिस्मथ टेल्युराइड हे दोन प्रमाणित सेमिकंडक्टर वापरले. स्कॉचटेपचा वापर करून त्यांनी या सेमिकंडक्टरचे फ्लेक्स मिळवले आणि त्यापासून 1 क्युबिक मायक्रोमीटरचं नॅनो उपकरण तयार केलं.  ते एका बाजूला थंड असतात पण त्यांची दुसरी बाजू गरम असते आणि या तापमानातील फरकामुळे वीज तयार होऊ शकते. कॉम्प्युटर आणि थर्मोरेग्युलेट फायबर-ऑप्टिक नेटवर्क्सना थंड करण्यासाठी या अतिसूक्ष्म उपकरणाचा वापर होतो. हे वाचा - एका चिमुरडीनं केली Googleची मदत, हटवले 4 कोटींची कमाई करणारे धोकादायक अ‍ॅप्स अशाच पद्धतीचं एक उपकरण नासाच्या व्हॉएजर या अवकाशयानाला चार दशकांपासून ऊर्जा पुरवतं आहे. भविष्यात ही उपकरणं कारच्या एअर कंडिशनिंगसाठी आणि एक्झॉस्टमध्येही वापरता येऊ शकतात. हीच प्रक्रिया उलट केली तर तिचा उपयोग कूलिंगसाठी करता येऊ शकतो. जेव्हा एका बाजूला इलेक्ट्रिक करंटचा पुरवठा केला जातो तेव्हा त्या दोन्ही बाजू अनुक्रमे थंड आणि गरम होऊ शकतात. या परिणामाचा उपयोग कूलर किंवा रेफ्रिजरेटर म्हणून केला जाऊ शकतो.  सध्या आपण वापरत असलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हेपर कॉम्प्रेशन यंत्रणेच्या जागी या नव्या छोट्या उपकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करता येऊ शकतो असं या संशोधकांचं मत आहे. हे वाचा - सावधान! फेक ऑक्सिमीटर App वापरणं ठरू शकतं धोकादायक तरीही जोपर्यंत हे उपकरण मोठ्या प्रमाणात वापरण्यासाठीचा मार्ग शोधत नाहीत तोपर्यंत हे उपकरण खूपच कमी प्रमाणात असतील. आताच्या घडीला ही उपकरणं मोठ्या प्रमाणात वापरली तरीही गरजेइतकी वीज किंवा थंडावा निर्माण करू शकत नाहीत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Techonology

    पुढील बातम्या