घटस्फोटानंतर 'ही' होणार जगातली सर्वांत श्रीमंत महिला

जगातल्या सर्वांत श्रीमंत माणसाची ही पत्नी आता त्याच्यापासून घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहे... काय आहे लग्नाची आणि श्रीमंतीची गोष्ट?

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 09:52 PM IST

घटस्फोटानंतर 'ही' होणार जगातली सर्वांत श्रीमंत महिला

अॅमेझॉन.कॉम या ई कॉमर्स कंपनीचे मालक आहेत जेफ बेझॉस. जगातली या घडीची सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.

जेफ बेझॉस सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या डिव्होर्सच्या बातमीनं. आपली पत्नी मॅकेन्झी हिच्याशी 25 वर्षं संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे.

जेफ बेझोस हे आजच्या घडीचे जगातले सर्वांत श्रीमंत उद्योजक आहेत. ऑनलाईन शॉपिंग पोर्टल अॅमेझॉन.कॉमचे ते मालक. लवकरच त्यांच्या या प्रचंड संपत्तीची वाटणी होणार आणि त्यांच्याजवळ राहणार फक्त अर्धा वाटा. कारण आहे घटस्फोट.

Loading...

ही आहे अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांची पत्नी मॅकेंन्झी बेझॉस. नवरा- बायको दोघांनीही 25 वर्षांच्या संसारानंतर आपण वेगळे होत असल्याची घोषणा ट्विटरवरून केली.

जेफ बेझॉसशी घटस्फोट झाल्यानंतर पत्नी मॅकेंन्झी यांना त्यांच्या संपत्तीचा वाटा मिळणार आहे.

असं बोललं जातंय की, घटस्फोटानंतर मॅकेन्झीला एवढा पैसा मिळणार आहे की ती जगातली सर्वांत श्रीमंत महिला होण्याची शक्यता आहे.

अॅमेझॉनचा पसारा वाढवण्यात जेफ बेझॉसला मॅकेन्झीचीही चांगली साथ लाभली आहे. अॅमेझॉनच्या सुरुवातीच्या काळात जेफच्या बरोबरीने प्लॅनिंग आणि मार्केटिंगची कामं बायकोनं केली होती.

48 वर्षांच्या मॅकेन्झी यांचं अॅमेझॉनमध्ये मोठं योगदान असल्याचं मानलं जातं. या दोघांची पहिली भेट झाली होती न्यूयॉर्कमध्ये एका इंटरव्ह्यू दरम्यान.

जेफ बेझॉस तेव्हा डीई शॉ नावाच्या न्यूयॉर्कच्या नामांकित कंपनीत वाईस प्रेसिडंट होते. रिसर्चर म्हणून इंटरव्ह्यू द्यायला आल्या होत्या मॅकेन्झी. अखेर त्यांना ही नोकरीही मिळाली आणि त्यांची बसायची जागाही जेफ बेझॉस यांच्या केबिनला लागून होती.

मॅकेन्झी सांगतात की, त्या वेळी जेफ एवढ्या जोरात हसायचा की आवाज केबिनबाहेर येत असे. लवकरच दोघांचं लंच डेटला जाणं सुरू झालं. तीन महिन्यात एंगेजमेंटसुद्धा झाली आणि पुढच्या तीन महिन्यात त्यांचं लग्नसुद्धा झालं.

जेफ आणि मॅकेन्झी यांचं लग्न झालं 1993 मध्ये. त्या वेळी जेफ 29 वर्षांचा आणि मॅकेन्झी 23 वर्षांची होती.

लग्नानंतर एका वर्षातच जेफ बेझॉसनं आपली भल्या थोरल्या पगाराची आणि प्रतिष्ठेची नोकरी सोडली आणि आपण अॅमेझॉन.कॉम नावाची ई शॉपिंगची कंपनी सुरू करणार असल्याचं पत्नीला सांगितलं. मॅकेन्झीनं या निर्णयाला पाठिंबा दिला.

अॅमेझॉन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जेफ आणि मॅकेन्झी कंपनीच्या प्लॅनिंगसाठी देशभर फिरत होते. सुरुवातीच्या काळात अॅमेझॉन कंपनीच्या कामात मॅकेन्झी हातभार लावत असे. हळूहळू अॅमेझॉन.कॉमचं जाळं पसरत गेलं आणि ती भलीमोठी ई कॉमर्स कंपनी बनली.

अॅमेझॉनचे जेफ आणि मॅकेन्झी बेझॉस यांच्याकडे जग एक आदर्श उद्योजक दांपत्य म्हणून पाहायला लागलं. त्याच वेळी या दोघांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे.

मॅकेन्झी अमेरिकेतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठ्या झाल्या होत्या. त्यांचे वडील फायनान्शिअल प्लॅनर होते.

स्वतः मॅकेन्झी यांनी नंतरच्या काळात लेखिका म्हणून नाव कमवायला सुरुवात केली होती. त्यांच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

जेफ आणि मॅकेन्झी यांचा हा जुना फोटो. लग्नानंतर काही काळातच दोघांनी अॅमेझॉन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हाचा.

जेफ आपल्या पत्नीचं वर्णन करताना स्मार्ट, रिसोर्सफुल, ब्रेनी आणि हॉट अशी विशेषणं वापरत असत.

जेफ आणि मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत. आपण विभक्त होत असलो तरी कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र असू, असं या दोघांनीही ट्विटरवर म्हटलं आहे.

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जेफ बेझॉस यांची संपत्ती सध्या 137 अब्ज डॉलर एवढी आहे आणि ते जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. घटस्फोटानंतर संपत्तीची वाटणी झाली, तर मॅकेन्झीला अर्धी संपत्ती मिळेल. याचा हिशोब केला तर 69 अब्ज डॉलर एवढी होईल.

सध्या जगातली सर्वांत श्रीमंत महिला आहे लॉरिएल ब्युटी प्रॉडक्ट्सची मालकीण. फ्रान्स्वा बेटेनकोर्ट मेयर्स ही लॉरिएलची मालकीणीची संपत्ती 45.6 अब्ज डॉलर आहे.

पण जेफ आणि मॅकेन्झीचा घटस्फोट झाला तर त्यांची संपत्ती विभागली जाईल. जगातला नंबर एकचा श्रीमंत माणूस बराच खालच्या नंबरवर पोहोचेल.

नजिकच्या काळात लॉरेज सँचेझ या आपल्या नव्या गर्लफ्रेंडबरोबर जेफ अनेक वेळा दिसले होते. हिच्यामुळेच नवरा- बायकोमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 09:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...