मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

OMG! जगातलं सर्वात महागडं Gold Sandwich; खाण्यासाठी मोजावे लागतील तब्बल 16000 रुपये

OMG! जगातलं सर्वात महागडं Gold Sandwich; खाण्यासाठी मोजावे लागतील तब्बल 16000 रुपये

World's Most Expensive Sandwich : जगातील सर्वात महाग गोल्डन सँडविच (Golden Sandwich) तयार करणारे शेफ सांगतात, हे सँडविच कमीत कमी 48 तास आधी ऑर्डर करावं लागतं.

World's Most Expensive Sandwich : जगातील सर्वात महाग गोल्डन सँडविच (Golden Sandwich) तयार करणारे शेफ सांगतात, हे सँडविच कमीत कमी 48 तास आधी ऑर्डर करावं लागतं.

World's Most Expensive Sandwich : जगातील सर्वात महाग गोल्डन सँडविच (Golden Sandwich) तयार करणारे शेफ सांगतात, हे सँडविच कमीत कमी 48 तास आधी ऑर्डर करावं लागतं.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 20 जुलै: सँडविच (Sandwich) खाल्लं नाही अशी एकही व्यक्ती नाही. बहुतेकांचा तर सकाळचा ब्रेकफास्टच सँडविच असतो. सँडविच बऱ्याच प्रकारचे असतात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवरून त्याची किंमत (Sandwich price)  वाढते. पण जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंत महाग सँडविच मिळेल. फार फार तर दोन ते तीन हजारपर्यंत. नाही का? पण तुम्हाला आश्चर्य वाटेल जगातील सर्वात महाग सँडविच (World's Most Expensive Sandwich) तब्बल 16 हजार रुपयांना आहे.

आता इतकं महाग सँडविच मिळतो तरी कुठे आणि त्यात इतकं काय खास आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जगातील सर्वात महाग सँडविच मिळतं ते अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये. Serendipity 3 Restaurant हे सँडविच तयार होतं. गेल्या 7 वर्षांपासून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये  ( Guinness World Records) याची जगातील सर्वात महाग सँडविच म्हणून नोंद आहे.

Quintessential Grilled Cheese असं या सँडविचचं नाव आहे. गोल्डन सँडविच (Golden Sandwich) म्हणूनही हे ओळखलं जातं. कारण यावर सोन्याचा वर्क लावण्यात आला आहे.

हे वाचा - आश्चर्यच! आंबटही लागतं गोड; Miracle Fruit चवच बदलून टाकतं, कशी होते ही जादू?

Quintessential Grilled Cheese हे फ्रेंच पुलमॅन शॅम्पेन ब्रेडच्या (French Pullman Champagne) दोन पीसपासून तयार केलं जातं. त्यानंतर सँडविचला Dom Perignon champagne आणि सोन्याच्या खाता येईल अशा वर्कपासून तयार केलं जातं. सँडविचमध्ये ट्रफल बटर आणि जगातील दुर्मिळ असं  Caciocavallo Podolico cheese चाही वापर होतो. हे चीझ दक्षिण इटलीतून आयात केलं जात. एका विशिष्ट प्रजातीच्या गायीच्या दुधापासून ते तयार केलं जातं. ही गाय फक्त दोन महिनेच दूध देते. या सँडविचमध्ये वापरले जाणारी खास सामग्रीच त्याला जगातलं सर्वात महाग सँडविच बनवतात.

सँडविच तयार झाल्यानंतर ते सर्व्ह करण्याची पद्धतची हटके आहे. सँडविच एका खास South African Lobster Tomato Bisque डिपसोबत क्रिस्टल प्लेटमध्ये सर्व्ह केलं जातं. सर्व्ह करण्यापूर्वी चार मिनिटं त्याला ग्रिल केलं जातं, जेणेकरून चीझ बबल होणं सुरू होईल.  याचा कुरकुरीतपणा आणि क्रीम टेस्ट पूर्णपणे वेगळी आहे.

हे वाचा - हृदय निरोगी ठेवायचंय? सकाळच्या नाश्त्यात करा 'या' गोष्टींचा समावेश

हे सँडविच तयार करणारे शेफ सांगतात, सँडविच कमीत कमी 48 तास आधी ऑर्डर करावं लागतं. कारण यामध्ये वापरले जाणारे पदार्थ जमवणं थोडं कठीण काम असतं. आता तुम्हाला हे सँडविच खायचं असेल तर यासाठी तब्बल 214 डॉलर  म्हणजे 16000 रुपये मोजावे लागतील. इतकं महाग सँडविच खाण्याची तुमची तयारी आहे का?

First published:

Tags: Food, Lifestyle, Record, World record