• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • कमीत कमी वेळेत या 4 मिरच्या खाल्ल्या तरी तुमचा होईल वर्ल्ड रेकॉर्ड

कमीत कमी वेळेत या 4 मिरच्या खाल्ल्या तरी तुमचा होईल वर्ल्ड रेकॉर्ड

ही मिरची जगातली सर्वात तिखट मिरची (World’s spiciest chilly) म्हणून ओळखली जाते.

  • Share this:
मुंबई, 15 ऑक्टोबर : आपल्याकडे बऱ्यापैकी तिखट खाल्लं जातं. नाशिकची मिसळ, नागपूरचे तर्रीपोहे, कोल्हापूरचा तांबडा रस्सा किंवा मग विदर्भातलं सावजी चिकन आणि संपूर्ण राज्यात आवडीने खाल्ला जाणारा मिरचीचा ठेचा. हे सगळे पदार्थ तिखट (Spicy food) नसतील तर मजाच नाही! पण आपल्या सर्वांच्याच तिखट खाण्याला मर्यादा आहे. आपल्या घरच्या साध्या मिरच्या असतील, तर त्या आपण एका वेळी कदाचित दोन-तीन खाऊ शकतो. अगदीच चॅलेंज दिलं तर आणखीही खाऊ शकतो; पण जगात अशा प्रकारच्या मिरच्या आहेत, की त्या प्रकारच्या मिरच्या आतापर्यंत कोणीही एक व्यक्ती तीनपेक्षा (World’s hottest chilly) जास्त खाऊ शकलं नाही. आम्ही ज्या मिरचीबाबत सांगत आहोत, ती आपल्या नेहमीच्या मिरचीपेक्षा तब्बल 440 पटींनी (440 times hotter than regular chilli) अधिक तिखट आहे. ती जगातली सर्वात तिखट मिरची (World’s spiciest chilly) म्हणूनही ओळखली जाते. या मिरचीचं नाव आहे कॅरोलिना मिरची. एका व्यक्तीने दहा सेकंदांमध्ये अशा तीन (Three Carolina chillies) मिरच्या खाऊन गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव (Carolina chilli eating record) नोंदवलं आहे. यापूर्वी कोणीही या मिरच्या एवढ्या कमी वेळात एवढ्या संख्येने खाल्ल्या नव्हत्या. या मिरचीचा अगदी छोटासा तुकडाही तुमचा घाम काढू शकतो. हे वाचा - आजाराने गाठली Height! इतकी उंच वाढली महिला की झाला वर्ल्ड रेकॉर्ड ही मिरची दिसायला खरं तर आपल्याकडे मिळणाऱ्या जाड लाल मिरचीप्रमाणे असते. मात्र गुणधर्मांच्या बाबतीत ही खूपच वेगळी आहे. चिनी प्लांटवर एका विशिष्ट प्रकारे या मिरचीचं उत्पादन घेतलं जातं. 2013 साली या मिरचीला जगातली सर्वांत तिखट मिरची (Carolina Chilli) म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळालं. यासोबतच, 2017 मध्येही पुन्हा कॅरोलिनाला सर्वात तिखट मिरचीचा दर्जा मिळाला होता. या मिरचीपूर्वी त्रिनिदाद स्कॉर्पियन बच टी (Trinidad Scorpion Butch T) या मिरचीला सर्वांत तिखट मानलं जात होतं. अमेरिकन केमिकल सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, मिरचीमध्ये कॅप्सिसिन (Capsaicin) नावाचं केमिकल असतं, त्यामुळेच मिरचीला तिखटपणा येतो. जेव्हा हे केमिकल मानवी पेशींच्या (Tissues) संपर्कात येतं, तेव्हा त्या ठिकाणी जळजळ सुरू होते. आपल्या जिभेमध्ये TRPV1 पेन रिसेप्टर (Pain receptor) असतो आणि तो मेंदूला संदेश पोहोचवण्याचं काम करतो. हा रिसेप्टर जेव्हा कॅप्सिसिनच्या संपर्कात येतो, तेव्हा तो मेंदूला असा संदेश देतो, की हा पदार्थ आपल्याला नको आहे. कॅरोलिना मिरचीमध्ये हे केमिकल अगदीच मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे तिला जगातली सर्वांत तिखट मिरची मानलं जातं. मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी हीट लेव्हल या एककाचा वापर केला जातो. कॅरोलिनाची (Carolina chilli heat level) हीट लेव्हल तब्बल 16,41,183 एवढी आहे. हे वाचा - OMG! चक्क डोक्यावर ठेवली 735 अंडी; VIDEO पाहून तोंडात घालाल बोटं आपल्याकडे बरेच जण आपण किती तिखट खाऊ शकतो याबाबत बढाया मारताना दिसून येतात. तुम्हीही त्यापैकी एक असाल, तर कॅरोलिना मिरची खाण्याचं चॅलेंज तुम्ही घ्याल? या मिरच्या तुम्ही तीनपेक्षा जास्त खाल्ल्या तर कदाचित तुम्हाला वर्ल्ड रेकॉर्डही करता येईल.
First published: