आता पुरुषांसाठी आलं गर्भनिरोधक इंजेक्शन, 13 वर्षांपर्यंत टेंशन नाही!

आता पुरुषांसाठी आलं गर्भनिरोधक इंजेक्शन, 13 वर्षांपर्यंत टेंशन नाही!

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 नोव्हेंबर : आतापर्यंत महिला गर्भनिरोधक इंजेक्शन्स वापरत होत्या. पण आता असे इंजेक्शन लवकरच पुरुषांसाठीही येणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेतली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, इंजेक्शनच्या यशस्वी चाचणीनंतर ते ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. आरएस शर्मा यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. आर. एस शर्मा म्हणाले की, गर्भनिरोधक इंजेक्शन वापरासाठी तयार आहे पण औषध नियंत्रकाची मंजुरी मिळण्याचं बाकी आहे. इंजेक्शनच्या तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. इंजेक्शनचा तिसरा टप्प्यात 303 लोकांवर चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 97.3 टक्के यश मिळाले आहे.

इतर बातम्या - गर्लफ्रेंडसाठी छातीवर झेलली गोळी, स्वत: बाईक चालवत गेला रुग्णालयात

या इंजेक्शनद्वारे कोणतेही दुष्परिणाम झालेले समोर आले नाहीत. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून या इंजेक्शनला मंजुरी मिळाल्यानंतर हे जगातील प्रथम पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शन असेल. गर्भनिरोधकाच्या नावाखाली आतापर्यंत फक्त पुरुषांसाठी नसबंदी होती. आयसीएमआरने केलेले हे इंजेक्शन 13 वर्ष काम करेल. यानंतर, त्याची गर्भनिरोधक क्षमता संपेल.

मोठी बातमी - हैदराबाद बलात्कार प्रकरणी धक्कादायक खुलासा, आरोपींनीच केली गाडी पंक्चर आणि...

2016मध्ये अमेरिकेतही असेच औषध कार्यरत होते, परंतु त्याचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर त्याची चाचणी थांबविण्यात आली. आयसीएमआरचे गर्भनिरोधक इंजेक्शन हे भूल देऊन दिले जाईल. हे इंजेक्शन टेस्टिकल जवळील शुक्राणू ट्यूबमध्ये दिले जाईल. हे पुष्कळ शुक्राणूंना अंडकोष बाहेर काढण्यापासून प्रतिबंधित करते.

इतर बातम्या - शरद पवारांची ऐवढी काळजी कोणीच घेतली नसेल, तरुण शेतकऱ्याने केला 200 किमी प्रवास आणि...

First published: November 30, 2019, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading