Home /News /lifestyle /

जीवघेण्या बॅक्टेरियांचं घर; 'या' लायब्रेरीत कित्येक वर्षे जिवंत आहेत 6000 पेक्षा जास्त बॅक्टेरिया

जीवघेण्या बॅक्टेरियांचं घर; 'या' लायब्रेरीत कित्येक वर्षे जिवंत आहेत 6000 पेक्षा जास्त बॅक्टेरिया

फोटो - PIXABAY

फोटो - PIXABAY

इथं 1915 सालापासून असलेला बॅक्टेरिया (bacteria) अजूनही जिवंत आहे.

    लंडन, 15 जून : एकिकडे जगभरात कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र ब्रिटनमधील एका लायब्रेरीत कित्येक वर्षांपासून हजारो जीवघेणे बॅक्टेरिया जिवंत आहेत. ही लायब्रेरी म्हणजे जीवघेण्या बॅक्टेरियांचं (bacteria library) घरच आहे. जिथं 6000 पेक्षा जास्त बॅक्टेरियांचा वास आहे. ब्रिटनमधील नॅशनल कलेक्शन टाइप्स कल्चर्स (National Collection of Type Cultures) या लायब्रेरीत जिवंत बॅक्टेरियांना जतन केलं जातं. जगातील ही सर्वात जुनी लायब्रेरी आहे, जिथं जिवंत आणि जीवघेणे बॅक्टेरिया ठेवले जातात. 1915 साली फ्रान्सच्या स्टेशनरी हॉस्पिटलमध्ये एक टेलिग्राम आला. ज्यामध्ये ब्रिटिश सैनिकांची तब्येत बिघडू लागल्याचं सांगण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि एका बॅक्टेरियामुळे सैनिकांची तब्येत बिघडत असल्याचं सांगितलं. या बॅक्टेरियाला  Shigella flexneri असं नाव देण्यात आलं. सेनेचे अधिकारी आणि बॅक्टेरियोलॉजिस्ट विलियम ब्रॉघटॉन अलकॉक यांनी या बॅक्टेरियाचा शोध लावला. त्यांनी बॅक्टेरियाला एका काचेच्या भांड्यात एक विशेष प्रकारचं लाकूड टाकून वरून पॅराफिन वॅक्सने सील करून या बॅक्टेरियाचं जतन केलं. हा बॅक्टेरिया अजूनही जिवंत आहे. याच बॅक्टेरियामुळे डायरिया होतो आणि आजही कित्येक मुलांचा मृत्यू होतो. हे वाचा - जगभरातील अशा लॅब जिथे कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसवर सुरू आहेत प्रयोग त्यानंतर या लायब्रेरीत वेगवेगळ्या ठिकाणांहून बॅक्टेरिया येतात. ज्यांच्यावर विशेष प्रक्रिया केली जाते आणि ते विशेष पद्धतीने जिवंत ठेवलं जातं. आतापर्यंत या ठिकाणी सहा हजारपेक्षा जास्त बॅक्टेरिया आहेत. का तयार करण्यात आली अशी लायब्रेरी? एका विशेष उद्देशाने ही लायब्रेरी तयार करण्यात आली. जगभरात जितकी लोकं व्हायरसने मरत नाहीत, त्यापेक्षा जास्त प्रत्येक वर्षी बॅक्टेरियामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांनी मरतात. बॅक्टेरियांनी शरीरावर हल्ला केल्यानंतर त्यांना कमजोर करण्यासाठी अँटिबायोटिक दिली जातात. मात्र हळूहळू या औषधांचाही बॅक्टेरियावर होत नाही, ज्याला अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स असं म्हणतात आणि असे बॅक्टेरिया आणि त्यावरील उपचारांचा अभ्यास करण्यासाठी ही लायब्रेरी तयार करण्यात आली आहे. या लायब्रेरीतील बॅक्टेरिया, त्यामध्ये होणारे बदलय यांचा अभ्यास केला जातो. बॅक्टेरियांमधील बदलांनुसार जुनी औषधंही बदलली जातात. हे वाचा - जगातील सर्वात डेंजर लॅब; जिवंत माणसांवर जीवघेणे प्रयोग, वाचून अंगावर येईल काटा न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार लायब्रेरीच्या मुख्य शास्त्रज्ञ सारा अलेक्झांडर सांगतात, 50 वर्षांपूर्वी स्ट्रेनसह हाताने लिहिलेला एखादा कागद यायाचं. ज्याच्यावर बॅक्टेरिया कुठून सापडला यासह मूळ माहिती असायची. मात्र आता हे पूर्ण जीनोम सिक्वेंसह पाठवलं जातं. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - ...म्हणून लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाले, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या