मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जगातील सर्वात महागड्या भाजीचं देशात होत आहे उत्पादन : चांदीपेक्षा आहे जास्त किंमत

जगातील सर्वात महागड्या भाजीचं देशात होत आहे उत्पादन : चांदीपेक्षा आहे जास्त किंमत

वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करावा. चांगला आणि हेल्दी आहार घेऊनही वजन कमी होतं. हिरव्या भाज्या,फळं खाणं यांचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो.

वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करावा. चांगला आणि हेल्दी आहार घेऊनही वजन कमी होतं. हिरव्या भाज्या,फळं खाणं यांचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो.

Hop Shoots या भाजीमध्ये असं काय आहे ज्यामुळे ह्याची किंमत नेहमी आकाशाला भिडलेली असते? जाणून घ्या या महागड्या भाजीचा इतिहास आणि वैशिष्ट्यं..

पाटणा, 5 फेब्रुवारी:  जगभरात अनेक भाज्यांचे उत्पादन घेतलं जातं. तुम्हाला विविध प्रकारच्या अनेक भाज्या माहीत असतील. पण जगभरातील सर्वां त मौल्यवान भाजी तुम्हाला माहीत आहे का? महत्त्वाचं म्हणजे या भाजीसाठी 17 व्या शतकात इंग्रजांना कायदा(British Law)  करावा लागला होता. या भाजीचं उत्पादन जगभरातील  मोजक्याच देशांमध्ये होतं. या भाजीला खूप जुना इतिहास असून नशेच्या पदार्थांमध्ये (Alcoholic Drink)  या भाजीचा वापर करण्यात येतो. याचबरोबर या भाजीमध्ये औषधी गुणधर्म( Medicine) असून औषधं तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला या भाजीविषयी सांगणार आहोत. या महागड्या भाजीचं आपल्या देशातही उत्पन्न होतं. बिहारमधले काही शेतकरी याचं उत्पन्न घेत आहेत.

या भाजीचा इतिहास

हॉप शूट्स(Hop Shoots) नावाच्या या भाजीची नुकतीच बिहारमध्ये लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या भाजीला हजारो वर्षांचा इतिहास असून याच्या पानांना हॉप्स असं म्हटलं जातं. हजारो वर्षांपूर्वी बिअरमध्ये कडूपणासाठी याचा वापर केला जात असे. त्यानंतर हळूहळू जेवणामध्ये चवीसाठी आणि औषधांमध्ये उपयोग होऊ लागला. याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर भाजी म्हणून देखील याचा वापर होऊ लागला. 8 व्या शतकात जर्मनीमध्ये याचं सर्वात आधी उत्पादन झाल्याचं प्रमाण मिळतात. यानंतर इंग्लंडबरोबर अनेक युरोपीय देशांमध्ये ही भाजी लोकप्रिय झाली. 16 व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये यावर प्रतिबंध घालण्यात आले होते तर जर्मनीमध्ये राजकाणार आणि धर्मामध्ये याची मागणी असल्यानं ही भाजी टॅक्समुक्त करण्यात आली होती. यावरून या भाजीचा इतिहास खूप जुना असल्याचं दिसून येत आहे. सध्या अमेरिकेत याचं सर्वात जास्त उत्पादन होत असून जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील मोजक्याच देशांमध्ये याच उत्पादन होत असून भारतात बिहारमध्ये याचं उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली आहे.

बिहारमध्ये कसं काय उत्पादन

  इंडियन व्हेजिटेबल रिसर्च इंस्टीट्यूट( Indian Institute of Vegetable Research) वाराणसीमध्ये या हॉप शूट्सची (Hop Shoots)  लागवड केली जाते. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी अमरेश सिंह यांनी याठिकाणाहून याचे बी आणून ते लावलं. याची लागवड केल्यानंतर हळूहळू त्यांना उत्पादन मिळू लागलं. महत्त्वाचं म्हणजे याच्या विशेष मागणीवरच या  हॉप शूट्सची खरेदी आणि विक्री केली जाते. त्यांनी सुरुवातीला याची लागवड केल्यानंतर 60 टक्के उत्पादन मिळालं. या पिकामधून इतर पिकांच्या तुलनेत 10 पट अधिक फायदा होता असल्याचं सिंह यांनी म्हटलं. बिहारसारख्या गरीब राज्यात या पिकामुळं शेतकऱ्यांचं नशीब बदलू शकतं असं मतदेखील सिंह यांनी व्यक्त केलं. याचबरोबर केंद्र सरकारने या पिकाच्या लागवडीमध्ये शेतकऱ्यांना मदत केल्यास शेतकऱ्यांच उत्पन्न 10 पट अधिक वाढणार असल्याचं मतदेखील याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

हॉप शूट्सची किंमत ?

आंतरराष्ट्रीय बाजारात हॉप शूट्सला (Hop Shoots) मोठी मागणी आहे. या भाजीचे वैज्ञानिक नाव हे Humulus Lupulus असून याची किंमत  ऐकून तुम्ही चकित व्हाल. या भाजीसाठी   आंतरराष्ट्रीय बाजारात 1 हजार पाउंड म्हणजेच जवळपास 87 हजार रुपये ते 1 लाख रुपये इतका किलोसाठी भाव आहे. सहा वर्षांपूर्वी देखील याच भावाने आंतरराष्ट्रीय बाजारात ही भाजी विकली जात होती. इटलीमध्ये वसंत ऋतूमध्ये येणाऱ्या पहिल्या उत्पादनासाठी थेट बोली लावली जाते. प्रतिकिलो 1 हजार युरो इतकी ही बोली लावली जाते.

इतकी महाग का ?

 या पिकाच्या पानांचा वापर भाजीप्रमाणे केला जातो. तर फळ, फुल आणि मुळांचा वापर देखील केला जातो. बिअर तयार करण्यासाठी आणि औषधी उदयॊगांमध्ये अँटिबायॉटिक तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. या झाडाच्या मुळांपासून बनवलेलं औषध टीबीच्या(TB) उपचारामध्ये उपयोगी ठरत असल्याचं देखील बिहारमधील शेतकरी अमरेश सिंह यांनी म्हटलं आहे. या पिकाचे उत्पादन करणे खूप अवघड काम आहे. लंडनमध्ये हॉप शूट्सची(Hop Shoots) विक्री करणाऱ्या  मेलिसा कोल यांच्या माहितीनुसार या पिकाचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते. याचबरोबर याच उत्पादन आणि निगा राखणं खूप अवघड काम आहे. काहीवेळा याच्या पानांची वाढ होत नसल्यानं मोठ्या क्षेत्रामध्ये याची लागवड केल्यास विक्रीयोग्य उत्पादन होतं. अतिशय दुर्मिळ आणि कमी उत्पादन होत असल्यानं याची किंमत जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आरोग्यासाठी खूपच लाभदायक

  या पिकाचा औषधी लाभाबरोबरच अनेक गोष्टींसाठी फायदा आहे. टीबीच्या(TB) उपचारावर उपयोगी असण्याबरोबरच कँसरवर(Cancer) देखील ही भाजी खूपच लाभदायक आहे. कँसरच्या पेशींना रोखन्यासाठी हॉप शूट्स खूपच फायदेशीर आहे. याचबरोबर महिलांच्या मोनोपॉज सारख्या समस्येवर देखील हॉप शूट्स फायदेशीर आहे. याचबरोबर इनसॉम्निया म्हणजेच झोप न येण्यावर देखील गुणकारी आहे.चिंता, हायपरॅक्टिव्हिटी, चिंताग्रस्तता, शरीरावर वेदना, अस्वस्थता, लैंगिक संसर्ग, धक्का, तणाव, दातदुखी, अल्सर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर देखील  हॉप शूट्स खूपच गुणकारी आहे. केसांमधील कोंडा म्हणजेच डँड्रफवर देखील हॉप शूट्स गुणकारी आहे.

खाण्यामध्ये या पद्धतीने होतो वापर

    हॉप शूट्स (Hop Shoots) ही भाजी उकडून खाल्ली जाते. इतर भाज्यांप्रमाणे देखील याचं सेवन केलं जाऊ शकतं. बटर किंवा विविध प्रकारच्या सॉसबरोबर या भाजी खाल्ली जाते. यीस्ट, कँडी आणि जिलेटिनमध्ये हॉप्सचा वापर केला जातो. याचबरोबर आईस्क्रीम, पुडिंग, बेक फूड, च्युइंगममध्ये देखील हॉप शूट वापरल्या जातात. हॉप शूट्सचं तेल काढून देखील वापरलं जाऊ शकतं.

First published:

Tags: Agriculture, Bihar, India, Organic farming, Vegetables