• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • जगातला Biggest Chicken egg roll भारतात; अगदी तुमच्या खिशाला परवडेल असा

जगातला Biggest Chicken egg roll भारतात; अगदी तुमच्या खिशाला परवडेल असा

Biggest Chicken egg roll चा व्हिडीओ पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.

  • Share this:
कोलकाता, 08 एप्रिल : तुम्ही स्ट्रीटफूडचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे! जगातला सर्वात मोठा 'चिकन एग रोल' आता (World's biggest Chicken egg roll) भारतात मिळतो आहे. कुठे मिळतोय हा तुमचा स्वाभाविक प्रश्न असेलच. गेस करा – दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे, बेंगळुरू.... थांबा थांबा थांबा तुमची यादी वाढत जाईल. आम्हीच सांगतो. हा चिकन एग रोल खाण्यासाठी तुम्हाला कोलकात्याला जावं लागणार आहे. कोलकात्यातील गरिया हाटवर असणाऱ्या एका दुकानामध्ये तयार करण्यात आलेला हा चिकन एग रोल जगातला सर्वात मोठा असण्याचा दावा करण्यात आला आहे. इंडियन इट मेनिया या इन्स्टाग्राम हँडलवरून या चिकन एग रोलचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
चार लच्छा पराठ्यांना जोडून तयार करण्यात आलेला हा चिकन एग रोल तब्बल 26 इंच लांब आहे. हा व्हिडिओ पाहिला की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि तो रोज खाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होईल. तुम्हीही आतुर झालात ना. पण आता इतका मोठा चिकन एग रोल म्हणजे त्याची किंमतही जास्तच असेल, असं तुम्हाला वाटेल. तर तसं बिलकुल नाही. हे वाचा - OMG! फक्त गोड नाही तर गोल्डही; दिसण्याप्रमाणेच भारी आहे या GOLD PAAN ची किंमत स्ट्रीट फूडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत. अगदी कमी किमतीत अप्रतिम चव यासाठीच स्ट्रीट फूडचे मोठ्या प्रमाणात चाहते असतात. या जगातल्या सर्वात मोठ्या चिकन एग रोलची किंमतही अगदी तुम्हाला परवडेल अशीच आहे. हा चिकन एग रोल एवढा स्वस्त आहे की अगदी'मंथ एंड'लाही तुम्ही हा खाऊ शकाल. अगदीच ताणून न धरता तुम्हाला सांगूनच टाकतो, हा चिकन एग रोल केवळ 349 रुपयांना उपलब्ध आहे. केवळ साडे तीनशे रुपयांच्या या चिकन एग रोलमध्ये व्हिप्ड एग्ज, मिक्स्ड व्हेजिटेबल्स, फ्राईड मटन कबाब, शामी कबाब आणि चिकन सीक कबाब एवढं सगळं भरलं आहे. बस्सं एवढंच? असा विचार करण्याआधी थोडं थांबा. कारण यातक्रंची अनियन, ग्रेटेड बॉईल्ड एग, मसाला, फायरी ग्रीन चिली सॉस, मेयोनीज आणि सर्वांच लाडकं'चीज'ही आहे! आहा... सर्व काही वाचूनच तोंडाला पाणी सुटलं ना? हे वाचा - केस कापताना लहान मुलांसारखा ढसाढसा रडू लागला; तरुणाचा सलूनमधील मजेशीर VIDEO पाहा मग, कधी जाताय जगातला सर्वात मोठा चिकन एग रोल खायला? लवकर लवकर जा,आणि हा रोल तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
First published: