जगभरातील शौचायलांचा संग्रह; स्वच्छतेची चळवळ राबवणाऱ्या भारतातलं Toilet Museum

World Toilet Day 2020 च्या निमित्तानं या अनोख्या Toilet Museum मध्ये नेमकं काय काय आहे पाहुयात.

World Toilet Day 2020 च्या निमित्तानं या अनोख्या Toilet Museum मध्ये नेमकं काय काय आहे पाहुयात.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : आतापर्यंत तुम्ही सुलभ शौचालयं पाहिली आहेत मात्र कधी सुलभ शौचालय म्युझियम (Sulabh International Museum) पाहिलं आहे का, म्युझियम आणि तेसुद्धा शौचालयाचं. सुरुवातीला थोडं विचित्रच वाटेल. असे बरेच म्युझियम तुम्ही पाहिले असतील, त्यांना भेट दिली असेल मात्र टॉयलेट म्युझियमला (toilet Museum) जाणं दूर तुम्ही कदाचित ऐकलंही नसावं. असं म्युझियम म्हणजे परदेशात वगैरे असेल असंच वाटेल. मात्र असं म्युझियम भारतातच आहे. 19 नोव्हेंबर वर्ल्ड टॉयलेट डे मानला जातो. त्यानिमित्तानं या अनोख्या टॉयलेट म्युझियमबाबत माहिती घेऊयात. भारतातील स्वच्छतेला चालना देण्याच्या प्रयत्नात सुलभ शौचालय हे संपूर्ण देशात कार्यरत आहे. सुलभ आंतरराष्ट्रीय समाजसेवा संस्था स्थापन करणारे बिंदेश्वर पाठक यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या संस्थेनंच 1992 मध्ये एक अनोखं असं सुलभ आंतरराष्ट्रीय शौचालय संग्रहालय (म्युझियम) देखील स्थापित केलं आहे. हे संग्रहालय नवी दिल्लीतील महावीर एन्क्लेव्हच्या परिसरात आहे. हे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन मुख्य विभागांमध्ये विभागले आहे. गेल्या पाच हजार वर्षांच्या कालावधीत शौचालय व्यवस्थेचा विकास या संग्रहालयात दर्शवला आहे. कालखंडानुसार शौचालयामध्ये आलेले विविध मॉडेल प्रदर्शित केली आहेत. जगभरातील स्वच्छतागृहांचा ऐतिहासिक प्रवास आपल्याला इथं पाहता येतोच पण यात शौचालयाच्या वापरावर आधारित कवितांचा संग्रह देखील ठेवण्यात आले आहेत. आधुनिक टॉयलेट पॅनच्या विकासाचीसुद्धा सविस्तर नोंद इथं केली गेली आहे. हे वाचा - Men's day - फक्त पुरुषांनाच बळावतोय हा कॅन्सर; लक्षणांकडे वेळीच द्या लक्ष पूर्वीच्या काळातील चित्रांनी हे संग्रहालय भरलेले आहे जे आपल्याला मनुष्य स्वच्छतेकडे कसे गेले याची कल्पना देतात. यात शौचालयाचं फर्निचर, प्राइव्हिज, चेंबरची पॉट्स, बायडेट्स आणि पाण्याची क्लॉसेट्स देखील आहेत. यात मध्ययुगीन कमोड्सची मॉडेल्स सुद्धा आहेत - ज्यात एक ट्रेजर चेस्टच्या आकारचा आहे. रोमन सम्राटांच्या सोन्या-चांदीच्या शौचालयातील भांडी यांचेही नमुने या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. हे वाचा -  Happy B'Day Sushmita: एका मेसेजमुळे सुरू झाली माजी मिस युनिव्हर्सची लव्ह स्टोरी या संग्रहालयात 1596 मध्ये सर जॉन हॅरिंग्टन नावाच्या एका दरबाराने रानी एलिझाबेथ I च्या कारकिर्दीत तयार केलेल्या फ्लश पॉटची नोंद आहे. हडप्पा संस्कृतीची ड्रेनेज सिस्टम जी इ.स.पूर्व 2500 वर्षं जुनी आहेत याचंदेखील डिस्प्ले या संग्रहालयात आहेत. मॉडेल्स व्यतिरिक्त जुन्या काळात अस्तित्त्वात असलेल्या सिंधू संस्कृती आणि युरोपियन देशांकडे जिथे प्रथम तंत्रज्ञान विकसित झालं तेथील स्वच्छता सिस्टमची माहिती इथं आहे.
    Published by:Priya Lad
    First published: