मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

World Teachers Day : बरोबर महिनाभराने पुन्हा शिक्षक दिन; काय आहे दोन्ही दिवसातील वेगळंपण?

World Teachers Day : बरोबर महिनाभराने पुन्हा शिक्षक दिन; काय आहे दोन्ही दिवसातील वेगळंपण?

दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जग जागतिक शिक्षक दिन साजरा करते. भारत, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्ससह 100 हून अधिक राष्ट्रे हा दिवस उत्साहाने साजरा करतात.

दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जग जागतिक शिक्षक दिन साजरा करते. भारत, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्ससह 100 हून अधिक राष्ट्रे हा दिवस उत्साहाने साजरा करतात.

दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जग जागतिक शिक्षक दिन साजरा करते. भारत, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्ससह 100 हून अधिक राष्ट्रे हा दिवस उत्साहाने साजरा करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 5 ऑक्टोबर : शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, अधिकार आणि मूल्य अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जग जागतिक शिक्षक दिन साजरा करते. भारत, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्ससह 100 हून अधिक राष्ट्रे हा दिवस उत्साहाने साजरा करतात. हा दिवस जगभरातील शिक्षकांना त्यांच्या देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाच्या भूमिकेसाठी सन्मानित करतो, जे शिक्षण देऊन लोकांचे जीवनमान सुधारते.

आपल्या सर्वांना माहित आहे की, आपण आपले महान शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी आपल्याकडे शिक्षक दिन साजरा केला जातो. परंतु जागतिक स्तरावर 5 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. UNESCO आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) ने 1966 मध्ये या मसुद्याला मान्यता दिली असली तरी 5 ​​ऑक्टोबर 1994 रोजी तो स्वीकारण्यात आला.

जगभरातल्या काही विचित्र शाळांमधले नियम माहिती आहेत का?

म्हणूनच जगभरातील शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांना मान्यता देण्यासाठी जगभरात कार्यक्रम आयोजित केले जातात. यासोबतच युनेस्को आणि इंटरनॅशनल एज्युकेशन सोसायटी विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षकांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक मोहीम राबवते. यासाठी UNESCO अनेक गैर-सरकारी संस्था आणि माध्यम संस्थांसोबत भागीदारीही करते.

जागतिक शिक्षक दिनाचा इतिहास

1966 मध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या बैठकीत शिक्षकांचे हक्क, जबाबदाऱ्या, रोजगार आणि पुढील शिक्षण याबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे सांगण्यात आले. जागतिक शिक्षक दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी युनेस्कोची शिफारस 1994 मध्ये संयुक्त राष्ट्रातील 100 देशांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आली. त्यानंतर 5 ऑक्टोबर 1994 पासून आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला.

वाचाल तर वाचाल अन् नवीन शिकाल, ज्ञान संपन्नही व्हाल; जाणून घ्या वाचनाचे काय आहेत फायदे

जागतिक शिक्षक दिनाचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचा उद्देश जगातील शिक्षकांचे कौतुक, मूल्यमापन आणि सुधारणेकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा आहे. या दिवशी अध्यापन आणि शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा करण्याची संधी असते. याशिवाय जगातील शिक्षकांची जबाबदारी, त्यांचे हक्क आणि पुढील शिक्षणासाठी त्यांची तयारी आणि दर्जा याला महत्त्व दिले जाते.

First published:

Tags: Health, Lifestyle, Teacher