World Suicide Prevention Day 2019: ...म्हणून महिलांपेक्षा पुरुष करतात सर्वात जास्त आत्महत्या

World Suicide Prevention Day 2019: ...म्हणून महिलांपेक्षा पुरुष करतात सर्वात जास्त आत्महत्या

WHO नुसार, जवळपास 3 हजार लोक दररोज आत्महत्या करतात. तसंच दररोज 20 पेक्षा त्याहून जास्त लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात.

  • Share this:

World Suicide Prevention Day 2019: भारतात अगदी आठ ते नऊ वर्षांच्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आत्महत्या करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. धक्कादायतक बाब म्हणजे दर वर्षी या संख्येत घट न होता ती वाढतच चालली आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरात दरवर्षी सुमारे आठ ते 10 लाख लोक आत्महत्या करत आहेत. भारतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नेटवर्क ऑन सुसाइड रिसर्च अँड प्रिवेन्शनच्या मते भारतात वर्षाला सर्वसाधारणपणे 2.3 लाख लोक आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवत आहेत. याचमुळे दरवर्षी 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. आत्महत्या रोखण्यासाठी जगभरात होत असलेल्या विविध कामांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

वर्षाला 10 लाख करतात आत्महत्या- WHO नुसार, जवळपास 3 हजार लोक दररोज आत्महत्या करतात. तसंच दररोज 20 पेक्षा त्याहून जास्त  लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोक आत्महत्येमुळे जग सोडून जातात. या सर्व कारणांमुळे पहिल्यांदा 2003 मध्ये जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन सुरू करण्यात आला. WHO हा दिवस सह-प्रायोजित करतं.

महिलांपेक्षा पुरुष करतात जास्त आत्महत्या- भारतात पुरुषांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण अधिक आहे. नैराश्य आणि तणावामुळे पुरुष जास्त आत्महत्या करतात असं म्हटलं जातं. याशिवायही अनेक मानसिक आणि आर्थिक कारणं आत्महत्येसाठी कारणीभूत आहेत. NCRB नुसार 2015 मध्ये भारतात 91 हजार 528 पुरुषांनी आत्महत्या केली होती. तर 2005 आणि 2010 मध्ये क्रमशः 66 हजार 032 आणि 87 हजार 180 पुरुषांनी आत्महत्या केली होती. या 15 वर्षांत महिलांच्या आत्महत्या करण्याच्या संख्येत फार कमी वाढ झाल्याचं दिसलं.

जाणून घ्या लो ब्लड प्रेशरची कारणं आणि लक्षणं

दररोज दोन केळी खाल्ल्यावर शरीरात होतील हे बदल

भर पावसात डेटवर जात असाल तर या गोष्टी एकदा वाचाच!

VIDEO : आदित्य ठाकरे लालबाग राजाच्या चरणी

First published: September 10, 2019, 2:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading