Home /News /lifestyle /

World sight day : तुमच्या डोळ्यांची दृष्टी किती तीक्ष्ण? घरच्या घरी करा ही सोपी Eye test

World sight day : तुमच्या डोळ्यांची दृष्टी किती तीक्ष्ण? घरच्या घरी करा ही सोपी Eye test

(फोटो सौजन्य - AFP Relaxnews/ karelnoppe/ Istock.com)

(फोटो सौजन्य - AFP Relaxnews/ karelnoppe/ Istock.com)

तुम्हालाही तुमच्या डोळ्याची दृष्टी कमकुवत झाल्याची शंका वाटत असेल तर घरबसल्या खात्रीही करून घ्या.

मुंबई, 15 ऑक्टोबर : सध्या आपण जेवढा वेळ जागे असतो, त्यापैकी बहुतांश वेळ मोबाइल, टीव्ही किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर असतो. त्यामुळे बऱ्याच जणांना डोळ्यांच्या समस्या (Eye problems) जाणवत असल्याचं दिसून येत आहे. तुम्हालाही तुमची दृष्टी कमकुवत (Vision problem) झाल्याची शंका असेल, तर घरबसल्याच काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही याबाबत खात्री करून घेऊ शकता (Eye test). कित्येक वेळा आपल्याला डोळ्यांचा तेवढा त्रास जाणवत नाही, पण दृष्टी कमकुवत झाल्याची भीती असते (Home eye test). अशा वेळी थेट डॉक्टरांकडे जावं की नाही याबाबत आपली द्विधा मनस्थिती झालेली असते (Eye test at home). अशा वेळी घरच्या घरीच एक छोटीशी टेस्ट (Home test to check eyes) करून आपल्या डोळ्यांच्या क्षमतेबाबत खात्री करू शकतो. डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर तेदेखील आपल्याला भिंतीवरची काही अक्षरं (Eye test at clinic) वाचण्यास सांगतात. डॉक्टर याला 6X6 चा नियम म्हणतात. यासाठी तुम्हाला फलकापासून सुमारे 20 फूट दूर बसवलं जातं. या फलकावर 6 ओळी असतात. या सहा ओळींमध्ये विविध अक्षरं मोठ्यापासून लहान आकारांपर्यंत लिहिलेली असतात. तुम्ही सर्वांत छोटी ओळ वाचू शकलात, तर तुमचे डोळे उत्तमरीत्या (Eye test at home) काम करत असल्याचं समजलं जातं. तुम्हाला सहापैकी कितवी ओळ वाचता येते यावरून तुमचे डोळे किती प्रमाणात चांगले आहेत, हे लक्षात येतं. हे वाचा - रडायला येत नसलं तरी डोळ्यातून सतत का येत पाणी? पण तुम्हाला घरच्या घरी टेस्ट करायची असेल तर तुम्ही टीव्हीची मदत घेऊ शकता. 'टीव्ही नाइन हिंदी'च्या रिपोर्टनुसार शार्प साइट आय हॉस्पिटलचे सहसंस्थापक आणि संचालक डॉ. समीर सूद यांनी सांगितलं, तुम्हाला घरातल्या (Vision test at home) टीव्हीपासून 10 फूट दूर उभं राहायचं आहे. तेवढ्या दूरून जर तुम्हाला बातम्यांच्या चॅनलवरची खालची पट्टी (Ticker headline) वाचता येत असेल, तर तुमचे डोळे अगदीच निरोगी आहेत असं म्हणण्यास हरकत नाही. डॉ. समीर यांनी सांगितलं, "खरं तर डोळ्यांची कोणतीही समस्या असल्याची शंका वाटल्यास डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. खबरदारी म्हणून तुम्ही आधी ही घरगुती टेस्ट (Eye test at home) करू शकता. यामध्ये तुम्हाला हेडलाइन नीट वाचता आली नाही, तर डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. यासोबतच, डोळ्यांतून सतत पाणी येत असेल तरीही तुम्ही डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे." हे वाचा - हिवाळा येतोय; वजन वाढून द्यायचं नसेल तर आहारात या भाज्यांचा समावेश ठरेल गुणकारी  "प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा (Frequent eye check-up is must) डॉक्टरांकडून डोळे तपासून घ्यायला हवेत. तसंच लहान मुलांचे डोळे दर सहा महिन्यांनी तपासायला हवेत.", असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
First published:

Tags: Eyes damage, Health, Lifestyle

पुढील बातम्या