मुंबई, 22 सप्टेंबर : सामान्यपणे मानवांचा विचार करता पुरुषांचे स्पर्म (Sperm) स्त्रियांच्या योनीत जास्तीत जास्त सात दिवसांपर्यंत टिकून राहतात. स्पर्म जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी स्पर्म बँकेत साठवले जातात. मात्र कोणताही स्पर्म फार फार तर किती काळ जुना असेल. याचा विचार आपण कधी केला आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10 कोटी वर्षे जुना स्पर्म आहे, जो संशोधकांना सापडला आहे.
जीवाश्म तज्ज्ञांनी तब्बल दहा कोटी वर्षांपूर्वीचा स्पर्म शोधला असून यातून प्रजननासंदर्भातील बरीच महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जीवाश्मात स्पर्म सापडणं तसं शक्य नसतं. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत ते शक्य होतं. असंच यश आता शास्त्रज्ञांना मिळालं आहे. त्यांना क्रस्टाशियन या प्राण्याचे जीवाश्म मिळाले आहेत. त्यात स्पर्म सापडला आहे, जो सर्वात जुना अर्थात दहा कोटी वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
हे वाचा - बोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना
क्रस्टाशियन हा एक म्यान्मानसाइप्रिस नावाच्या प्रजातीतील आहे. जो म्यानमारच्या किनारी क्षेत्रात आढळून येतो. या परिसरात मोठ्या प्रमणात झाडं असतात. झाडांमधून निघणाऱ्या अंबर या चिकट द्रवात अडकलेल्या 39 ऑस्ट्राकोड्सचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यापैकी एका ऑस्ट्राकोड मादामधून संशोधकांना हा स्पर्म मिळाला. जिनं मृत्यूच्या काही वेळ आधीच समागम केलं असावं. त्यानंतर ती झाडातून निघणाऱ्या एका चिकट पदार्थात अडकली असावी त्यामुळे हा स्पर्म जीवाश्मासोबत टिकून राहिला. असा अंदाज संशोधकांनी बांधला.
हे वाचा - मुझफ्फरपूरचा 'आयफेल टॉवर'! एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क
या आधी पाच कोटी वर्षांपूर्वीचा जीवाश्म स्पर्म हा अंटार्टिका येथे आढळून आला होता. आता सापडलेला हा स्पर्म दहा कोटी वर्षांपूर्वीचा आहे. प्रोसिडिंग्स ऑफ द रॉयल सोसायटीने हे संशोधन प्रसिद्ध केलं आहे. हे अत्यंत दुर्मिळ असून प्रजननाच्या माहितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे संशोधकांचे म्हणणं आहे.