World Mosquito Day : डासांना पळवायचंय? हे 6 उपाय करून पाहा

World Mosquito Day : डासांना पळवायचंय? हे 6 उपाय करून पाहा

डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी काही खास घरगुती पण प्रभावी उपाय

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारांची साथ वाढते. शहरी आणि ग्रामीण भागात डासांमुळे होणारे आजारा जास्त वाढतात. त्यामुळे डास चावू नयेत, घरात येऊच नयेत म्हणून काळजा घ्यायला हवी. साचलेल्या पाण्यात डेंग्युच्या डासाच्या अळ्या होतात. स्वच्छ पाण्यातही या डासांची मादी अंडी घालते. त्यामुळे फार दिवस पाणी भरून ठेवणं योग्य नाही. पाण्यावर झाकण ठेवणंही आवश्यक आहे. डासांना दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपायही करता येतील.

त्याचबरोबर काळजीही वाटते ती म्हणजे डासांची आणि डासांमुळे होण्याऱ्या आजारांची. कारण पावसाळ्यात डासांची पैदास खूप झपाट्याने होत असते.त्यामुळे आपण पावसात डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेची लिक्विड, कॉईल आणि मच्छरदाणीचा वापर करतो.

Sacred Games 2 अहं ब्रह्मास्मी! या ठिकाणी आहे गुरुजींचा आश्रम, तुम्हीही जाऊ शकता

इतके उपाय करूनही ताप, इनफेक्शन, सर्दी-खोकला, मलेरिया, डेंगूसारखे आजार होतातच. पण आता घाबरण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आहेत.

हे आहेत काही घरगुती उपाय?

1. स्वयंपाकघरात रोजच्या वापरात असलेला लिंबू कापून आपल्या शेजारी ठेवल्यास आजूबाजूला असलेले डास पळून जातात.

2. त्याचप्रकारे खोबरेल तेलात खोडी लवंग मिसळून त्वचेवर लावल्यास डास चावण्याची भीती नसते.

3. 4 ते 7 तुळशीच्या पानांचा रस लावल्यास डास चावत नाहीत.

4. संत्र्याच्या सुकवलेल्या साली कोळश्यावर भाजल्यास त्या वासाने डास नाहीसे होतात.

5. तसेच लिंबू मध्यभागी कापून त्यावर लवंग लावल्यामुळे डास जवळपास फिरकतही नाहीत.

6. बरेच जण संध्याकाळ झाली की डास येऊ नयेत म्हणून ऑल आऊट लावतात, तीच ऑल आऊटची बाटली रिकामी झाल्यास त्यामधे कडुलिंबाचे तेल आणि कापूर घालून ती लावा. असे केल्याने डास घरात येणार नाहीत.

------------------------------

VIDEO वाऱ्यासारखी भरधाव कार आली आणि लोकांना चिरडलं

First published: August 20, 2019, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading