डेंग्यू- मलेरिया झाला तर हे फळ आणि पानं ठरतील संजीवनी

डेंग्यू- मलेरिया झाला तर हे फळ आणि पानं ठरतील संजीवनी

डेंग्यूच्या रुग्णांसाठी पपईचं झाड हे संजीवनी आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णाला पपईच्या पानांचा रस दिला तर खूप फायदा होतो.

  • Share this:

मुंबई : डेंग्‍यू आणि मलेरिया हे डासांमुळे पसरणारे साथीचे रोग आहेत. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यूचा व्हायरस एडीस ईजिप्‍टाय डासांमार्फत एका माणसाच्या शरीरातून दुसऱ्यात जातो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी अशांना याची लागण लवकर होते. या आजाराची साथ येते, तेव्हा डासांचा नायनाट करणं अत्यावश्यक असतं.  फक्त घाण पाण्यातच नव्हे तर स्वच्छ पाण्यातसुद्धा या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे स्वच्छतेला जास्त महत्त्व द्यायला हवं. त्यातून या व्हायरसची लागण झालीच तर ताप, सर्दी, घसा दुखणे, सांधेदुखी अशी लक्षणं दिसतात. रुग्णाच्या रक्तातील प्लेटिलेट्सचं प्रमाण झपाट्याने कमी व्हायला लागतं आणि वेळीच उपचार मिळाले नाहीत, तर यात रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

डेंग्यूच्या रुग्णांसाठी पपईचं झाड हे संजीवनी आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णाला पपईच्या पानांचा रस दिला तर खूप फायदा होतो. डेंग्यूचा उपचार जितक्या लवकर सुरू होईल तितकं चांगलं. रुग्णाच्या लक्षणांवरूनच डेंग्यूचा उपचार केला जातो. डेंग्यू झालेल्या रुग्णाला पहिल्या दोन आठवड्यात खूप जास्त ताप येतो. त्याच्या शरीरातल्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. त्यावेळी पपई गुणकारी ठरू शकते.

वाचा - World Mosquito Day : डासांना पळवायचंय? हे 6 उपाय करून पाहा

डेंग्यूच्या रुग्णासाठी पपईच्या पानांचा रस अत्यंत गुणकारी आहे. पपईच्या पानांमध्ये chymopapin आणि papain अशी दोन एन्झाइम्स असतात. ही एन्झाइम शरीरातील रक्त प्रवाही ठेवतात. तसंच झपाट्याने कमी झालेल्या रक्तातल्या प्लेटलेट्स वाढवण्याचं काम करतात.

असा घ्या पपईचा रस

पपईची कोवळी पानं खुडून त्याचं देठ काढून घ्यावं. फक्त पानं स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करावी. त्यानंतर या मिश्रणामध्ये मीठ आणि थोडी साखर मिसळून घ्यावी. हा पपईच्या पानांता रस दिवसातून दोन वेळा रुग्णाला प्यायला द्यावा.

रुग्णाला कधी द्यावा पपईचा रस

डेंग्यूची लक्षणं दिसताच शक्य तितक्या लवकर रुग्णाला पपईच्या पानांचा रस द्यायला सुरुवात करावी. प्लेटलेट्स दीड लाखांपेक्षा कमी होण्याआधी रुग्णाला हा रस द्यावा.

हे पाहा - आता तर कहर झाला, सलाईनमध्ये आढळले किडे, VIDEO व्हायरल

कारण आजाराचं गांभीर्य वाढल्यास त्याचा उपयोग होत नाही. या  पपईच्या रसाचा काही अपाय किंवा साईड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे हा घरगुती उपचार लक्षणं दिसताच सुरू करायला हरकत नाही.

वैद्यकीय सल्ला आवश्यक - वास्तविक पाहता हा एक घरगुती उपाय आहे. डॉक्टरांनी सांगितलेला औषधोपचार टाळून हा घरगुती उपचार करू नका. डेंग्यूचं निदान करण्यासाठी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. डेंग्यू आजारांच्या रुग्णांना नियमित औषधोपचारांबरोबरच पपई खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातो.

देशात वर्षभरात 1.10 कोटी लोकांचा रोजगार गेला, अर्थव्यवस्थेबद्दल चिंता

आयुर्वेदात पपई आणि पपईच्या पानांचा रस हा गुणकारी मानण्यात आला असून रक्तातील प्लेटलेट वाढविण्यासाठी उपकारक ठरत असल्याचं आयुर्वेदिक डॉक्टार सांगितात. डेंग्यू आणि मलेरियामुळेही शरीरातील प्लेटलेटचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तापाची लक्षणं दिसली की पपईची आठवण ठेवायला विसरू नका.

---------------------------------

VIDEO: इस्रोने रचला नवा इतिहास; 7 सप्टेंबरला 'चंद्रयान-2' चंद्रावर उतरणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 06:40 PM IST

ताज्या बातम्या