सावधान ! त्वचेवरील छोट्याशाही डागाकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

सावधान ! त्वचेवरील छोट्याशाही डागाकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

त्वचेवरील हा डाग महाभयंकर अशा कुष्ठरोगात (Leprosy) बदलू शकतो. महात्मा गांधी यांनी कुष्ठरोग निर्मूलनासाठी कार्य केलं. त्यामुळे 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांचा पुण्यतिथीदिन जागतिक कुष्ठरोग दिन (World Leprosy Day) म्हणून मानला जातो. त्यानिमित्ताने कुष्ठरोगाबाबत माहिती करून घेऊयात.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : त्वचेवर एक छोटा डाग असेल, तर सामान्य म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात त्वचेवरील हा डाग महाभयंकर अशा कुष्ठरोगात बदलू शकतो. कुष्ठरोगाचं वेळीच निदान झाल्यास त्यावर उपचार करून तो बरा करता येऊ शकतो. त्यामुळे कुष्ठरोगाबाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

कुष्ठरोग म्हणजे काय

कुष्ठरोग हा आजार मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे (Mycobacterium leprae) या जीवाणूंमुळे होतो. हे जीवाणू हळूहळू वाढतो. त्यामुळे कुष्ठरोगाची लक्षणं दिसून येण्यास अनेक वर्षे जातात. त्वचेसह हा आजार चेतातंतूवरही परिणाम करतो.

लक्षणं

त्वचेवर चट्टे

त्वचेवरील चट्ट्यांना खाज येत नाही

ज्या भागावर चट्टे आहेत, तो भाग संवदेनाहिन असतो

तळव्यावर व्रण होणे

नाक बसणं

हातापायाची बोटे आखडणे किंवा वाकडी होणे

प्रसार

हा आजार आनुवंशिक नाही. हा सांसर्गिक आहे. म्हणजे रुग्णांच्या संसर्गाने एकमेकांत पसरतो.

सांसर्गिक कुष्ठ रुग्णांच्या श्वसनावाटे हे जंतू पसरतात.

शिंकण्या खोकण्यातून विशेष संख्येने जंतू उडतात.

प्रतिबंधात्मक उपाय

कुष्ठरोग झालेल्या रुग्णाने औषधोपचार करून संसर्ग थांबवणे

सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता

त्वचेवर चट्टे दिसताच तपासणी, चाचणी करून घेणे

First published: January 30, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या