Home /News /lifestyle /

हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी करू नये 'या' चुका, होऊ शकतात गंभीर परिणाम

हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी करू नये 'या' चुका, होऊ शकतात गंभीर परिणाम

ज्यांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांना आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण ही समस्या वाढत गेली तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रोक (Stock) आणि हार्ट अ‍ॅटॅकची (Heart Attack) शक्यता असते.

    मुंबई, 17 मे : बदलत्या काळासोबत आपली जीवनशैलीदेखील खूप बदलत आहे. आपला आहार, झोपेच्या वेळा यांच्यावर तर या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम झालाच आहे. परंतु, हल्ली बहुतांश लोक घरून काम करतात. किंबहुना वर्क फ्रॉम होमची संकल्पना सध्या रूढ झाली आहे. त्यामुळे लोकांची शारीरिक कामं आणि कष्ट कमी झाले आहेत. जास्त वेळ एका जागी बसून काम केल्यामुळे शारीरिक स्थूलपणाची समस्यादेखील वाढत आहे. हा स्थूलपणा आपल्या तब्येतीसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो. विशेषतः त्या लोकांसाठी हा जास्त हानिकारक असतो ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशरची (High Blood Pressure) समस्या आहे. हाय ब्लडप्रेशरला हायपरटेन्शन (Hypertension) असंदेखील म्हणतात. ज्यांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांना आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण ही समस्या वाढत गेली तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रोक (Stock) आणि हार्ट अ‍ॅटॅकची (Heart Attack) शक्यता असते. त्यामुळे बहुतांश तज्ज्ञ नेहमी हाय ब्लडप्रेशर असलेल्या लोकांना आपलं वजन आणि आहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. दरवर्षी 17 मे हा दिवस जागतिक हाय ब्लडप्रेशर दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज आम्ही तुम्हाला हाय ब्लडप्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. याबद्दलच सविस्तर वृत्त टीव्ही 9 हिंदीने प्रकशित केलं आहे. Eyes Care Tips: वारंवार पापण्यांना खाज सुटत असेल तर दुर्लक्ष नको; जाणून घ्या कारणे आणि उपाय सर्वांना तिखट, चमचमीत गोड अशा चवीचे पदार्थ खायला नेहमी आवडतात. मात्र, तुम्ही जेवणात मिठाचा वापर जास्त प्रमाणात करत असाल. तर तुमची ती सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. डब्ल्यूएचओनुसार (World Health Organization) बहुतांश व्यक्ती दररोज 9-12 ग्रॅम मीठ सेवन करतात. मात्र, जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्यामुळे हाय ब्लडप्रेशर आणि हार्टच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे तुमची हाडंदेखील कमकुवत होऊ लागतात. डब्ल्यूएचओनुसार प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण दिवसात किमान 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठाचं सेवन करू नये. त्याचप्रमाणे जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करणेदेखील टाळावे. जंकफूड आणि फास्टफूड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढतं (Weight Gain) आणि याचमुळे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) देखील वाढते. या दोन्हींचा एकत्रित परिणाम तुमच्या ब्लडप्रेशरवर होतो. त्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे टाळणे योग्य ठरते. व्यायाम हा शरीरासाठी नेहमी उत्तम मानला जातो. व्यायाम केल्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. मात्र, कुठलाही पद्धतीचा व्यायाम हाय ब्लडप्रेशरच्या लोकांसाठी सुरक्षित असतोच असं नाही. काही व्यायाम प्रकारांमुळे अशा लोकांना त्रासदेखील होऊ शकतो. त्यामुळे वेट लिफ्टिंग, स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, स्क्वॉश आणि स्प्रिंट मारणे यांसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीज हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतात. या अ‍ॅक्टिव्हिटीज केल्यामुळे त्यांचं ब्लडप्रेशर वेगाने वाढू लागतं. त्याचप्रमाणे जर एखादा व्यायाम प्रकार करताना तुम्हाला डोकं दुखणं, चक्कर येणं, थकवा जाणवणं किंवा मळमळणं अशा समस्या जाणवत असतील. तर तुम्ही त्वरित तो व्यायाम प्रकार करणं टाळावं. हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोणताही व्यायाम करणं आवश्यक आहे. काय सांगता! सातत्यानं डोकेदुखीचा त्रास होण्यामागं असू शकतात 'इतकी' कारणं हाय ब्लडप्रेशर असलेल्या लोकांनी नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यावी आणि त्यांनी दिलेल्या औषधांचं नियमित सेवन करावं. ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी औषधांचे नियमित व वेळेवर सेवन न केल्यास त्यांना अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याबरोबरच ब्लडप्रेशर नियमित तपासावं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळोवेळी नियमित तपासणी करावी. अशा रुग्णांनी मद्य आणि धूम्रपान करणं टाळावं. ही काळजी घेतल्यास हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांचा त्रास नक्कीच कमी होईल.
    First published:

    Tags: Health Tips, Heart Attack

    पुढील बातम्या