World Hypertension Day 2021: उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी करा हे व्यायाम

World Hypertension Day 2021: उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी करा हे व्यायाम

या व्यायामांमुळे केवळ उच्च रक्तदाबच नव्हे तर वजनही (Weight) नियंत्रित राहते, तसंच मानसिक आरोग्य देखील (Mental Health) चांगले राहते. या सर्वांचा परिणाम रक्तदाब (Blood Pressure) योग्य ठेवण्यास मदत करतो.

  • Share this:

मुंबई 17 मे: उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure -Hypertension) त्रास असेल तर विविध गोळ्या,औषधांच्या (Medicines) सहायानं तो नियंत्रित ठेवला जातो. अनेकांना आता आयुष्यभर दररोज औषधे घ्यावी लागणार याची काळजी सतावत असते. औषधांऐवजी रक्तदाब नियंत्रित करता यावा अशी अनेकांची इच्छा असते. आपल्या जीवनशैलीत (Lifestyle) व्यायामाचा (Exercise) समावेश केल्यास हे शक्य होऊ शकते.आजच्या जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त (World Hypertension Day) उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त व्यायामांविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या व्यायामांमुळे केवळ उच्च रक्तदाबच नव्हे तर वजनही (Weight) नियंत्रित राहते, तसंच मानसिक आरोग्य देखील (Mental Health) चांगले राहते. या सर्वांचा परिणाम रक्तदाब (Blood Pressure) योग्य ठेवण्यास मदत करतो.

कार्डिओ व्यायाम ठरतो सर्वोत्तम:

कार्डिओ व्यायाम(Cardio Exercise) हा आपल्या हृदयासाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे शरीरातील रक्त प्रवाह (Blood Circulation)वाढवण्यास मदत होते. कार्डिओ व्यायाम केल्यानं बर्‍याच कॅलरी (Calory)जळतात, त्यामुळं आपलं हृदय (Heart) निरोगी राहते. तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तरदररोज कार्डिओ व्यायाम करणं आवश्यक आहे. यासाठी दोरीच्या उड्या मारण्यासारखे किंवा शारीरिक कवायतीचे व्यायाम तुम्ही घरीच करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळ चालणे (Walking), नृत्य (Dance), दोरीच्या उड्या (Skipping), पोहणे (Swimming), सायकलिंग (Cycling) इत्यादी व्यायाम प्रकार कार्डिओ व्यायामामध्ये येतात. ह्रदय आणि रक्त प्रवाहासाठी हे व्यायाम खूपच फायदेशीर आहेत.

स्ट्रेंग्थट्रेनिंग:

स्ट्रेंग्थट्रेनिंगमुळे (Strength Training) मोठ्या प्रमाणात कॅलरी जळतात. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी ते आवश्यक असते. यामुळेस्नायू (Mussels) आणि हाडं देखील(Bones) मजबूत होतात. यामुळं तुम्ही कार्डिओ व्यायाम करण्यास अधिक सक्षम होऊ शकता. स्ट्रेंग्थ ट्रेनिंगसाठी एखाद्या प्रशिक्षकाची मदत घेतल्यास अधिक उत्तम ठरेल.

स्ट्रेचिंगनं करा सुरुवात :

उच्च रक्तदाब असलेले लोक स्ट्रेचिंगचे(Stretching)व्यायाम करू शकतात.यामुळंरक्तदाब नियंत्रणात राहतो. मात्र हे व्यायाम करण्याची योग्य पध्दतजाणूनघेणं महत्त्वाचंआहे. यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा किंवाहेल्थ प्रोव्हायडरचासल्ला घेऊ शकता. योगासनांच्या(Yoga)मदतीनंदेखील स्ट्रेचिंगकरता येतं.

लिफ्टऐवजी पायर्‍या वापरा:

रक्तदाब कमी करण्याचा आणि हृदयाला निरोगी ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लिफ्टऐवजी(Lift)पायऱ्यांचा(Steps)वापर करणे.दररोजतुम्ही घरी किंवा कार्यालयात लिफ्टऐवजी पायऱ्यांचावापरकरतअसाल तरमोठ्या प्रमाणातकॅलरीजळतात. याचापरिणाम हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठीहोतो.त्यामुळंशक्यतोलिफ्टऐवजीपायऱ्यांचावापरकरा.

अॅक्टीव्हअसणे महत्वाचे:

-हार्टडॉट आर्गच्या(Heart.org)मते, हृदय, फुफ्फुस आणि रक्ताभिसरण चांगले ठेवण्यासाठी शरीराच्या हालचाली आवश्यक आहेत.

-आठवड्यात किमान अडीच तास शारीरिक व्यायाम करणं आवश्यक आहे.

-दिवसानुसार हिशेब केला तर आठवड्यातील पाच दिवस दररोज किमान अर्धा तास व्यायामासाठी काढणं आवश्यक आहे. एकाच वेळी शक्य नसेल तर दोन तीन टप्प्यातही करू शकता.

-लवचिकता आणि स्ट्रेंग्थ व्यायाम आवश्यक.

-आठवड्यातील किमान दोन दिवस मसल स्ट्रेंग्थ व्यायाम आवश्यकआहेत.

-व्यायामापूर्वी वॉर्म-अप आणि व्यायामानंतर कूल-डाउन आवश्यक आहे.

First published: May 17, 2021, 4:33 PM IST

ताज्या बातम्या