Home /News /lifestyle /

वयाच्या 26व्या वर्षी हृदय विकाराचा धक्का; तुम्हालाही आहे का 'ही' सवय

वयाच्या 26व्या वर्षी हृदय विकाराचा धक्का; तुम्हालाही आहे का 'ही' सवय

तरुणांमध्येही का वाढतोय हृदयविकाराचा धोका? काय आहे कारण...

    मुंबई, 27 सप्टेंबर : आज वर्ल्ड हार्ट डे आहे. कोरोना काळात यानिमित्तानं आपल्या हृदयाची काळजी अधिक घेणं आवश्यक आहे. यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे. आजकाल अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी सहज हृदयविकाराचा झटका आल्याची अनेक उदाहरणं अनेक बातम्या आपल्या कानावर येत असतात. हृदयविकाराचा झटका येण्यामागे नेमकं काय कारण असाव याचा जरासा मगोवा घेतला तर आपली बदललेली जीवनशैली आणि आहार असल्याचं लक्षात येईल. अपुऱ्या झोपेमुळे केवळ ताण, तणाव आणि थकावा येत नाही. तर याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर देखील होत असतो. तुम्ही 6 ते 7 तासाची झोप घेत नसाल तर त्यामुळे हृदय विकाराचा धक्का बसण्याची शक्यता वाढते. युनिव्हसिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाने 130 कर्मचाऱ्यांचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी होणारे सगळे कर्मचारी रात्री काम करुन दिवसा झोप घेणारे होते. या सर्व कर्मचाऱ्यांची झोप कमी होत असल्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते. हे वाचा-मंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत BPO ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला वयाच्या 26 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला. कामाचा अति ताण अपुरी झोप आणि बदलणारी शिफ्ट यामुळे दिवसेंदिवस बिघडणारी जीवनशैली. यामध्ये सतत बाहेरचं खाणं होत असल्यानं अपुरा आहार याचा हृदयावर नकळत परिणाम झाला आणि अर्थात ही झोप अनियमीत आणि अपुरी होती होती. त्याच्या जोडीला बाहेरचे जेवण आणि व्यायामाचा अभाव यामुळे मेहुलला हृदय विकाराचा झटका बसला. अपुऱ्या झोपेमुळे तणाव वाढल्याचे या सर्व्हेतून समोर आलं. हृदय विकाराच्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे कमी झोप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कमीत कमी सहा ते सात तास झोप घेतली पाहिजे. झोपेचे तास कमी झाले तर त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. जेव्हा झोप कमी होते तेव्हा तणाव वाढतो आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हे वाचा-VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष रात्री होणारे जागरण, सिगारेट, जंक फूड यामुळे हृदयावर ताण वाढतो. बऱ्याचदा आपण गरजेपेक्षा आपल्या शरीराला जास्त काम देतो त्यावेळी त्याचा परिणाम जाणवत नाही मात्र अपुरी झोप, अपुरा आहार यामुळे हृदयावर अनेकदा ताण येत असतो. बदललेली जीवनशैली यामुळे तरुणांमध्ये मधुमेह आणि रक्तदाब असे आजार दिसून लागले आहेत. या आजारांची पुढील पायरी म्हणजे हृदय विकार होय. याशिवाय अतिरिक्त ताण घेतल्यामुळे देखील हा धोका निर्माण होऊ शकतो असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या