धक्कादायक! देशात आपलं राज्य आहे नैराश्यग्रस्त; सर्वात जास्त आत्महत्या होतात महाराष्ट्रात

WHO या जागतिक आरोग्य संस्थेने नुकतीच आत्महत्येची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्या माहितीनुसार, जगभरातून दरवर्षी जवळपास 8 लाख लोकं आत्महत्येनं स्वतःचं आयुष्य संपवतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 08:19 PM IST

धक्कादायक! देशात आपलं राज्य आहे नैराश्यग्रस्त; सर्वात जास्त आत्महत्या होतात महाराष्ट्रात

मुंबई, 26 जुलै : आत्महत्यांचं प्रमाण वाढणे ही बाब  कोणत्याही देशासाठी चिंताजनकच आहे. World Health organization WHO या जागतिक आरोग्य संस्थेने नुकतीच आत्महत्येची आकडेवारी आणि त्याची कारणं याविषयीची माहिती प्रसिद्ध केली. त्यामधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या माहितीनुसार, जगभरातून दरवर्षी जवळपास 8 लाख लोकं आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवतात. म्हणजेच, दर 40 सेकंदांना एक व्यक्ती आपला जीव आत्महत्येनं गमावत आहे. WHO ने या संपूर्ण आकडेवारीला गंभीर समस्या असल्याचं सांगितलं आहे. भारतातली आकडेवारीही या निमित्ताने समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्र राज्य आत्महत्यांच्या आकडेवारीत देशात पहिल्या नंबरला आहे. त्यामागोमाग दुसऱ्या नंबरवर तमिळनाडू आणि तिसऱ्या नंबरवर पश्चिम बंगालचा समावेश आहे. भारताच्या आणि राज्याच्या भविष्यासाठी ही आकडेवारी नक्कीच एक चिंताजनक गोष्ट आहे. कारण, देशाच्या प्रगतीवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. WHO ने याविषयी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 15 ते 29 वयोटातल्य़ा युवकांचा आकडा सर्वाधिक आहे.

वाचाः तुम्ही रिकाम्या पोटी कॉफी घेता का? जाणून घ्या काय आहेत परिणाम

तरुण मुलांचं आत्महत्यांचं प्रमाण सर्वांत जास्त आहे.  या गटातील व्यक्ती शिक्षण किंवा नोकरीच्या शोधामध्ये असते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये आत्महत्या केलेले लोक हे कमी किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशाचे नागरिक होते. याचा अर्थ असा की, विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांमधील व्यक्तींनी सर्वाधिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

आपण 15 ते 29 या वयोगटाचा विचार केला तर लक्षात येईल, तरुण वर्गावर अभ्यास, शिक्षण, करिअर याचं खूप जास्त दडपण पाहायला मिळतं. हे दडपण, एकाच प्रकारचं नसून ते समाजाचं, घरचं, रिलेशनशिप, नोकरी, रोजगार आणि जबाबगारी याचं असतं.

Loading...

2016 मध्ये आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 25 टक्के विद्यार्थ्यांचा समावेश होता. ज्या विद्यार्थ्यांना परिक्षांमध्ये अपयश आलं आहे त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. अशा वेळी विद्यार्थ्यांना कॉउन्सेलिंगची गरज असते. National crime record Bureau च्या 2015 मधील रिपोर्टनुसार, एका तासाला एक विद्यार्थी स्वतःचं आयुष्य आत्महत्या करुन संपवतो.

वाचाः सोलो ट्रीपला जाण्यासाठी ही 4 ठिकाणी आहेत सगळ्यात भारी!

ही घटना इतकी भीषण आहे की, त्यामधील 20 टक्के लोक विष पिऊन, काही जण लटकून तर काहीजण आग पेटवून स्वतः मरण स्वीकारतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर मृत्यूचं पंधरावं कारण आत्महत्या हे असल्याचं सांगितलं गेलं आहे.

कोणत्या देशात किती आकडेवारी

पूर्व युरोपीय देशांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. ज्यामध्ये लिथुआनिया, बेलारूस, पोलंड आणि लातव्हिया या देशांचा समावेश आहे. पूर्व आशियाचा विचार करता दक्षिण कोरिया आणि दक्षिण आशियामध्ये श्रीलंका या देशांचा समावेश आहे. अफगाणिस्तानामध्ये आत्महत्येचं एकूण प्रमाण 5.5 टक्के, इराकमध्ये 3 आणि सीरियामध्ये 2.7 इतकं आहे कॅरीबियन द्विप समुहाच्या देशांमध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. ग्रेनेडा आणि बारबाडोस या कॅरीबियन देशांमध्ये आत्महत्येचं प्रमाण 0.5 आणि 0.4 टक्के इतकं आहे.

----------------------------------------------------------

पाण्यात नको ते धाडस करू नका, दुचाकीस्वार वाहून गेल्याचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...