कामाच्या अतिताणानं Burn Out झालात? ही थकावट नव्हे तर आजारच - WHO ने घेतली दखल

बर्न आऊट म्हणजे काय? तर मानसिक, इमोशनल म्हणजे भावनिक आणि शारीरिक थकवा

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 05:32 PM IST

कामाच्या अतिताणानं Burn Out झालात? ही थकावट नव्हे तर आजारच - WHO ने घेतली दखल

मुंबई, 28 मे : पहिल्यांदाच वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशननं (WHO) बर्न आऊट म्हणजेच थकावट हा आजार असल्याचं मान्य केलंय. इंटरनॅशनल क्लासिफिकेशन आॅफ डिसिज ( ICD ) याचा वापर निदान आणि आरोग्य विम्यासाठी केला जातो. त्यात बर्न आऊट या शब्दाला समाविष्ट केलंय. बर्न आऊट म्हणजे काय? तर मानसिक, इमोशनल म्हणजे भावनिक आणि शारीरिक थकवा. हा थकवा कामात बराच काळ तणाव अनुभवल्यामुळे होतो.  यामुळे भावनिक थकवा येतो. कशातच रस वाटेनासा होतो.

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय कामाच्या ठिकाणावरचा स्ट्रेस व्यवस्थित मॅनेज झाला नाही तर हा थकवा येतो.

HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या

नोकरीच्या ठिकाणावरचा थोडाफार तणाव हा असतोच. कर्मचाऱ्यांसाठी तो नवा नाही. पण वाईट पद्धतीचं व्यवस्थापन असल्यानं हा तणाव टोकाचा होतो. तो इतका वाढतो की व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते. इतर मानसिक आजारही सुरू होतात. नोकरीच्या ठिकाणी तणाव जास्त वाटत असेल, तर आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आरोग्यपूर्ण वातावरण राहील.

हर्बल टी घेणं चांगलं, पण सारखा प्याल तर होतील 'हे' दुष्परिणाम

Loading...

जागतिक आरोग्य संघटनेनं कामाच्या ठिकाणी सहा महत्त्वाच्या धोकादायक गोष्टी अधोरेखित केल्यात, ज्यानं हा 'बर्न आऊट' होतो. क्षमतेपेक्षा जास्त काम, मर्यादित नियंत्रण, कामाचं कौतुक न करणं, अयोग्य काम, तुमच्या नीतिमत्तेला अनुसरून नसलेलं काम आणि कामाच्या ठिकाणी एकजूट नसणं या आहेत त्या 6 गोष्टी.

टेन्शन आलंय? या 10 सोप्या गोष्टी करून पाहा

बर्न आउट किंवा थकवा आल्याचं कसं ओळखाल? तुमची एनर्जी कमी होते, कामापासून दूर जावंसं वाटतं, स्वत:च्या कामाबद्दल नकारात्मक भावना येतात. तुमची कार्यक्षमता कमी होते.

तुमच्या सहकाऱ्यांमध्ये ही लक्षणं दिसत असतील, तर त्याला मदत करा. आॅफिसनं अशा व्यक्तींना सिक लीव्ह दिली पाहिजे. शिवाय त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले पाहिजेत.VIDEO: 30 सेकंद उडणारं 3 ग्रॅम वजनाचं विमान तुम्ही पाहिलं आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2019 05:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...