• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Sugar Free Life : या 5 सोप्या उपायांनी तुम्ही मधुमेहापासून रहाल नेहमी दूर, अशी घ्या काळजी

Sugar Free Life : या 5 सोप्या उपायांनी तुम्ही मधुमेहापासून रहाल नेहमी दूर, अशी घ्या काळजी

बहुतेक लोकांना आपण मधुमेही आहोत, हे माहितही नसते. टाइप-2 मधुमेह हा मधुमेहाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, याला आटोक्यात आणणं शक्य आहे. जर तुम्ही फक्त 5 टिप्स फॉलो केल्या तर हा डायबिटीज कायमचा दूर होईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार सध्या अनेकांना जडला आहे. आतापर्यंत वृद्धावस्थेकडे झुकलेल्यांना किंवा वृद्धांना होणाऱ्या या विकारानं एकट्या भारतातील अनेक कोटी तरुणही बाधित झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना आपण मधुमेही आहोत, हे माहितही नसते. टाइप-2 मधुमेह हा मधुमेहाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, याला आटोक्यात आणणं शक्य आहे. जर तुम्ही फक्त 5 टिप्स फॉलो केल्या तर हा डायबिटीज कायमचा दूर होईल. चला, 2021 च्या या जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह कसा टाळता येईल, याबद्दल जाणून घेऊया. आहारात पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थांचा (फायबर - Fiber) समावेश करा हेल्थलाइनच्या मते, टाइप 2 मधुमेह (type - 2 diabetes) टाळण्यासाठी फायबरचं सेवन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज 2000 कॅलरीज आहारातून घेत असाल तर, तुम्ही 25 ग्रॅम फायबर घेतलं पाहिजे. ज्यासाठी सफरचंद, अखंड धान्यं, हिरवे वाटाणे इत्यादींचं सेवन केलं जाऊ शकतं. फास्ट आणि जंक फूडपासून (Fast Food, Junk Food) दूर रहा अनेक संशोधनांनुसार, फास्ट आणि जंक फूडपासून दूर राहिल्यानं मधुमेह टाळणं सोपं होईल. कारण, त्यामध्ये फॅट आणि साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं, तसंच हे अन्नपदार्थ रक्तात साखरेचा प्रसारही झपाट्याने करतात. ज्यामुळं रक्तातील साखर धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतं. दर तासाला इतके चाला निष्क्रिय जीवनशैली असलेल्या लोकांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. त्याच वेळी, एका संशोधनानुसार, जी मुलं जास्त वेळ बसून राहतात किंवा जास्त वेळ टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईलच्या स्क्रीनसमोर घालवतात त्यांची इन्सुलिन संवेदनशीलता 8.7 टक्क्यांनी कमी होऊ शकते. म्हणून, दर तासाला सुमारे 5-7 मिनिटं चालणं आवश्यक आहे. हे वाचा - भय इथले संपत नाही! ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी तर फ्रान्समध्ये पाचवी लाट; भारतावरही सावट व्यायाम जे लोक व्यायाम करतात, त्यांच्या शरीरात इन्सुलिन संवेदनशीलता (insulin sensitivity) योग्य राहते. त्यामुळं इन्सुलिन हार्मोन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी, तुम्ही आठवड्यातून 5 दिवस तरी 40-45 मिनिटं व्यायाम केला पाहिजे किंवा 2000 कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत. हे वाचा - Free FIRE गेम खेळताना फसवणूक; 30 हजारांच्या वसुलीसाठी 10 वीचा मुलगा घरातून पसार व्हिटॅमिन डी काही संशोधकांनी असं सुचवलंय की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्याच वेळी, एका अहवालात असंही म्हटलंय की शरीरात व्हिटॅमिन डीचं प्रमाण पुरेसं असेल तर, टाईप-2 मधुमेहाचा धोका 43 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळं सकाळ-संध्याकाळ कोवळ्या उन्हात फिरणं, चालणं आवश्यक आहे. तसंच, मासे, दही इत्यादींचं सेवन करावं.
  Published by:News18 Desk
  First published: