• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • World Children’s day 2021: 20 नोव्हेंबरला सर्वच देश जागतिक बालदिन साजरा करत नाही! चीन, जपान, ब्रिटन.. मध्ये वेगळा दिवस

World Children’s day 2021: 20 नोव्हेंबरला सर्वच देश जागतिक बालदिन साजरा करत नाही! चीन, जपान, ब्रिटन.. मध्ये वेगळा दिवस

20 नोव्हेंबर रोजी जगभरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) सदस्य देशांमध्ये आंतरराष्ट्रीय बालदिन (International Children's Day) साजरा केला जातो. सर्वप्रथम, 1954 मध्ये 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. हा दिवस बालकांच्या हक्कांसाठी समर्पित दिवस म्हणून साजरा करण्यात आला. पण, ही तारीख निवडण्यामागेही एक कारण आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : बालदिनाचं नाव ऐकताच भारतीय (India) लोकांच्या मनात 14 नोव्हेंबरची तारीख येते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशात बालदिवस साजरा केला जातो. परंतु, आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक बालदिन (World Children’s Day ) या दिवशी नव्हे तर दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. विशेष म्हणजे एकेकाळी भारतातही या दिवशी बालदिन साजरा केला जात होता. आंतरराष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देणे, जगभरातल मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि मुलांच्या कल्याणासाठी हा दिवस साजरा केला जातो. 20 नोव्हेंबर ही एक महत्त्वाची तारीख आहे. कारण, याच दिवशी 1959 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) महासभेने बालकांच्या हक्कांना स्वीकारण्याची घोषणा केली होती. बालदिनाचं नाव ऐकताच भारतीय (India) लोकांच्या मनात 14 नोव्हेंबरची तारीख येते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशात बालदिवस साजरा केला जातो. परंतु, आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक बालदिन (World Children’s Day ) या दिवशी नव्हे तर दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. विशेष म्हणजे एकेकाळी भारतातही या दिवशी बालदिन साजरा केला जात होता. आंतरराष्ट्रीय एकता, जगभरातील मुलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि मुलांचे कल्याणासाठी हा दिवस साजरा केला जातो. 20 नोव्हेंबर ही एक महत्त्वाची तारीख आहे. कारण, याच दिवशी 1959 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) महासभेने बालकांच्या हक्कांना मंजुरी देण्याची घोषणा केली होती. 1954 मध्ये सुरूवात जागतिक बालदिन हा सर्वप्रथम 1954 मध्ये सार्वत्रिक बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. 1989 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने बालहक्कावरील अधिवेशन स्वीकारले त्यादिवशीची ही तारीख आहे. जागतिक बालदिन (World Children’s Day) आपल्या सर्वांना मुलांच्या हक्कांचे समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा देतो. मुलं आपलं भविष्य प्रत्येक समाज, देशाचं उज्वल भविष्य ही लहान मुलं असतात. ते भविष्यात निरोगी आणि चांगले जीवन जगू शकतील, त्यांना सर्व हक्क मिळावे ही आपली जबाबदारी आहे. योग्य संस्कार आणि सुविधा मिळाल्या तरच ते पुढील जीवनात ते एका चांगल्या जगाचा भाग राहू शकतील. मुलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले तर चांगले जग निर्माण होऊ शकत नाही. समाज आणि शासनाची जबाबदारी आजच्या जगात बहुतेक देशांमध्ये लोकशाही आहे. मुलांना सुरक्षित आणि आनंदी वातावरण प्रदान करणे ही समाजाची आणि त्याच्या शासन प्रणालीची जबाबदारी बनते जेणेकरून उद्या ते आपला देश अधिक चांगल्या प्रकारे घडवू शकतील. सोबतच मुलांना चांगल्या समाजाचा भाग करुन घेण्याची जबाबदारीही इथल्या समाजावर आहे. Children's Day: भारतात 20 ऐवजी 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात? मुलांबद्दल बांधिलकी हवी बाल हक्कांसाठी योग्य पावले उचलण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी, आजच्या पिढीने सरकार, व्यावसायिक आणि समाजाच्या नेत्यांकडे करायला केली पाहिजे. प्रत्येक मुलाला प्रत्येक हक्क आहे, याची खात्री करण्यासाठी प्रत्येकाने वचनबद्ध केले पाहिजे. देशातील प्रत्येक मुलाला त्याचा हक्क मिळतोय का? याची खात्री करण्यासाठी प्रत्येकाने वचनबद्ध राहिले पाहिजे. जगात वेगवेगळ्या ठिकाणी बालदिन वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो अनेक देशांमध्ये बालदिन 1 जून रोजी साजरा केला जातो. त्याचवेळी, चीनमध्ये 4 एप्रिल, पाकिस्तानमध्ये 1 जुलै आणि अमेरिकेत जूनच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा केला जातो. याशिवाय ब्रिटनमध्ये 30 ऑगस्ट, दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये 5 मे, नेपाळ आणि जर्मनीमध्ये 20 सप्टेंबरला बालदिन साजरा केला जातो. बालशौर्य पुरस्कार विजेत्याची दयनीय स्थिती; बकऱ्या चारून भरावं लागतंय कुटुंबाचं पोट या वर्षाची थीम काय आहे? गेल्या दोन वर्षांपासून जग कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोविड-19 महामारीशी लढत आहे. साथीच्या आजाराव्यतिरिक्त, लॉकडाऊन आणि इतर आर्थिक समस्यांमुळे लोकांना अनेक मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यावर्षी संयुक्त राष्ट्राची थीम "प्रत्येक मुलासाठी एक चांगले भविष्य" आहे. वेबसाइट संस्थेने म्हटले आहे की मुले त्यांच्या पिढीच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत आणि चांगले भविष्य घडवण्यासाठी मोठ्यांकडून मागणी करत आहेत. महामारीतून सावरताना आपण त्यांचे म्हणणे ऐकणे आवश्यक आहे. आज जगात अशा अनेक समस्या आहेत, ज्यांचा थेट परिणाम मुलांवर होतो. इतकेच नाही तर आजच्या हवामान बदलाच्या (Climate Change) युगात भविष्यात अशी पृथ्वी मुलांना द्यायला हवी, जी त्यांच्या राहण्यायोग्य असेल. पण त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे मुलांचे आरोग्य आणि पोषण, ज्यापासून जगातील लोकसंख्येचा एक मोठा भाग वंचित आहे.
  Published by:Rahul Punde
  First published: