Home /News /lifestyle /

World Cancer Day 2022: कॅन्सर म्हणजे काय? त्याला कसं रोखायचं, लक्षणे आणि त्यावर उपचार करण्याचे योग्य मार्ग जाणून घ्या

World Cancer Day 2022: कॅन्सर म्हणजे काय? त्याला कसं रोखायचं, लक्षणे आणि त्यावर उपचार करण्याचे योग्य मार्ग जाणून घ्या

World Cancer Day 2022: कर्करोगाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा केला जातो. या आजाराविषयी माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.

    मुंबई, 4 फेब्रुवारी : जगभरातील लोक दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा करतात. कर्करोग हा प्राणघातक आजार असल्याचे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे कॅन्सरच्या नावाने लोकांमध्ये एक वेगळीच भीती दिसून येते. कर्करोगाविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने (UICC) देखील हा दिवस जागतिक एकत्रीकरण उपक्रम (global uniting initiative) म्हणून घोषित केला आहे. या दिवसाच्या निमित्ताने कॅन्सर विषयी तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या. हा कर्करोग काय आहे? कर्करोग हा एक असा प्राणघातक आजार आहे, ज्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात असामान्य पेशी तयार होऊ लागतात. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास या पेशी सतत वाढत राहतात आणि शरीरात असंतुलित पद्धतीने विभागत राहतात. हा कर्करोग शरीरातील ऊतींचाही नाश करतो. साधारणपणे आपल्या शरीरातील पेशी नियंत्रित पद्धतीने वाढतात आणि विभाजित होतात. जेव्हा सामान्य पेशी खराब होतात किंवा वृद्ध होतात तेव्हा त्या मरतात आणि त्यांच्या जागी निरोगी पेशी येतात. कर्करोगाच्या पेशी वाढतच राहतात आणि जेव्हा त्या थांबल्या पाहिजे तेव्हा त्यांची संख्या वाढते. दुसऱ्या शब्दांत कर्करोगाच्या पेशी निरोगी पेशींप्रमाणेच नियमांचे पालन करत नाहीत. कर्करोगाची कारणं धूम्रपान, तंबाखू, शारीरिक हालचालींचा अभाव, अयोग्य आहार, क्ष-किरण, सूर्यापासून येणारे अतिनील किरण, संसर्ग यांसारखी कारणे आहेत. कर्करोगाची लक्षणे काय आहेत? शरीराच्या कोणत्याही भागात दीर्घकाळापर्यंत वेदना. दीर्घकाळापर्यंत खोकला लघवीशी संबंधित समस्या कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे हे देखील एक लक्षण आहे. जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो? हा दिवस 1933 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यामागचा उद्देश हा आहे की लोकांना या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांची माहितीही दिली जावी. या दिवशी UICC ने काही इतर कर्करोग सोसायट्या, उपचार केंद्रे आणि संशोधन संस्थांच्या मदतीने याचे आयोजन केले होते. जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम यावर्षी जागतिक कर्करोग दिन "केअर गॅप बंद करा" (Close The Care Gap ) या थीमसह साजरा केला जाईल. ही मुळात अनेक वर्षांची मोहीम आहे. ज्याचा उद्देश एवढाच की अधिकाधिक लोकांना कॅन्सरबद्दल जागरुकता मिळावी. सातव्या महिन्यातच बाळाला जन्म दिला आणि लगेच नोकरीवर गेली आई; संतापजनक आहे कारण जागतिक कर्करोग दिनाचे उद्दिष्ट: जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा उद्देश समाजात कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे आणि या आजाराबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे हा आहे. जेव्हा लोक जागरूक होतील, तेव्हा रोग आणि मृत्यूचे प्रमाण कमी करणे खूप सोपे होईल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Breast cancer, Cancer

    पुढील बातम्या