World Asthma Day 2021: श्वास घेण्यास त्रास होतोय? ही आहेत अस्थमाची लक्षणं, कारणं आणि उपाय

World Asthma Day 2021: श्वास घेण्यास त्रास होतोय? ही आहेत अस्थमाची लक्षणं, कारणं आणि उपाय

अस्थमा आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये म्यूकसची (Mucas) निर्मिती जास्त प्रमाणात होते. जे रुग्ण अस्थमा किंवा दम्याने त्रस्त आहेत त्यांना जास्त बोलल्याने किंवा अधिक प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह राहिल्याने त्रास होतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे : अस्थमा (Asthama) या आजाराला दमा असे देखील म्हणतात. अस्थमा हा फुफ्फुसाचा (Lungs) एक गंभीर आजार आहे. या आजारात श्वासनलिका आकुंचन पावतात, त्यांना सूज येते. यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. अस्थमा आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये म्यूकसची (Mucas) निर्मिती जास्त प्रमाणात होते. जे रुग्ण अस्थमा किंवा दम्याने त्रस्त आहेत त्यांना जास्त बोलल्याने किंवा अधिक प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह राहिल्याने त्रास होतो.

दम्याची काही प्रमुख लक्षणं -

अस्थमा किंवा दम्याने पिडीत असलेल्या व्यक्तीच्या फुफ्फुसात किंवा ब्रोन्कियल ट्यूबला सूज येते. यामुळे फुफ्फुसावर गंभीर परिणाम होतो. सामान्यतः श्वास घेताना श्वासनलिकेच्या (AirWays) जवळील स्नायूंचे पटल शिथिल होते. त्यामुळे हवा श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसात जाणे शक्य होते आणि श्वास सहजतेने घेता येतो. अस्थमा झाल्याने स्नायू कठीण होतात. त्यामुळे हवा आत घेण्यात अडचण येते. परिणामी श्वास घेणं कठीण होतं. अस्थमा रुग्णांची श्वासनलिका अधिक नाजूक झालेली असते. त्यामुळे जरा काही बदल झाला किंवा काही ट्रिगर (Trigger) बसला की ती अरुंद होते, संकुचित पावते.

अस्थमाची लक्षणं -

अस्थमा असलेल्या प्रत्येक रुग्णांमध्ये एकसारखी लक्षणे दिसत नाहीत. अस्थमाच्या एका अटॅकनंतर दुसरा अटॅक येईपर्यंत लक्षणे गंभीर होऊ शकतात.

जर अस्थमा रुग्णांमध्ये खालील लक्षणे दिसली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा -

- जर चेहरा, ओठ किंवा नखं पिवळी, निळ्या रंगाची दिसू लागली.

- खूप वेगात आणि असामान्य पध्दतीने श्वास घ्यावा लागणे.

- जेव्हा रुग्ण श्वास घेतो तेव्हा त्याच्या घशावरील त्वचा आत ओढल्या सारखे वाटणे.

- बोलताना किंवा चालताना श्वास घेण्यास त्रास होणे.

जर तुम्ही अस्थमा रुग्ण असाल, तर तुमच्या श्वासनलिकेला आसपासच्या कोणत्याही घटकामुळे ट्रिगर बसू शकतो. वैद्यकिय तज्ज्ञ याला अस्थमा ट्रिगर म्हणतात. या ट्रिगरमुळे लक्षणे दिसू लागतात आणि ती अल्पावधीतच गंभीर रुप धारण करु शकतात.

(वाचा - फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम,ऑक्सिजन लेवल सुधारण्यास होईल मदत)

अस्थमा रुग्णांसाठी ट्रिगर ठरणाऱ्या गोष्टी -

- हवेतील प्रदूषणाचे कण

- व्यायाम

- धुम्रपानासाठी तंबाखू

- मोल्ड, परागकण किंवा धुळीच्या कणांची अ‍ॅलर्जी

- फ्लू, सर्दी किंवा सायनसचा संसर्ग

- स्वच्छता केल्यामुळे किंवा तीव्र वासाचे परफ्युम्स

- हवामान बदल किंवा थंड हवा

- अॅस्पिरीन सारखी औषधे

- तणाव किंवा चिंतेची भावना

अस्थमा रुग्णांमध्ये दीर्घकाळ कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु, काही रुग्णांना मात्र अस्थमामुळे उदभवणाऱ्या समस्यांचा दररोज सामना करावा लागतो. काही लोकांना सर्दी सारख्या संसर्गजन्य आजारांमुळे किंवा व्यायामामुळेही लक्षणांचा सामना करावा लागतो.

(वाचा - कोरोना टेस्ट निगेटिव्ह पण लक्षणं दिसत असतील, तर काय करावं?)

अस्थमापासून बचाव करण्यासाठी काही उपाय -

- डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे नियमित सेवन करणे.

- आपल्या श्वसन क्रियेवर लक्ष ठेवावे, काही असामान्य वाटल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

- अस्थमा अ‍ॅक्शन प्लॅनचे ट्रॅकिंग ठेवावे.

- न्युमोनिया, इन्फ्लुएंजाची लस घ्यावी.

- अ‍ॅलर्जी असणाऱ्या घटकांपासून तसेच प्रदूषणापासून दूर राहावे.

First published: May 4, 2021, 7:30 PM IST

ताज्या बातम्या