मुंबई, 12 ऑक्टोबर: दरवर्षी 12 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड अलथ्रायटिस डे (World Arthritis Day) म्हणून साजरा केला जातो. आजकाल संधिवातचं दुखणं अनेकांना सुरु झालं आहे. लोकांमध्ये संधिवाताबद्दल जागृती करणं हाच World Arthritis Day साजरा करण्याचा उद्देश आहे. संधिवाताकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. सामान्यपणे लोकांना या आजाराबद्दल माहिती नसते. हा आजार वृद्धत्वाकडे झुकल्यानंतरच होतो असा तरुणांचा समज आहे. पण तुम्हाला तारुण्यातच या आजाराची लक्षणं जाणवू लागतात. त्याकडे वेळीच लक्ष दिलं तर त्यातून पूर्णपणे बरं होता येतं.
संधिवात म्हणजे काय?
संधिवात (Arthritis) हा असा आजार आहे जो चालत्या फिरत्या माणसाला एका जागी बसवू शकतो. संधिवात म्हणजे शरीरावर सूज येणं. ही सूज हाडांच्या सांध्यामध्ये निर्माण होते. अशा रुग्णांना बसताना आणि उठताना भयंकर त्रास होतो. संधिवातावर आज अनेक औषधं निघाली आहेत. पण हा आजार होऊ नये यासाठी आहार संतुलित ठेवल्यास जास्त फायदेशीर ठरु शकतं. सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश केल्यास संधिवाताचा धोका कमी होतो. योग्य प्रमाणात पाणी पिणंदेखील गरजेचं आहे.
रुग्णांनी काय खावं? काय टाळावं?
संधिवात झालेल्या लोकांनी चाकवताच्या भाजीचा आहारात समावेश करावा. रोज एक सफरचंद खाणंदेखील या रुग्णांना अत्यंत फायद्याचं ठरू शकतं. परंतु संधिवाताच्या रुग्णांनी सफरचंद खाताना ते सालासकट खाऊ नये. आजकाल अनेकदा फळांच्या सालावर केमिकल्सचा वापर केला जातो. ही केमिकल्स संधिवाताच्या रुग्णांसाठी जास्त घातक ठरू शकतात. संधिवात असलेल्या व्यक्तींनी हळदीचा वापर आपल्या आहारामध्ये जास्त ठेवावा. संधिवात असलेल्या लोकांनी थंड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावं. तसंच छोले, चणे, राजमा यांसारखी कडधान्य खाणंही टाळावं. मांसाहारी पदार्थांमध्ये ओमेगा 3 हे फॅटी अॅसिड असतं. संधिवाताच्या रुग्णांसाठी हे अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे माशांचा समावेश आहारात न करणंच फायदेशीर असतं. तसंच रोजच्या रोज मालिश करण्यामुळेही मोठा फायदा होऊ शकतो. या आजाराबद्दल लोकांमध्ये अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे. संतुलित आहार आणि योग्य व्यायामामुळे संधिवात टाळता येणं शक्य आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.