कोरोना सोडा; 36 वर्षांनंतरही या VIRUS वर नाही लस, तरी रुग्ण जगत आहेत चांगलं आयुष्य

कोरोना सोडा; 36 वर्षांनंतरही या VIRUS वर नाही लस, तरी रुग्ण जगत आहेत चांगलं आयुष्य

4 दशकं झाली या व्हायरसविरोधात (virus) लस (Vaccine) शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 मे : सध्या जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसविरोधात लस (coronavirus vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. कोरोनाव्हायरस येऊन अद्याप 6 महिने झालेत. मात्र 36 वर्षांपासून अद्यापही एका व्हायरसविरोधात लस सापडलेली नाही, तरी या व्हायरसचे रुग्ण चांगलं आयुष्य जगत आहेत आणि हा व्हायरस आहे एचआयव्ही (HIV). या व्हायरसमुळे एड्स (AIDS) हा आजार होतो.

1984 साली या आजाराबाबत माहिती झाली. एखादी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तिला एड्स आहेच असा नाही. एड्स हा एचआयव्ही संक्रमणचा शेवटचा टप्पा आहे. यामध्ये शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेला हानी पोहोचते. ज्यामुळे ती व्यक्ती इन्फेक्शनशी लढण्याची व्यक्तीची क्षमता कमजोर होती. हळूहळू ही समस्या वाढत जाते. ज्यामुळे घातक असे इन्फेक्शन आणि कॅन्सरचाही धोका वाढतो.

हे वाचा - अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी कुटुंबासह 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, कोरोना टेस्ट...

मात्र इतक्या वर्षांनंतर याविरोधात कोणतीही लस तयार झालेली नाही. 18 मे हा जागतिक एड्स लस दिवस  (World Aids Vaccine Day) मानला जातो. गेल्या 36 वर्षांपासून शास्त्रज्ञ याविरोधात लस शोधण्यात जुटलेले आहेत. लस नसली तरी रुग्ण या व्हायरससह सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. अँटिरेट्रोव्हायरल थेरेपी (एआरटी) मार्फत व्हायरसद्वारे रोगप्रतिकारक प्रणालीला होणाऱ्या हानीपासून वाचवता येऊ शकतं.

एचआयव्हीग्रस्तांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे?

एचआयव्ही किंवा एड्स पीडितांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जे रुग्ण पहिल्यापासून अँटिरेट्रोव्हायरल थेरेपी घेत आहेत, औषधं घेत आहेत त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त आहे, असे पुरावे नाहीत.

हे वाचा - मास्क घालून धावत होता तरूण, काही मिनिटांत फुटली फुफ्फुसं

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार एचआयव्ही रुग्ण आधीपासूनच इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड असतात म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. अशात एका निरोगी व्यक्तीच्या तुलनेत एचआयव्हीग्रस्तांमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रतिक्रियेच्या रूपात अधिक इन्फ्लेमेशन होत नाही. डॉक्टरांच्या मते, एचआयव्हीला योग्य प्रमाणे नियंत्रणात ठेवलं तर त्या रुग्णामध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं विकसित होण्याचं कारणच नाही.

एचआयव्हीग्रस्तांनी कोरोनापासून कसा बचाव करावा?

निरोगी लोकांप्रमाणेच एचआयव्हीग्रस्तांनीही कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवावे. सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करावं. डोळे, नाक, तोंडाला वारंवार हात लावू नये.

हे वाचा - आठवडाभरानंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत चांगले संकेत; डॉक्टरांची माहिती

याशिवाय एचआयव्ही रुग्णांनी आपली इम्युनिटी कायम ठेवण्यासाठी नियमित औषधांचं सेवन करावं. अँटिरेट्रोव्हायरल औषधं पुरेशा प्रमाणात आपल्याजवळ ठेवा. संतुलित आहार घ्या. व्यायाम करा आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या.

सूचना - न्यूज 18 वर आरोग्यसंबंधी लेख myUpchar.com या आरोग्याबाबत माहिती देणाऱ्या संकेतस्थळामार्फत घेतले जातात. 

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 18, 2020, 2:34 PM IST

ताज्या बातम्या