मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /World Aids Day 2021: भारतात सेक्स वर्कर नव्हे, तर हे लोक आहेत HIV एड्सने सर्वाधिक बाधित

World Aids Day 2021: भारतात सेक्स वर्कर नव्हे, तर हे लोक आहेत HIV एड्सने सर्वाधिक बाधित

World Aids Day 2021: देशात दरवर्षी एड्सच्या नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मात्र, त्याचं पूर्णपणे निर्मूलन होणं बाकी आहे. एकाकडून दुसऱ्याकडे पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगानं काही समुदायांना ग्रासलं आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 01 डिसेंबर : एड्सच्या उच्चाटनासाठी केवळ भारतातच नव्हे तर, जगभरातून प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी, चांगली बाब म्हणजे देशात दरवर्षी एड्सच्या नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मात्र, त्याचं पूर्णपणे निर्मूलन होणं बाकी आहे. एकाकडून दुसऱ्याकडे पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगानं काही समुदायांना ग्रासलं आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. तथापि, केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असं दिसून येत (World Aids Day 2021) आहे की, जे लोक इंजेक्शनद्वारे मादक द्रव्य (drugs) घेतात, त्यांच्यामध्ये एड्सचा प्रसार अधिक वेगानं होत आहे. तर, वेश्या व्यवसाय महिलांमध्ये (Female Sex Workers) हे प्रमाण कमी आहे.

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (National AIDS Control Organization), HIV/AIDS आणि STIs साठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना 2017-24 (National Strategic Plan for HIV / AIDS and STI 2017-24), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Health and Family Welfare) आकडेवारीनुसार, भारतातील HIV महामारी कमी होत आहे.

हे वाचा - Special Story : घरखरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस कसे ठरवले जातात?

तथापि, अजूनही असे काही समूह आहेत जिथं एचआयव्ही काही लोकांच्या गटांमध्ये प्रामुख्यानं केंद्रित आहे. यामध्ये महिला सेक्स वर्कर्स किंवा सेक्स वर्कर (FSW; 1.56%), ड्रग्ज टोचून घेणारे लोक (PWID; 6.26%), पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष (MSM; 2.69%) आणि ट्रान्सजेंडर (Transgender) समुदायातील (TG; 3.14%) यांचा समावेश आहे. समाविष्ट आहेत.

हे वाचा - या 5 राशीचे लोक चुका करण्यात असतात एक्सपर्ट, मोठं नुकसान झाल्यावरच घेतात धडा

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि ICMR-NIMS च्या HIV अंदाज अहवालानुसार, 2019 मध्ये भारतात HIV ची 69000 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. NACO अहवालातच असं म्हटलंय की, ट्रक चालकांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण 0.89 टक्के आढळलंय. हे प्रमाण राष्ट्रीय प्रौढांमध्ये होत असलेल्या सरासरी एचआयव्ही प्रसाराच्या तिप्पट आहे. भारताला पूर्णपणे एड्समुक्त होण्यासाठी अजून बराच वेळ लागेल. कारण, अजूनही देशात 15 ते 49 वयोगटातील सुमारे 25 लक्ष लोक एड्सनं बाधित आहेत. हा आकडा जगातील एड्स बाधित लोकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतो.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips