KISS केल्यानं AIDS होतो? जाणून घ्या HIV बद्दलचे 5 गैरसमज

KISS केल्यानं AIDS होतो? जाणून घ्या HIV बद्दलचे 5 गैरसमज

जगभरात एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. या आजाराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत.

  • Share this:

मुंबई, 01 डिसेंबर : जगभरात एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. या आजाराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. यामुळे रुग्णांशी बोलणंही टाळलं जातं. एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या रोगाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस पाळण्यास संयुक्त राष्ट्रसंघाने सुरुवात केली. एड्स झालेल्यांबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. तसेच तो कशामुळे होतो याबाबतही काही गैरसमज आहेत.

एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये असलेला एड्सचा विषाणू किस केल्यानं दुसऱ्या व्यक्तीकडे जातो असा गैरसमज आहे. किस केल्यानं एड्सची लागण होत नाही.

पाण्यातून एचाआयव्ही संसर्ग होतो असंही काही लोकांना वाटतं. पण एचआयव्ही पीडीताने स्विमिंग पूलमध्ये अंघोळ केली, त्याचे कपडे धुतले किंवा त्याने प्यायलेलं पाणी दुसऱ्या कोणी पिण्याने हा व्हायरस पसरत नाही.

एचआयव्ही बाधित व्यक्तीसोबत राहिल्याने त्याचा संसर्ग होत नाही. त्याला खोकला, शिंक आली किंवा थुंकी टाकली तर त्यामुळे सोबतच्या व्यक्तीला एचआयव्हीचा धोका असतो असा गैरसमज आहे.

डासांमुळे काही आजार होतात. एचाआयव्ही झालेल्या व्यक्तीला चावलेला डास दुसऱ्या व्यक्तीला चावला तर एड्स होत नाही. डास चावल्याने होणारे आजार होतील पण एचआयव्ही नाही.

एड्स फक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीकडून दुसऱ्याला होतो. यामध्ये असुरक्षित लैगिंक संबंध, एचआयव्ही बाधिताला वापरलेली सिंरिंज, एचआयव्ही झालेल्या व्यक्तीचे रक्त किंवा अवयव इतरांना प्रत्यारोपण केल्यानं एचाआयव्ही होतो. गर्भवतीला एचआयव्ही झाला असल्यास होणाऱ्या मुलालासुद्धा याचा संसर्ग होतो.

Published by: Suraj Yadav
First published: December 1, 2019, 8:15 AM IST
Tags: HIV

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading