World AIDS Day 2020 : HIV झाल्यास घाबरू नका; अशी घ्या स्वत:ची काळजी

World AIDS Day 2020 : HIV झाल्यास घाबरू नका; अशी घ्या स्वत:ची काळजी

योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतल्यास HIV ग्रस्त रुग्णांनाही सर्वसामान्य आयुष्य जगता येतं.

  • Last Updated: Dec 1, 2020 10:22 AM IST
  • Share this:

जर एचआयव्ही (HIV) संसर्गाचे योग्य वेळी निदान झाले नाही आणि त्यावर योग्य उपचार केला गेला नाही तर त्या व्यक्तीला एड्स (AIDS) होण्याचा धोका जास्त असतो. एड्स हा एचआयव्हीचा शेवटचा टप्पा आहे आणि या अवस्थेत त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत होते, की त्याला कोणतंही संक्रमण सहजतेनं होतं.

myupchar.com  चे डॉ. आयुष पांडे यांनी सांगतिलं, एचआयव्ही हे व्हायरल इन्फेक्शन आहे जे मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस किंवा एचआयव्हीमुळे होते. एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणं फ्लूसारखी असतात जी काही काळानंतर नाहीशी होतात. म्हणून बहुतेक लोकांना हे माहीतच नसतं की ते एचआयव्ही संक्रमित आहेत आणि शरीरात विषाणूंची वाढ होते. शेवटच्या टप्प्यात ग्रस्त व्यक्तीला अंधुक दृष्टी, वजन कमी होणं, कोरडा खोकला आणि धाप लागणं यासारख्या समस्या उद्भवतात.

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अनुराग शाही म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील द्रव्य पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे जसं रक्त, शुक्राणू, आईचं दूध किंवा जननेंद्रियाचा इतर स्राव यातून हा संसर्ग पसरतो. कंडोमशिवाय लैंगिक संबंध हा प्रसार होण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. एचआयव्हीचा संसर्ग झाल्यास एखाद्या व्यक्तीस काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते.

शांत झोप आणि व्यायाम

एचआयव्हीग्रस्त लोक कमकुवत असतात आणि त्यांचं वजन देखील कमी होतं. अशा परस्थितीत त्यांना दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे जेणेकरून स्नायू आणि हाडं मजबूत राहतील. त्यांनी असा व्यायाम निवडला पाहिजे ज्यामुळे शारीरिक तणाव निर्माण होणार नाही. तसंच त्यांना दिवसातून कमीत कमी 8 तास झोप मिळणं आवश्यक आहे. जेणेकरून शरीर संक्रमणास अधिक सहजपणे लढायला सक्षम होईल.

मानसिक आणि भावनिक आरोग्य

एचआयव्ही बाधित व्यक्तीसाठी मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत अधिक चिंता आणि तणावयुक्त गोष्टींचा अधिक परिणाम होतो. एचआयव्हीच्या निदानानंतर मानसिक धक्का जाणवू शकतो मात्र त्यातून बाहेर पडणं फार महत्त्वाचं आहे. मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी मित्र आणि कुटुंबाच्या कायम संपर्कात रहावं. कारण एकाकीपणामुळे नैराश्यात जाण्याचा धोका असू शकतो.

आहाराची काळजी

आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करणारे पदार्थ खा. दिवसातून दोन किंवा तीन वेळा खाण्याऐवजी एकदाच थोडंसं खा.

स्वच्छतेची काळजी घ्या

जर एचआयव्हीग्रस्त रुग्णाची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली तर संक्रमणाचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत स्वच्छता ठेवा. वारंवार हात धुवा आणि आजारी लोकांपासून अंतर ठेवा.

नियमित तपासणी आवश्यक

एचआयव्हीचं निदान झाल्यानंतर नियमित तपासणीसाठी डॉक्टरकडे जा. आवश्यक नसलेली कोणतीही औषधं घेऊ नका त्यानं दुष्परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं नियमितपणे घ्या.

व्यसनापासून दूर रहा

एचआयव्हीग्रस्त व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मद्यपान किंवा ड्रग्स घेतल्यानं उपचारांचा उपयोग होणार नाही. चक्कर येणं आणि अशक्तपणा येऊ शकतो. जर सिगारेट पिण्याची सवय असेल तर ती सोडावी अन्यथा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो.

सुरक्षित लैंगिक संबंध

एचआयव्हीने ग्रस्त व्यक्ती लैंगिक संबंध ठेवू शकत नाहीत ही धारणा चुकीची आहे.पण संभोग करताना कंडोम वापरणं महत्त्वाचं आहे. यामुळे जोडीदाराला संसर्ग होणार नाही. तसंच जर तुम्हाला एचआयव्हीचं निदान झालं असेल तर लैंगिक संसर्गाची स्वत:ची तपासणी करून घ्या. कारण या समस्या एचआयव्ही वाढवू शकतात.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - लैंगिक संक्रमित रोग

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 1, 2020, 9:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading