Home /News /lifestyle /

Work From Home चा स्ट्रेस आलाय? या 6 गोष्टी करून मानसिक ताण ठेवू शकता दूर

Work From Home चा स्ट्रेस आलाय? या 6 गोष्टी करून मानसिक ताण ठेवू शकता दूर

Work From Home म्हणजे काही खाऊ नाही, हे आता घरून काम करणाऱ्यांच्या चांगलंच ध्यानात आलं असेल. काम आणि घर या दोन्हीत बॅलन्स साधता साधता दमछाक होतेय आणि ताणही वाढतोय. मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर या गोष्टी करून पाहाच

मुंबई, 29 डिसेंबर : कोरोना (Coronavirus) संकटाचा फक्त उद्योगधंद्यांनाच फटका बसला आहे असे नव्हे तर आपल्या जगण्याच्या पद्धतीवरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे आपल्याला मागील काही काळापासून घरून काम (Work From Home) करावे लागत आहे. ऑनलाईन असणे आता सर्वांसाठी कंपलसरी झालं आहे. त्यामुळं साहजिकच सगळ्यांचाच स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे, शारीरिक हालचाली कमी झाल्या त्यामुळे मानसिक (Mental Stress) आणि शारीरिक आरोग्यावर(Physical Stress) प्रचंड परिणाम होऊ लागला आहे. वर्क फ्रॉम होम (Work From Home) करणाऱ्या अनेक जणांना शारीरिक आणि मानसिक संकटांचा देखील सामना करावा लागतो. घरून काम करण्याच्या संधीमुळं आपल्या कुटुंबाबरोबर  वेळ मिळाला. अनेक कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या वातावरणाची सवय असते. त्यामुळे घरून काम करताना कामात मन लागत नाही. परिणामी कर्मचाऱ्याच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. त्याचबरोबर शरीरावर देखील परिणाम होतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार असून याच्या मदतीने तुम्ही मानसिक स्वास्थ आणि शारीरिक स्वास्थ देखील उत्तम शकता. मानसिक स्वास्थ उत्तम राहण्यासाठी काही उपाय 1. डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी व्यायाम करा   कोरोनाच्या(Covid19) या काळात घरून काम करावे लागत असल्यानं बाहेर जाता येत नाही. त्यामुळं तुम्ही घरातच काही व्यायाम करू शकता. मेडिटेशनच्या(Medetation) मदतीनं तुम्ही शांत राहण्यास मदत होऊ शकते. घरामध्ये असलेल्या वस्तुंच्या मदतीनं तुम्ही व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ नीट ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्णवेळ झोप. दिवसातील 8 तास झोप पूर्ण करा. यामुळं शरीर आणि मन दोन्ही ताजतवानं वाटेल. तसेच खूपकाळ घरून काम केल्यानं एकटं वाटायला लागते. तेव्हा एकटेपणा जाणवल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींना फोन करून त्यांच्याशी बोला. आपले मन मोकळे केल्याने बरे वाटेल. 2.घरून काम करताना आपल्यासाठी जागा तयार करा    घरात सुसज्ज जागा नसल्यास आपल्या कामासाठी सोईस्कर जागेची रचना करा. सोईस्कर जागा असल्यास काम करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. याचा तुमच्या उत्पादकेवर देखील योग्य परिणाम होईल. त्याचबरोबर ऑफिसमध्ये (Office) काम केल्याचा देखील अनुभव तुम्हाला येईल. यामुळं मन शांत राहून तुम्हाला काम केल्याचा देखील अनुभव येईल. 3. डिजिटल डिटॉक्स:    घरी काम करत असताना (Work From Home) आपण वेळेचे भान पळत नाही. ऑफिसची वेळ होऊन गेल्यानंतर देखील आपण काम करत बसतो. यामुळं एक विशिष्ट वेळ ठरवून त्याच क्षणी आपण काम थांबवून कुटुंबासाठी वेळ देऊ शकतो. यामुळं टेक्नॉलॉजीपासून थोडावेळ लांब राहून आपला वेळ कुटुंब आणि मित्रमंडळींना द्या. 4. पोमोडोरो पद्धतीचे अनुसरण करा   घरून काम करताना (Work From Home) आपल्याला वेळेचं भान राहत नाही. त्यामुळं आपण सलग काही तास तसेच बसून राहतो. परंतु यामुळं शारीरिक स्वास्थ बिघडू शकते. यामुळं एक टायमर सेट करून तुम्ही ब्रेक घेऊ शकता. यामध्ये विशिष्ट वेळेत काम पूर्ण करून तुम्ही टायमरच्या मदतीने ब्रेक घेऊ शकता. 5.बॉस आणि ऑफिस सहकाऱ्यांबरोबर कनेक्टेड राहा   घरून काम करताना (Work From Home) आपल्या बॉससह फोनवर कनेक्टेड राहा. त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हे विचारून मगच कामाला सुरुवात करा. त्याचबरोबर आपल्या ऑफिस सहकाऱ्यांबरोबर फोनवर संपर्कात राहा. व्हिडीओ कॉलवर दुपारचे जेवण आणि वाढदिवस साजरा करून तुम्ही ऑफिससारखं वातावरण ठेवू शकता. यामुळं तुम्ही कनेक्ट राहून आनंदी राहाल. 6. कामाचे ठिकाण स्वच्छ आणि प्रफुल्लित ठेवा   घरात काम करत असल्याने (Work From Home) आपली एक विशिष्ट जागा निवडून ती प्रफुल्लित ठेवा. तुम्ही ज्या कोपऱ्यात बसून काम करणार आहात त्याठिकाणी झाडांची आणि फुलांची सजावट करा. त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या कविता आणि कोट्स लिहून तुम्ही स्वतःला फ्रेश ठेवू शकता. यामुळं तुमचं कामात मन लागून जास्त काम करू शकाल. वर्क या शब्दाचा अर्थ W- Wholesome O- Organized R- Routine K- Knowledgeable and kind work from home life. Keywords: Workout, work pressure, work stress, work from home, work from home pressure
First published:

Tags: Health, Stress

पुढील बातम्या