Work From Home करताना तुमची एक छोटीशी चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत

Work From Home करताना तुमची एक छोटीशी चूक; DVT सारख्या गंभीर आजाराला ठरेल कारणीभूत

वर्क फ्रॉम होम (Work From Home) करता करता तुम्ही गंभीर आजाराला आमंत्रण देत आहात.

  • Share this:

मुंबई, 09 मे : कोरोनामुळे (Corona) तुम्ही वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहात का? तुम्हाला तासनतास एकाच जागेवर बसून काम करावं लागत आहे का? तुम्हाला पाय दुमडून बसायची सवय आहे? असं असेल तर आजच या सवयींमध्ये बदल करा. वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना अनेक तास एकाच जागेवर बसून काम करावं लागत आहे. मात्र यामुळे तुम्ही गंभीर आजाराला आमंत्रण देत आहात. एकाच जागेवर तासनतास बसल्याने मान, पाठ, कंबर आणि स्नायू दुखण्यास सुरुवात होते. मात्र  खूप वेळ एकाच जागी बसल्याने डिप व्हेन थ्रोम्बोसिसचा (DVT) विकार जडण्याची शक्यता असते. हा एक गंभीर आजार असून यामुळे माणसाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

अनेकदा लोक एकाच जागेवर बसून काही तास काम करतात, ड्रायव्हिंग करतात किंवा विमान प्रवास करतात. असं एकाच जागेवर बराच काळ बसून राहणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. सीडीसीच्या अहवालानुसार, अशा जीवनशैलीमुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रियेत बिघाड होतो आणि डिव्हीटी हा विकार जडतो.

डिप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय?

पायामध्ये दोन प्रकारच्या शिरा किंवा नसा (Veins)असतात. यात एक वरच्या पृष्ठभागातील शिर आणि खोल भागातील शिरेचा समावेश असतो. खोल भागातील शिरा फुफ्फुस आणि हृदयाकडे दूषित रक्त घेऊ जातात. जेणेकरून तिथून शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीराच्या इतर भागांना होऊन तुम्हाला ऊर्जा मिळेल. डिव्हीटी या आजारात खोल भागातील शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे दूषित रक्त हृदय किंवा फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही आणि ते पायातच साठून राहतं. यामुळे पायाला सूज येऊन वेदना सुरू होतात.

हे वाचा - ...नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत

डिव्हीटीच्या 10 टक्के रुग्णांमध्ये नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या फुफ्फुसात अडकण्याचा धोका असतो. याला पल्मनरी एम्बोजिल्म असंही म्हणतात. यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही परिणामी रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. डिव्हीटी हा आजार वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेकदा आनुवंशिक कारणांमुळे देखील हा आजार संभवतो. अनेकदा या आजाराचा परिणाम पायांबरोबर हातांवरही होतो.

ही आहेत डिव्हीटीची लक्षणं

- कमरेखाली संपूर्ण पायावर सूज येणं आणि वेदना होणं.

- पायांमध्ये बधीरपणा जाणवणं.

ही आहेत कारणं

- एकाच जागेवर जास्तवेळ बसून राहणं

- 2 ते 3 तास शस्त्रक्रिया केल्याने.

-सर्व प्रकारचे कर्करोग

- प्रोटीन किंवा सी एन्जामाईनची कमतरता

- आनुवंशिक कारणे

असा करा बचाव

- डिप व्हेन थ्रोम्बोसिस होऊ नये यासाठी रोज अर्धा तास फिरणं आवश्यक आहे. यामुळे रक्ताभिसरण चांगलं राहतं.

- वर्क फ्रॉम होम करत असाल तर थोड्या-थोड्या वेळाने चालावं, म्हणजे कंबर आणि पायांमध्ये वेदना होत नाहीत.

- जास्त काळ विमान प्रवास करत असाल तर दर 2 तासांनी शरीर रिलॅक्स करा.

- ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी विंडो सीटवर बसणं टाळावं.

हे वाचा - कोरोनावर मात केल्यानंतर नवं संकट; बऱ्या झालेल्या रुग्णांना होतंय गंभीर इन्फेक्शन

- एकाच जागेवर जास्त काळ बसू नये. दिवसभरात थोडावेळ चालावं.

- वजन नियंत्रित ठेवावं, धूम्रपान करू नये.

- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पहिल्यापासूनच डिव्हीटीची समस्या असेल तर त्यास भरपूर पाणी पिण्यास द्यावं.

First published: May 9, 2021, 11:03 PM IST

ताज्या बातम्या