मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

‘वर्क फ्रॉम होम’ मुळे भांडणात वाढ; अशी दूर करा जोडीदराची नाराजी

‘वर्क फ्रॉम होम’ मुळे भांडणात वाढ; अशी दूर करा जोडीदराची नाराजी

कोरोना काळात (Corona Period) बरेचजण घरामधून काम करत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ मध्ये आपल्या प्रायोरेटी सेट (Set Priorities) करायला हव्यात.

कोरोना काळात (Corona Period) बरेचजण घरामधून काम करत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ मध्ये आपल्या प्रायोरेटी सेट (Set Priorities) करायला हव्यात.

कोरोना काळात (Corona Period) बरेचजण घरामधून काम करत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ मध्ये आपल्या प्रायोरेटी सेट (Set Priorities) करायला हव्यात.

नवी दिल्ली, 6 जून : कोरोना काळात (Corona Period) लोकांनी घराबाहेर पडणं कमी केलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा (Work From Home Facility) उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे बरेचसे पती-पत्नी घरूनच काम करत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे घरामध्ये राहता येत असलं, तरी त्याचे काही दुष्परिणाम (Side Effect) देखील पाहायला मिळाले आहेत. ऑफिसमध्ये जाणाऱ्या पती-पत्नीचं दिवसभराचं रूटीन, दिनचर्या ठरलेली (Fixed schedule)असायची मात्र, हेच शेड्युल आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे बिघडलेले आहे. त्यामुळे जोडीदाराबरोबर भांडणं वाढायला लागलेली आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे होणारी भांडण टाळायची असतील तर, या टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य ठेवा वेगळं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेवायला हवं. कोरोनाकाळात पती-पत्नी घरूनच काम करत आहेत. अशा वेळेस त्यांनी आपल्या प्रायोरिटी ठरवून (Set Priorities) घेतल्या पाहिजेत. काम करताना केवळ कामावरच लक्ष द्यायला हवं. काम व्यवस्थित झाल्यानंतर मूड चांगला राहील आणि भांडणं देखील होणार नाही. चिडचिड होणार नाही. याशिवाय कामांमधून एकमेकांसाठी थोडासा वेळ काढायला हवा. सतत काम करत राहिल्यामुळे आपल्या जोडीदाराला वेळ न दिल्यास त्याची चिडचिड होऊ शकते. घरातली कामं वाटून घ्या  वर्क फ्रॉम होममुळे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून काम करणं कठीण झालं आहे. काही ठिकाणी सगळ्या जबाबदाऱ्या पत्नीवर पडल्यामुळे तिची धावपळ होते. अशा परिस्थितीत आपल्या जोडीदाराबरोबर चर्चा करून कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्यात. घराची साफसफाई, जेवण बनवणं किंवा इतर कामं कोणी, केव्हा करायची हे ठरवून घ्यायला हवं. यामुळे ऑफिसच्या कामावर ताण पडणार नाही आणि भांडणं होणार नाहीत. (PF खातेधारकांसाठी कामाची बातमी; केवळ मिस्ड कॉल देऊन बॅलेन्स घ्या जाणून) प्रेमाने परिस्थिती हाताळा कधीकधी ऑफिसच्या प्रेशरमुळे मनावर ताण येतो. अशा वेळेस आपल्या जोडीदाराची चिडचिड होत असेल तर, समजुतदारपणाने त्याच्याशी वागा. जोडीदारावर रागावण्यापेक्षा त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय ही परिस्थिती काही दिवसांसाठी आहे असं सांगून त्याचा स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करावा. कामावर लक्ष ऑफिसमध्ये काम करताना ते ठराविक वेळी संपवता येतं मात्र, वर्क फ्रॉम होममुळे सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्यानंतर देखील काम लवकर संपत नाही. आपण ऑफिसमध्ये असताना आपलं लक्ष आपल्या कामावर असतं मात्र, घरामध्ये काम करताना इतर गोष्टींकडे लक्ष जातं. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन बिघडल्यामुळे जोडीदाराची चिडचिड होऊ शकते. अशा वेळेस एकमेकांशी न बोलता कामाकडे लक्ष द्यावं. (सरकारच्या या नियमामुळे तुमच्या पगारावर होणार परिणाम;इन हँड सॅलरी कमी होणार पण..) एकमेकांना दोष देऊ नका वर्क फ्रॉम होमच्या काळात इच्छा नसतानाही मनावर ताण यायला लागलेला आहे. ज्याचा राग आपल्या जोडीदारावर निघतो. जोडीदाराची चूक नसताना देखील कधी-कधी आपण त्याच्यावर रागवून किंवा त्याच्याशी ओरडून बोलतो. अशावेळेस आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. दुसरीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.
First published:

Tags: Lifestyle, Relationship, Relationship tips

पुढील बातम्या