Home /News /lifestyle /

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय? हिरावलं जाऊ शकतं हे सुख; वाचा सविस्तर

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय? हिरावलं जाऊ शकतं हे सुख; वाचा सविस्तर

अनेकजण तर लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करणं पसंत करतात. मात्र लॅपटॉप असा मांडीवर ठेऊन काम करणं सोयीस्कर आणि फायदेशीर वाटत असलं, तरी त्याचे गंभीर दूरगामी परिणाम आरोग्यावर होऊ शकतात.

नवी दिल्ली, 18 जानेवारी: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे (Work From Home) प्रत्यक्ष कामाचे तास ( working hours ) वाढले आहेत. पण या वर्क फ्रॉम होमचा एक मोठा फायदाही (Work From Home benefits) सगळ्यांनाच लक्षात आलाय, आणि तो म्हणजे स्वतःला हव्या त्या पद्धतीने, हव्या त्या कपड्यांत, हवं तसं बसून काम करणंसुद्धा शक्य झालं आहे. अगदी बेडवर लोळून काम करण्यापर्यंत सवय कित्येकांना लागली. अनेकजण तर लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करणं पसंत करतात. मात्र लॅपटॉप असा मांडीवर ठेऊन काम करणं सोयीस्कर आणि फायदेशीर वाटत असलं, तरी त्याचे गंभीर दूरगामी परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे (Covid-19) रुग्ण वाढू लागलेत. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ची पद्धत पुन्हा वाढू लागलीय. घरून काम करताना, अनेकजण लॅपटॉप आपल्या मांडीवर ठेऊन काम करतात. मात्र, लॅपटॉपमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. शिवाय लॅपटॉप जास्त वेळ आपल्या मांडीवर ठेऊन काम केल्यास वंध्यत्वाची (infertility) समस्या वाढू शकते. पुरुषांच्या शारीरिक रचनेमुळे, त्यांना महिलांच्या तुलनेत लॅपटॉपच्या उष्णतेचा जास्त त्रास होतो. याचे कारण महिलांमध्ये ओव्हरी शरीराच्या आत असतात, तर पुरुषांमध्ये अंडकोष शरीराच्या बाहेरील भागात असतात. यामुळे, उष्णतेच्या किरणांचा थेट परिणाम पुरुषांच्या अवयवांवर होतो. हे वाचा-Water bottle धुताय पण ती खरंच स्वच्छ होतेय का? तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करण्याची सवय पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम पुरुषांच्या र‍िप्रोडक्‍ट‍िव ऑर्गनवर होतो, त्यामुळे याचा परिणा स्पर्म काउन्टवर होतो. याशिवाय, काही अभ्यासांमध्ये असेही समोर आले आहे की, लॅपटॉपला मांडीवर ठेवून दीर्घकाळ काम केल्याने मांडीची त्वचा खराब होते, तसेच त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉप मांडीवर घेऊन बराच वेळ बसल्याने अंडकोषांचे तापमान वाढू शकते. याचे कारण असे की लॅपटॉप सौम्य कंपनं निर्माण करतो, ज्यामुळे प्रजनन समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच नेहमी लॅपटॉप टेबलवर ठेवून काम करण्याचा सल्ला दिला जातो. लॅपटॉप वापरण्याची योग्य पद्धत 1. लॅपटॉपसमोर सतत काम करू नका, थोडा वेळ ब्रेक घेत राहा. 2. आजपासून लॅपटॉप पायावर किंवा मांडीवर ठेवून काम करण्याची सवय सोडा. त्याऐवजी, तो टेबलवर ठेवून काम करा. 3. लॅपटॉपवर काम करताना शील्ड वापरा, त्यााचा वापर लॅपटॉपची उष्णता आणि रेडिएशन रोखतो. 4. सतत काम करत असताना लॅपटॉपच्या बाजूने जास्त उष्णता किंवा आवाज येत असेल तर काही काळ तो बंद करा. 5. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ब्लू लाइट फिल्टर वापरा. फिल्टर डोळ्यांना रेडिएशनपासून वाचवते. 6. काम पूर्ण झाल्यावर वाय-फाय बंद करा. यातून निघणारी उष्णता तुमच्यासाठीही हानीकारक ठरू शकते. हे वाचा-वेळेशी पक्की एकनिष्ठ असतात या राशीची लोकं; कामात टंगळ-मंगळ अजिबात खपत नाही दुसरीकडे डॉक्टरांच्या मते, लॅपटॉपचा वापर तितकासा धोकादायक नसून त्याला जोडलेले वाय-फाय कनेक्शन हानीकारक आहे. सर्व इंटरनेट उपकरणे रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरतात, ज्यामुळे शरीराच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हार्ड ड्राइव्ह कमी फ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित करतात, तर ब्लूटूथ कनेक्शन उच्च रेडिएशन उत्सर्जित करतात. कोरोना महामारीमुळे मुलांचे शिक्षण ते कर्मचाऱ्यांचे काम हे घरातूनच होत आहे. 'वर्क फ्रॉम होम'चे प्रमाण वाढले आहे. अनेकजण तासनतास लॅपटॉप समोर बसलेले असतात. पण त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आरोग्याच्यादृष्टीने फायद्याचे आहे.
First published:

Tags: Work from home

पुढील बातम्या