Home /News /lifestyle /

वर्क फ्रॉम होममध्ये तुमचा छळ होतोय का? आत्ताच 'ही' पावलं उचला !

वर्क फ्रॉम होममध्ये तुमचा छळ होतोय का? आत्ताच 'ही' पावलं उचला !

कोरोना (Corona) काळात वर्क फ्रॉम होम (Work From Home) ही सोय झाली असली तरी, त्यातले काही धोकेही समोर येऊ लागले आहेत.

    मुंबई, 29 ऑक्टोबर: आपल्यापैकी अनेक जण सध्या वर्क फ्रॉम होम (Work From Home) करतात. या नव्या पद्धतीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. घरून काम केल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य सुधारलं आहे, कुटुंबासोबत वेळ मिळत आहे. हे फायदे आहेत. पण जर आपण ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या छळाचा विचार केला तर तो आता घरी बसून कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअली सहन करावी लागतच आहे. त्याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीसोबतच त्याच्या कुटंबियांवरही होत आहे. काही अभ्यासांत असं लक्षात आलं की दूरून काम करताही ऑफिसमधल्या छळाचं प्रमाण वाढलं आहे. समाजावर भयानक परिणाम करणाऱ्या या समस्येबद्दल सावध करणाऱ्या या महत्त्वाच्या गोष्टी. 1. एखाद्याच्या दिसण्यावर घाणेरडी शेरेबाजी लॅपटॉप किंवा फोनवरून ऑफिसासाठी व्हिडिओ कॉल करणं ही आता सामान्य गोष्ट झाली आहे पण इथंच प्रामुख्यानं सावध रहायची गरज आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या दिसण्यावरून इतर कर्मचारी घाणेरडी शेरेबाजी करू शकतात. अश्लील कमेंट्स किंवा खाणाखुणा केल्यामुळे त्या घरून काम करणाऱ्या व्यक्तीचा अपमान होऊ शकतो किंवा भेदभावाची जाणीव होऊ शकते. तसं घडल्यास तातडीने तुमचे एचआर किंवा मॅनेजर यांना सांगा. 2. ई-मेल, मेसेजेसमधून होणारा छळ सगळेच जण सध्या ई-मेल, टेक्स्ट मेसेज, व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलद्वारे संवाद साधत आहेत.अशात घाणेरड्या कमेंट करणारे अश्लील इमेल मोठ्या  प्रमाणात पाठवले जाऊ शकतात. काही जण गटाने दुसऱ्या कर्मचाऱ्याबद्दल घाणेरड्या प्रतिक्रिया देऊ शकतात. ग्रुप लीडरला असं आढळलं तर त्यांनी त्या गटाशी बोलावं किंवा एचआरशी संपर्क साधावा. 3. अनप्रोफेशनल वागणूक तुमची कुणाशीही कितीही जवळीक असली तरीही अनप्रोफेशनल आणि अश्लील विनोद करणं योग्य नाही. झूम मीटिंग अगदी साध्या कारणासाठी बोलवली असली तरीही, सहकाऱ्यांशी असभ्य वर्तन करणं ही एक मोठी समस्या आहे. 4. एकटं पडल्याची भावना ऑफिसात असताना प्रत्येक जण कामात असतो. पण घरातून काम करताना तसं होत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरून काम करत असल्यामुळे एखाद्या संवादात तुम्ही एकटे पडत आहात किंवा इतर सगळे मिळून तुम्हाला एकटं पाडत आहेत असं तुम्हाला वाटू शकतं. जाणता-अजाणता हे घडू शकतं. अशावेळी आपल्या सहकाऱ्यांशी चांगल्या स्वरात स्पष्टपणे बोलून आपल्या भावना मांडणंच श्रेयस्कर. 5. आक्रमक वातावरण व्हर्च्युअली शोषण किंवा छळ होऊ शकतो यात काही शंकाच नाही. त्यामुळे मेसेज, व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल स्वीकारताना कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. गैरवर्तणूक, चुकीची भाषा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये. एचआर किंवा मॅनेजरनीही ऑफिसमधील छळासंबंधी व्हिडिओ सेशन्स घेऊन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावं जेणेकरून कामाचं वातावरण खेळीमेळीचं राहील. 6. व्हिडिओ कॉलची जबरदस्ती कामाचे तास संपल्यानंतरही जास्त तासांची शिफ्ट करायला लावणं त्यातही व्हिडिओ कॉल करायला लावणं असे प्रकार प्रामुख्याने मुलींना, बायकांना  करायला लावल्याचं लक्षात आलं आहे. या व्हिडिओ कॉलमध्ये गैरवर्तन केलं जातं. यावर मॅनेजरनी तातडीने कारवाई करायला हवी. 7. उपकारांची जाणीव करून देणं महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना प्राथमिक गरजेपुरतेही पैसे मिळवणं कठीण झालं आहे. त्यामुळे काही वेळा जे अजून नोकरीवर आहेत त्यांना त्यांचे वरिष्ठ सतत उपकारांची जाणीव ठेवा असं सतत सांगतात. ऑफिसमधील छळाचा हा आणखी एक प्रकार आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे कर्मचारी असे प्रकार अनुभवत आहेत त्यांनीही  सावध राहणं गरजेचं आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Work from home

    पुढील बातम्या