मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : वृशभ आणि कुंभ राशीच्या लोकांना आज मिळणार खऱ्या प्रेमाचा आनंद

राशीभविष्य : वृशभ आणि कुंभ राशीच्या लोकांना आज मिळणार खऱ्या प्रेमाचा आनंद

कसा असेल आपला आजचा दिवस, जाणून घ्या 08 मार्चचं राशीभविष्य

कसा असेल आपला आजचा दिवस, जाणून घ्या 08 मार्चचं राशीभविष्य

कसा असेल आपला आजचा दिवस, जाणून घ्या 08 मार्चचं राशीभविष्य

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 08 मार्च : प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो. आपल्या ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. आपला दिवस कसा जाणार याची कल्पना आपल्याला असेल तर काही खबरदारी घेऊन येणाऱ्या समस्या टाळता येतात किंवा त्यावर तोडगा काढता येतो. आज महिला दिन आहे. महिलांसाठीही कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष - आजारपणात काळजी घ्या. प्रार्थनेद्वारे आपली इच्छा पूर्ण होईल. आजचा आपला दिवस आनंदी आणि छान जाईल. कौशल्य दर्शविण्याची चांगली संधी मिळेल. चर्चेतून नवीन माहिती मिळेल.

वृषभ- तेलकट पदार्थ खाणं टाळा. आर्थिक समस्यांमुळे आपली सर्जनशीलता कमी होईल. आज आपण खऱ्या प्रेमाचा अनुभव घ्याल. भविष्यातील योजनांचा पुनर्विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल.

मिथुन - विनाकारण वाद घालू नका, वादविवादाने काही साध्य होत नाही. मनस्ताप होतो आणि रागाच्या भरात चुकीच्या निर्णय घेतला जातो. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मित्रांसोबत आपला दिवस चांगला जाईल. आपण ऑफिसमध्ये वादाचे केंद्र बनू शकता.

कर्क - कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपल्याला अपयश येईल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या.

हे वाचा-Yes Bank चे सीईओ राणा कपूर यांना ईडीने केली अटक

सिंह - दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणं टाळा. आपलं मत किंवा सल्ला उगीच देऊ नका. मालमत्तेत केलेली गुंतवणूक मोठा फायदा मिळवून देईल. प्रिय व्यक्तींबद्दल अति संवेदनशील असाल. भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल.

कन्या - आज जे आपण बोलाल ते कराल. आपल्याला तणावाचे क्षण देऊ शकते.प्रार्थनेद्वारे आपली इच्छा पूर्ण होईल आणि शुभेच्छा तुमच्याकडे येतील. मागील दिवसाची मेहनत देखील रंग आणेल. अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च करू नका.

तुळ - आर्थिक परिस्थिती सुधारेल. जास्त ताण आल्यामुळे आज आपली मानसिक आणि शरीरिक दोन्ही स्थिती अस्वस्थ असेल. नव्या कल्पना आणि योजनांचा फायदा होईल. विवाहित जीवनासाठी हा एक चांगला दिवस आहे.

वृश्चिक - आरोग्य चांगले राहिल पण तुमच्या खर्चात वाढ होईल. जुन्या चुका विसरून आपण जीवन अर्थपूर्ण बनवाल.जोडीदार खोटं बोलल्यानं आपण दु:खी होऊ शकता. आज कुटुंबियांसोबत वेळ घालवाल.

धनु - जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन स्त्रोतांमधून आर्थिक फायदा मिळेल. आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी येईल. वाचनानं अधिक समृद्ध व्हाल.

मकर - मित्र आणि सहकाऱ्यांच्या वागणुकीमुळे आज आपल्याला मानसिक ताण येईल. नवीन आर्थिक योजना तयार कराल. कोणताही निर्णय घेण्याआधी चांगल्या आणि वाईट दोन्ही परिणामांचा विचार करा. आरोग्याची समस्या जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. जोडीदाराला भावनिक ब्लॅकमेल करणे टाळा.

कुंभ - आहारावर नियंत्रण ठेवा. आजची संध्याकाळ मित्रांसोबत घालवाल. समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या. आपलं प्रेम आणि वैवाहिक जीवनात आपला जोडीदार दोन्ही आपल्या आयुष्यात आज चांगले रंग भरणार आहेत. त्यामुळे आपला आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणीत होईल.

मीन- दीर्घ आजारांपासून मुक्तता मिळेल. आपल्या योजाना आणि गुंतवणुकीची माहिती कुणालाही सांगू नका. वाणघेवाण करण्याचा चांगला दिवस आहे. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला. शेवटच्या क्षणी आपल्या योजना बदलू शकतात.

हे वाचा-OMG! दीपिकाचा लूक पाहून चाहते घायाळ, बीचवर केलं हॉट फोटोशूट

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, राशीभविष्य