प्रेमात धोका खाणाऱ्या स्त्रिया होतात जास्त यशस्वी, कारण...

प्रेमात धोका खाणाऱ्या स्त्रिया होतात जास्त यशस्वी, कारण...

अलिकडेच झालेल्या संशोधनात हे पुढे आलंय की प्रेमात ज्या स्त्रिया फसवल्या जातात, त्या आयुष्यात खूप यशस्वी होतात.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : प्रेमात प्रतारणा झाली, प्रियकर सोडून गेला की पायाखालची वाळूच जणू सरकते. मनाचं पूर्ण खच्चीकरण होतं. गर्दीतही त्या व्यक्तीला एकटं वाटतं. पण अलिकडेच झालेल्या संशोधनात हे पुढे आलंय की प्रेमात ज्या स्त्रिया फसवल्या जातात, त्या आयुष्यात खूप यशस्वी होतात. आयुष्यात हवं ते मिळणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेनं.

संशोधनात हे समोर आलंय की प्रेमात धोका खाणाऱ्या स्त्रियांना नंतर चांगला जोडीदार मिळतो. उलट जे पुरुष प्रतारणा करतात, त्यांची नाती नंतरही तुटतात. एकूण 96 देशांमधल्या 6 हजार लोकांवर हा रिसर्च केला गेलाय. त्यातल्या महिलांनी सांगितलं की, प्रेमातली फसवणुकीनं त्या कणखर बनल्या. प्रोफेशनमध्ये यशस्वी झाल्या. फसवणुकीमुळे त्या सावध होतात.  दुसऱ्या वेळी त्या चांगला जोडीदार निवडतात.

या संशोधनात भाग घेतलेल्या स्त्रियांनी सांगितलं, प्रेमभंग झाल्यावर काही दिवस त्यांना खूप कठीण गेले. पण त्यातून त्या बाहेर पडल्या. नंतर त्यांनी योग्य जोडीदाराची निवड केली. एकूण प्रेमात फसवलं गेल्यानं त्यांचं भलंच झालं.

या रिसर्चमध्ये अशा महिलांमध्ये जास्त आत्मविश्वास दिसला. त्या इमोशनलीही कणखर दिसल्या. उलट ज्या पुरुषांनी धोका दिला त्यांचं नवं रिलेशनही  टिकलं नाही.

कोणतंही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. नेमकी जर हाच विश्वास नात्यात नसेल तर नातं फार काळ टिकत नाही. पण अनेकदा आयुष्यात चुकीची माणसं भेटतात. ती योग्य वेळी आयुष्यातून बाहेर पडली तर चांगलंच असतं.

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते प्रेम हा एक फोर्स असतो. जेव्हा प्रेमभंग होतो, तेव्हा तो फोर्स तुमच्याकडे परत येतो. मग स्त्रिया त्याचा उपयोग कामात, करियरमध्ये करतात आणि फोकस राहिल्यानं यशस्वी होतात.

VIDEO: ..आणि नातीने नाकारली शहा आजोबांची टोपी

First published: March 30, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या