मुंबई, 7 मे : लग्नानंतर पतिपत्नीच्या नात्यात एकमेकांविषयी प्रेम, विश्वास आणि सामंजस्य नसेल तर नातं टिकून ठेवणं अवघड होऊन जातं. नात्यात कितीही कटुता आली तरी ते टिकून ठेवण्यासाठी, ते तोडू नेय असा दबाव सतत महिलांवर येत असतो. त्यामुळे नको असलेलं नातं जपण्यासाठी महिला सतत झटत राहतात. बहुतांश कायदे हे महिलांच्या बाजूने असले तरीसुद्धा नातं तोडण्यापेक्षा ते टिकवून ठेवण्यामागची कारणं त्यांना तसं करण्यास भाग पाडतात.
समाजाची भीती - अनेकदा महिला समाजाच्या भीतीने कौटुंबिक हिंसा सहन करत राहतात. समाज काय म्हणेल या भीतीने नातं तोडत नाहीत. अनेक महिला त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी दुसऱ्यांजवळ बोलायला घाबरतात.
तुमचं कशातच लक्ष लागत नसेल, तर मनःशांती मिळविण्यासाठी करा 'हे' उपाय
जोडीदार सुधरेल ही अपेक्षा - फक्त कमी शिकलेल्या महिलाच नव्हे तर उच्च शिक्षित महिलासुद्धा जोडीदार सुधरेल या आशेने नातं निभावत असतात. जर मी त्याला सोडलं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असंही त्यांना वाटत असतं. भावनांमध्ये गुंतून त्या वर्षानुवर्ष आपलं नातं निस्वार्थीपणे निभावत असतात.
मुलांच्या भविष्यासाठी - एकटं राहून मुलांची जबाबदारी निभावणं म्हणजे तारेवरची कसरत असते. अशा परिस्थितीत मुलांचं भविष्य घडवण्यासाठी अनेक महिला नको असलेल्या नात्यात स्वतःला बांधून घेतात.
Latest Fashion : कुठल्याही स्कीन टोनवर शोभून दिसतात 'हे' रंग
माहेच्या मंडळींचा दबाव - एखाद्या महिलेला जोडीदाराकडून त्रास होत असेल आणि तिला त्याच्यासोबत राहायचं नसेल, तर तिच्या माहेरची मंडळी नातं टिकवून ठेवण्यासाठी दबाव टाकतात. मुलांच्या भवितव्यासाठी, समाजाच्या भीतीमुळे नातं तोडू नकोस असा सल्ला तिला माहेरच्यांकडून दिला जातो.
आर्थिक स्थिती - अनेक महिला आर्थिक स्थितीला घाबरून आहे ते नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आणि मुलांच्या खर्चासाठी जोडीदारावर अवलंबून अवलंबून राहतात. बरेचदा जोडीदाराला सोडून गेल्यानंतर त्यांचं आणि मुलांचं काय होईल? या विचारांनी हैराण होऊन त्या नातं टिकवून ठेवण्यासाठी सतत झटत राहतात.