मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महिलांच्या अंडरवेअरमध्ये असतो गुप्त खिसा?, आतापर्यंत महिलांनाही माहित नसेल त्यामागचं महत्त्व

महिलांच्या अंडरवेअरमध्ये असतो गुप्त खिसा?, आतापर्यंत महिलांनाही माहित नसेल त्यामागचं महत्त्व

लेडीज निकरमध्ये (Ladies Knicker) पॉकेट (Pocket) कशाला हवं, असं अनेकांना वाटतं. यामागे फार महत्त्वाचा विचार करण्यात आला आहे.

लेडीज निकरमध्ये (Ladies Knicker) पॉकेट (Pocket) कशाला हवं, असं अनेकांना वाटतं. यामागे फार महत्त्वाचा विचार करण्यात आला आहे.

लेडीज निकरमध्ये (Ladies Knicker) पॉकेट (Pocket) कशाला हवं, असं अनेकांना वाटतं. यामागे फार महत्त्वाचा विचार करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: 'एक नूर आदमी; दस नूर कपडा' अशी उक्ती प्रसिद्ध आहे. आजकाल कपड्यांचे नानाविध प्रकार बघायला मिळतात. आपलं व्यक्तिमत्त्व उठावदार होण्यात कपडे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नाना तऱ्हेचे कपडे परिधान केले जातात. अर्थात कपडे केवळ दिसायला सुंदर असून चालत नाहीत, तर ते आरामदायक असणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे आजकाल वैविध्यपूर्ण डिझाइन्स आणि स्टाइलव्यतिरिक्त कपड्यांच्या आरामदायीपणाकडेही विशेष लक्ष दिले जाते.

आजकाल बाह्य वस्त्रांमध्ये अनेक नवनवीन फॅशन्स (Fashions) येत असतात. त्याचप्रमाणे अंतर्वस्त्रं निवडण्याकडेही (Innerwares) विशेष लक्ष दिलं जातं. अंतर्वस्त्रं शरीराच्या नाजूक भागाचं केवळ रक्षण करत नाहीत, तर आरोग्याच्या दृष्टीने देखील त्यांचं महत्त्व आहे. त्यामुळे त्यांची रचना, डिझाइन करताना आरामदायीपणा, स्वच्छता याकडे खास लक्ष दिलं जातं. अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार त्यात केलेला असतो. अनेकदा आपल्याला त्या गोष्टींची माहिती नसते. असंच एक अंतर्वस्त्र म्हणजे अंडरवेअर. अलीकडच्या काळात स्त्री आणि पुरुषांच्या अंतर्वस्त्रांमध्येही अनेक फॅशन्स आल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांपासून ही वस्त्रं बनवली जातात. त्यामुळे ती दिसायला सुंदर दिसतात; पण त्याचवेळी ती आरामदायी, आरोग्यदायी ठरावीत, यासाठी देखील विशेष योजना केली जाते.

हेही वाचा-  Chana Dal For Glowing Skin: चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते हरभरा डाळ, फक्त या पद्धतीनं वापरा

 महिलांच्या अंडरवेअरमध्ये (Women's Underwear) एक छोटासा खिसा असतो. त्याचा उपयोग काय आहे किंवा तो का बनवलेला असतो याची माहिती अनेक महिलांना नसते. लेडीज निकरमध्ये (Ladies Knicker) पॉकेट (Pocket) कशाला हवं, असं अनेकांना वाटतं. यामागे फार महत्त्वाचा विचार करण्यात आला आहे. जननेंद्रिय हा अत्यंत नाजूक अवयव असतो. या भागात संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे अंडरवेअर बनवताना ती अधिक आरामदायक आणि आरोग्यासाठी सुरक्षित ठरेल याची काळजी घेतली जाते.

महिलांच्या अंडरवेअरमध्ये तळाशी एक वेगळं कापड लावलं जातं. त्यामुळे तिथं एक खिसा तयार झाल्यासारखं दिसतं; पण हा खिसा नसतो, तर या भागातला ओलावा शोषून घेण्याकरिता ही रचना केलेली असते. बहुतेकदा हे कापड सुती असतं. यामुळे या भागात कोरडेपणा राहतो. तिथे पुरेशी हवा पोहोचते. त्यामुळे संसर्गाचा (Infection), तसंच त्वचेशी संबंधित इतर समस्यांचा (Skin Problems) धोका कमी होतो. आजकाल सिंथेटिक कापडापासून (Synthetic Cloth) डिझायनर अंडरवेअर बनवल्या जातात. त्यातही असं कापड लावलेलं असतं. सिंथेटिक अंडरवेअरमुळे कापड आणि त्वचा यात घर्षण होतं. त्यामुळे पुरळ येण्याचा, तसंच जखमा होण्याचा धोका असतो. तसंच या भागातली आर्द्रता लवकर कमी होत नाही. त्यामुळे त्वचेच्या समस्यांची भीती वाढते. त्यामुळे सिंथेटिक अंडरवेअरमध्येही कापसाच्या खिशासारखं कापड लावलं जातं.

हेही वाचा-  वजन वाढवायचंय? व्यायामापूर्वी हे पदार्थ आवर्जून खा; पाहा किती दिवसात दिसतो फरक

 पुरुषांच्या अंडरवेअरमध्येदेखील (Gent's Underwear) असं कापड असतं. तसंच पुरुषांच्या अंडरवेअरमध्ये कधीकधी पी-होलवरदेखील एक वेगळं कापड लावलेलं असते. त्यामुळे आराम मिळतो, तसंच संसर्गाचा धोकाही कमी होतो.

First published:

Tags: Lifestyle