Home /News /lifestyle /

कडक सॅल्युट! भारतीय लष्करात आता महिला जवान; मातृभूमीच्या संरक्षणासाठी सज्ज

कडक सॅल्युट! भारतीय लष्करात आता महिला जवान; मातृभूमीच्या संरक्षणासाठी सज्ज

Women soldiers in indian army : भारतीय लष्करात महिला सैनिक पोलिसांची पहिली तुकडी‌‌ दाखल झाली आहे.

    नवी दिल्‍ली, 8 मे : प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवणाऱ्या महिला आता मातृभूमीच्या संरक्षणासाठीही सज्ज झाल्या आहेत. भारतीय लष्करात महिला पोलिसांची पहिली तुकडी (first batch of 83 women soldiers) दाखल झाली आहे. आता लष्करात महिला जवानही (women soldiers in indian army) दाखल झाल्या आहेत. मातृदिनाच्या (Mother's day) आदल्या दिवशीच महिलांनी आपल्या मातृभूमीला मोठी भेट दिली आहे. देशातील 83 महिला जवान देशसेवेसाठी तयार झाल्या आहेत. बंगळुरूतल्या  लष्करी पोलीस केंद्र आणि विद्यालय (सीएमपी सी अँड एस) यांच्या वतीने दिनांक 08 मे 2021 रोजी द्रोणाचार्य परेड मैदानावर 83 महिला सैनिकांच्या पहिल्या तुकडीच्या अधिकृत प्रमाणन कवायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व कोविड मार्गदर्शक तत्वांचं पालन करत हा समारंभ साध्या स्वरुपात साजरा करण्यात आला. हे वाचा - दुसऱ्या देशांना का दिली कोरोना लस? भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं उत्तर सीएमपी सेंटर अँड स्कूलचे कमांडंट यांनी कवायतीची पाहणी करताना अभ्यासक्रम नुकताच पूर्ण करणाऱ्या महिला सैनिकांचे त्यांनी निर्दोषपणे कवायती सादर केल्याबद्दल अभिनंदन केलं. मूलभूत सैन्य प्रशिक्षण, प्रशासकीय प्रशिक्षण या सर्व संबंधित पैलूंविषयी 61 आठवड्यांहून अधिक कालावधीचं प्रशिक्षण पूर्ण करत केलेल्या  यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यात पोलिसांची कर्तव्ये आणि युद्धकैद्यांचे व्यवस्थापन, औपचारिक कर्तव्ये यासह वाहन चालवण्याचं आणि सर्व वाहनांची देखभाल आणि सिग्नल कम्युनिकेशन्स अशा सर्व कौशल्य विकासांचा समावेश आहे. हे वाचा - मराठी अभिनेत्रीचं लय भारी काम! गरीबांना दान केला लग्नासाठी जमवलेला पैसा कर्तव्यासाठी सर्व समर्पण, नीतिमत्ता आणि देशासाठी निःस्वार्थ सेवेचे महत्त्व सांगताना देशातील विविध प्रदेश आणि भौगोलिक  परिस्थितीतील प्रशिक्षण आणि त्यानुसार प्राप्त झालेल्या मानकांमुळे उत्तम  स्थान प्राप्त होईल आणि नवीन युनिट्समध्ये त्यांच्यातील शक्तींचा पुरेपूर वापर करत स्व:ला सिद्ध करतील, असा विश्वास या महिला जवांनांनी व्यक्त केला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Indian army, Woman

    पुढील बातम्या