Home /News /lifestyle /

इथं फक्त महिलाराज, पुरुषांना नो एंट्री! मुलालाही अठराव्या वयात काढलं जातं गावाबाहेर

इथं फक्त महिलाराज, पुरुषांना नो एंट्री! मुलालाही अठराव्या वयात काढलं जातं गावाबाहेर

आज ज्या बलात्काराच्या घटनेमुळे भारत हादरला आहे, अशाच घटनेनंतर महिलांनी महिलांसाठी वसवलेलं हे गाव आहे.

    केनिया, 03 ऑक्टोबर : आधी दिल्लीतील निर्भया आणि आता उत्तर प्रदेशात हाथरस बलात्कार (hathras gang rape) प्रकरणाने संपूर्ण भारत हादरला. दलित अशा एक ना दोन कित्येक बलात्काराच्या घटना घडत आहेत. फक्त भारतच नव्हे तर जगात अशा घटना घडत आहेत. काही दशकांपूर्वी आफ्रिकामध्येही ब्रिटिश सैनिकांनी हजारो महिलांवर बलात्कार केला. त्यांना कुटुंबानेही घराबाहेर काढलं. अखेर निराधार झालेल्या या महिलांनी आपलं स्वत:चं गाव वसवलं. जिथं आजही फक्त महिलाच राहतात. केनियातील उमोजा उसाओ  गाव आहे. केनियाची राजधानी नैरोबीपासून 380 किमीवर साम्बुरु काउंटी (Samburu County Village in Kenya) मधील आर्चर पोस्ट शहराजवळ हे गाव वसलं आहे. स्वाहिली भाषेमध्ये उमोजाचा अर्थ होतो एकता आणि उसाओ गावापासून वाहणाऱ्या नदीचं  नाव उमोजा आहे. हे गाव रेबेका लोलोसोली यांनी 15 महिलांच्या मदतीनी 1990 मध्ये वसवलं होतं. या गावातील 1400 पेक्षा जास्त महिलांवर ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार केला होता. ज्या महिलांवर बलात्कार झाला होता त्यांच्या कुटुंबांनी त्यांना स्वीकारलं नाही. त्यापैकी 15 महिलांनी हे गावं उभं केलं. आज इथं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलेल्या, घरातून पळालेल्या, हिंसाचाराला बळी पडलेल्या किंवा घरातून हाकललेल्या आणि विधवा महिलांना आसरा दिला जातो. हे वाचा - Hathras Case: ‘अंत्यसंस्कार झालेत ती आमची मुलगी नाही’, पीडित कुटुंबीयांचा आरोप या गावात सर्वात वयस्कर महिला 98 वर्षाची तर लहान मुलगी 6 महिन्यांची आहे. या गावातील महिलांची मुलं जेव्हा 18 वर्षांची होतात तेव्हा त्यांना गाव सोडून बाहेर जावं लागतं. लियरपूरा नावाच्या मुलीची आई तिला 3 वर्षांची असतानाच गावात घेऊन आली होती. तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिथले लोक लियरपूराचा जबरदस्तीने खतना करतील या भीतीमुळे तिची आई तिला इथं घेऊन आली आता ही मुलगी 15 वर्षांची आहे आणि त्या दोघी सुखाने या गावात राहतात. हे वाचा -आता महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने मजुरी मिळणार- पंतप्रधान मोदी जेन नावाच्या महिलेवर काही सैनिकांनी बलात्कार केला आणि तिला मारहाणही केली. तिचा नवरा आणि सासूने तिचं म्हणणं न ऐकताच तिला बेदम मारलं आणि हाकलून दिलं. अनेक संकटांवर मात करत ती आपल्या मुलासोबत या गावात आली आणि इथंच राहिली. जगभर महिलांवर अत्याचार होत असतात. शिक्षण घेऊन त्या सक्षम झाल्या तर त्या स्वावलंबी जीवन जगू शकतील. पण काही समाजांमध्ये त्यांना मदत करणारं कुणीही नसतं. या गावाचा अशा महिलांना मोठा आधार मिळाला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Gang Rape, Rape

    पुढील बातम्या